1. कृषीपीडिया

जाणुन घ्या पिकांच्या पानांची कार्य आणि शक्ती

पानांच्या वयानुसार प्रकाशसंश्‍लेषणाची क्षमता पाहिली असता असे दिसते,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणुन घ्या पिकांच्या पानांची कार्य आणि शक्ती

जाणुन घ्या पिकांच्या पानांची कार्य आणि शक्ती

पानांच्या वयानुसार प्रकाशसंश्‍लेषणाची क्षमता पाहिली असता असे दिसते, की पान उघडल्यापासून 30 दिवसांपर्यंत ही क्रिया वाढत जाते.40 दिवसांपर्यंत स्थिर राहून नंतर 70 दिवसांपर्यंत ती पुन्हा कमी होत जाते. पानांची वाढ होत असताना हरितद्रव्याच्या वाढत जाणाऱ्या प्रमाणामुळे अन्ननिर्मिती वाढत जाते व साधारणतः दोन ते तीन आठवडे कायम राहते.पानांमधील प्रकाशसंश्‍लेषणावर ते कोणत्या हंगामातील आहे, यावरही प्रकाश संश्‍लेषणाचा दर अवलंबून असतो. कारण प्रत्येक परिस्थितीत वातावरणाचा परिणाम वेगळा होत असतो, तसेच सोर्स-सिंकचे प्रमाण वेगळे असू शकते.

पानांची कार्यक्षमता - पानांमधील पाण्याचे प्रमाण अन्ननिर्मितीचे कार्य नियंत्रित करते. The amount of water in the leaves controls food production.मुख्यत्वे पर्णरंध्रांची उघडझाप पाण्याच्या उपलब्धतेनुसार अवलंबून असते. वेलीने शोषलेल्या एकूण पाण्यापैकी फक्त एक टक्का पाणी प्रत्यक्ष अन्ननिर्मितीसाठी वापरले जाते. उरलेले 99 टक्के पाणी उत्सर्जनावाटे बाहेर टाकले जाते. बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा जास्त झाल्यास पानांमध्ये पानांचा ताण निर्माण होतो. यावर मात करण्यासाठी पर्णरंध्रे बंद होतात, उत्सर्जन कमी केले जाते व पुन्हा पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर हे कार्य पूर्ववत होते. या सर्व क्रियेमधून प्रत्यक्ष अन्ननिर्मितीवर देखील परिणाम होतो.

प्राणवायू व कर्बवायू यांचा अन्ननिर्मितीवर परिणामवातावरणातील या घटकांचा प्रत्यक्ष अन्ननिर्मितीवर परिणाम होत असूनही, सामान्यतः आपण त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकत नाही; परंतु काही ठिकाणी अलीकडे बागेवर तसेच शेताच्या बाजूने प्लास्टिक कागदांचा वापर केला जातो. अशा ठिकाणी रात्रीतील श्‍वसनामधून निर्माण झालेला कर्बवायू वेलीच्या भोवती कोंडून राहतो.दिवसा सूर्यप्रकाशामध्ये कर्बवायूच्या अधिक प्रमाणामुळे अन्ननिर्मिती अधिक क्षमतेने होते. पॉलिहाऊसमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या

किंवा फुलांच्या बाबतीत अशाच प्रकारे तापमान सूर्यप्रकाश व कर्बवायूच्या वाढलेल्या प्रमाणाचा उपयोग प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया वेगाने होण्यासाठी केला जातो.त्यामुळे भविष्यामध्ये उपलब्ध सूर्यप्रकाश व कर्बवायूचा अधिक क्षमतेने वापर करून घेण्यामध्ये "प्लास्टिक कल्चर' तंत्रज्ञानाचा वापर विचारात येऊ शकतो.फवारणीचा अन्ननिर्मितीवरील परिणाम द्राक्षवेलीवर अनेक प्रकारची बुरशीनाशके, कीटकनाशके फवारली जातात. यापैकी काही द्रावणांमुळे पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचण्यास अडथळा निर्माण होतो व त्याचा अन्ननिर्मितीवर काही प्रमाणात

दुष्परिणाम होतो. सामान्यतः "वेटेबल पावडर' स्वरूपातील रसायनांचा अशाप्रकारचा परिणाम आपल्याला प्रत्यक्षपणे द्राक्षवेलीवर दिसून येतो.ऍन्टिस्ट्रेस या विद्राव्य पॉलिमर प्रकारच्या घटकाचा प्रकाश संश्‍लेषणावर काही परिणाम न होता रोगांना अटकाव होतो, तसेच उर्त्सजन काही प्रमाणात कमी होऊन ताण परिस्थितीत अन्ननिर्मिती कायम राखण्यास मदत होते.विस्तार व्यवस्थापनाचा अन्ननिर्मितीवरील परिणाम वेलीवरील फुटी व पानांच्या संख्येमध्ये, तसेच रचनेमध्ये इच्छित बदल घडवून आणल्याने प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होते, किंबहुना विस्तार व्यवस्थापनाचे प्रथम ध्येय हे वेलीची

अन्ननिर्मितीची प्रक्रिया वृद्धिंगत करून एकंदर उत्पादन वाढविणे हेच असते. त्यामुळे पानांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपलब्ध सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करून घेणे आवश्‍यक ठरते.प्रकाश संश्‍लेषणाचा दर अभ्यासता सावलीतील पानांमधील दर 25 ते 50 टक्‍क्‍यांनी कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्तीच्या कॅनोपीमुळे पाने एकमेकांवर आडवी आल्यामुळे तळातील पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, त्यामुळे खालची पाने पिवळी होतात. अशी पाने

अन्ननिर्मिती करू शकत नाहीत. वेलीवर ती परजीवी म्हणूनच वाढत असतात.अशी पाने काढून टाकावी.अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे बावर प्रकारच्या वेल विस्तार व्यवस्थापनात आढळून येते. म्हणूनच पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वेलीचे विस्तार व्यवस्थापन हे सर्वाधिक उपयुक्त भौतिक माध्यम आहे. पानांच्या अन्ननिर्मितीवर परिणाम करणाऱ्या या सर्व घटकांचा विचार करून अधिकाधिक उत्पादनासाठी त्यांचा उपयोग करून घेणे शक्‍य होते. 

 

संपर्क : डॉ. रामटेके - 9422313166

English Summary: Know the function and power of plant leaves Published on: 19 August 2022, 06:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters