जाणून घेऊ गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे
1. अनेक शेतक-यांकडून शिफारस नसतानाही गहू लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर केला जातो. गव्हाच्या वाढीसाठी तसेच दाणे भरण्याच्या कालावधीत आवश्यक तापमान आणि थंडीचा पुरेसा कालावधी या पिकास उपलब्ध होत नाही.
2. गव्ह्यासाठी विकसित केलेल्या सुधारित तंत्राचा वापर शेतक-यांकडून केला जात नाही. सुधारित तसेच जास्त उत्पादनक्षम गव्हाच्या चाणाचे बियाणे शैतक-यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही.
3. गन्ह्याच्या पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिले जाते व योग्य खतांचा वापर केला जात नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील शेतकरी शिफारशीपेक्षा उशिरा गव्हाची पेरणी करतात.
उशिरा बागायती गव्हाची पेरणी
उत्पादनातील घट कमी करण्यासाठीचे उपाय
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी उपलब्धतेनुसार एनआयएडब्लू३४ किंवा एकेएडब्लू-४६२७ तसेच एनआयएडब्लू १९९४ (समाधान) या सरबती चाणांचा वापर करावा.
उशिरा पेरणीसाठी गव्ह्याच्या दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पेरणी ५ ते ६ सेंमी. खोल पाभरीने शक्यतो दक्षिणोत्तर करावी.
हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी विथाप्याचे हेक्टरी प्रमाण १२५ चे १५० केिली एवढे ठेवावे. पेरणी करताना हेक्टरी ४० कि. नत्र (८० कि. युरिया), ४० कि. स्फुरद (२४० केि. सिंगल सुपरफॉस्फेट) व ४० कि. पालाश (७५ कि. म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत.
पेरणीनंतर १५ ते २o दिक्सांनी पहिल्या पाण्याच्या अगोदर प्रति हेक्टर ४० कि. नत्र (८० कि. युरिया) द्यावे
जमिनीत ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवामान राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे १५ दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्याचे.
पीक क्षेत्रात तापमान कमी राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषारने शेवटचे पाणी पेरणीनंतर ८० ते ८५ दिक्सांदरम्यान द्यावे.
गहूपिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यानंतर काही वेळा गव्ह्यच्या दाण्यावर काळा डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दाणे भरताना तुषारवरील क्षेत्रात मॅन्कोझेब आणि काँपर ऑक्सिक्लोराईड प्रत्येकी २० मिलेि. १० लिटर पाण्यातून फवारावे.
Share your comments