1. कृषीपीडिया

जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण.

भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण.

जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण.

भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोल पर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोश अवस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटाश, कॅल्शियम, मेग्नेशियम यांची घनता वाढते. अपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. इतर बाबी मध्ये पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, 

कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोल पर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते, त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. जमीन ओळी राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते ,त्यामुळे सूक्ष्म अन्न द्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. पृथ्वीचं पोट (भूगर्भ) हे एक बँकेचं खातं आहे. ज्यात लक्षावधीं वर्षांची पाण्याची झालेली बचत साठवलेली होती. अगदी पिढ्यान पिढ्या साठत आलेली बचत. 

       जमीनीवर असलेलं पाणी जसं की पाऊस,नदी, सरोवरं ही तुमची कमाई आहे. त्यातला ३५% वाटा सूर्य नावाचं आयकर खातं कापून घेतं. 

तेच पुढे पावसाच्या रूपाने पगारासारखं परत येतं. त्यातला काही भाग भूगर्भातील बचत खात्यात जमा होतो. तर बराचसा भाग तुम्ही खर्च करता. आता खाणारी तोंडं वाढली (लोकसंख्या). उधळपट्टी वाढली(वॉटर थीम पार्क, तरण तलाव, आस्थापनं, सर्वीस सेंटर इ.). तसं तुम्ही बचत खातं पण बुडीत काढायला निघालात. त्या खात्यामुळे इतर जे व्याज म्हणून मिळणारे फायदे होते. (वन संपदा, तापमान नियंत्रण) ते ही झपाट्यानं कमी होऊ लागले.  

         पाऊस दरवर्षी पडतो. पण आपल्याला सवय काय? तर.... पगार झाला की पंधरा वीस दिवस मजा मारायची. शेवटचे आठ - दहा दिवस भणंगासारखं उधार उसनवारी करत फिरायचं. 

तेव्हा नारे द्यायचे. "पाणी वाचवा." तीच परीस्थिती आताही आहे. जागतिक हवामान बदलामुळे पगार (पाऊस) वेळेवर व पुरेसा होईनासा झालाय. आपल्या उधळपट्टीला आवर नाही. त्यात शुद्ध पाण्याच्या जलचक्रात (पाऊस - बाष्पीभवन -पाऊस) आपण गटारं व सांडपाणी नावाचं एक वाईट कर्ज वाढवत नेतोय. 

          थोडक्यात, पाण्याच्या बाबतीत आपला लवकरच 'विजय माल्ल्या' होणार आहे. तो देश सोडून पळाला. आपण पृथ्वी सोडून कुठं पळणार आहोत? 

चला कामाला लागूया. जागोजाग जलमंदीरांची स्थापना करुया. Rainwater Harvesting करुया.

English Summary: Land ploghing give temprature back reasons scientifically Published on: 22 February 2022, 11:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters