1. कृषीपीडिया

सोयाबीनची पाने पिवळी पडण्याचे नेमके कारण जाणून घेऊन आवश्यकतेनुसार करा उपायोजना

बऱ्याच वेळा शेतकरी बंधू कडून सोयाबीनची पाने पिवळी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सोयाबीनची पाने पिवळी पडण्याचे नेमके कारण जाणून घेऊन आवश्यकतेनुसार करा उपायोजना

सोयाबीनची पाने पिवळी पडण्याचे नेमके कारण जाणून घेऊन आवश्यकतेनुसार करा उपायोजना

बऱ्याच वेळा शेतकरी बंधू कडून सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याबद्दल उपाय योजने संदर्भात विचारणा होत असते. या अनुषंगाने सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे काय असू शकतात याबद्दल जाणून घेऊ.(A) बऱ्याच वेळा अतिवृष्टीच्या कालावधीत जमिनीतील अतिरिक्त ओलाव्यामुळे जमिनीतील हवेची जागा पाण्याने घेतल्यामुळे सोयाबीन च्या मुळाना जमिनीतील पोषणद्रव्ये शोशताना अडथळा होत असतो तसेच जमिनीत अति जास्त ओल व सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश अपुरा पडल्याने सोयाबीन पिकाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली जाण्याची शक्यता असते त्यामुळेसुद्धा सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषता जमिनीतील अतिरिक्त ओल् व ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन पिकाला नत्र या अन्नद्रव्याची कमतरता भासू शकते व सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया बाधित होऊ शकते व एकंदर त्याचा परिणाम म्हणून पाने पिवळी पडू शकतात. 

अशा स्थितीत नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्य कमी होऊन पाने पिवळी पडू शकतात मात्र पानांच्या शिरा हिरव्या राहतात. अशी स्थिती आपल्या शेतात आढळल्यास योग्य निदान करून तज्ञांच्यामार्गदर्शनाखाली खालील उपाययोजना करावी(1) शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे(२) सूर्यप्रकाश अपुरा पडत असल्यामुळे वातावरणातील बदला नंतर पुरेसा सूर्यप्रकाश प्राप्त झाल्यावर प्रकाश संश्लेषण क्रियेला चालना मिळून अशा सोयाबीन शेतामध्ये सोयाबीनची पाने हिरवी पडण्यास सुरुवात होईल.(३) अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेऊन विशेषता नत्र व पालाश यांचा पुरवठा करण्यासाठी योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार 13:0:45 (पोटॅशियम नायट्रेट) 100 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पावसाची उघडीप पाहून पाऊस नसताना गरजेनुसार फवारणी करू

शकता किंवा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकात पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पेरणीनंतर 50 व 70 दिवसांनी दोन टक्के युरिया म्हणजे 100 लिटर पाण्यात दोन किलो युरिया या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता अर्थात गरजेनुसार पिक निरीक्षणाच्या आधारावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी(B) सोयाबीन पिकात बऱ्याच वेळा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोह या अन्नद्रव्याची कमतरता भासू शकते व त्यामुळे सुद्धा सोयाबीन मध्ये पाणी पिवळे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निदान करून पाणी पिवळी पडत असल्यास सोयाबीन पिकामध्ये फेरस सल्फेट 0.5% ( 50 ग्रॅम) + 0.25%( 25 ग्रॅम) कळीचा चुना अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची दोन वेळा म्हणजे पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरणाच्या अवस्थेमध्ये करावी. अर्थात या संदर्भात योग्य निदान करून चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फेरस ची कमतरता असेल तर तज्ञांच्या सल्ला घेऊन गरजेनुसार उपाय योजना करावी.(C) सोयाबीन पिकात पिवळा मोझाक या या रोगात सुद्धा पाणी पिवळी पडतात परंतु या रोगात सोयाबीन च्या पानावर हिरव्यापिवळ्या ठिपक्याचे मिश्रण दिसून

येते म्हणजे या रोगात रोगट झाडाच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. या रोगात शेंड्याकडील पाणी पिवळी पडून आकाराने लहान होतात. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी पांढरी माशी या किडीमुळे होतो.The disease is spread by the whitefly.या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकात पेरणीनंतर 75 दिवसापर्यंत झाल्यास अधिक नुकसान होते परंतु या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पेरणीनंतर 75 दिवसांनी झाल्यास सोयाबीन पिकात फारसे नुकसान संभवत नाही.पिवळा मोझॅक मुळे सोयाबीनची पाणी पिवळी पडत असल्यास या रोगाच्या व्यवस्थापनासाठी खालील बाबी अंगीकार कराव्या(१) पांढऱ्या माशीच्या प्रतिबंधाकरिता व व्यवस्थापनाकरिता सोयाबीन पिकात पिक उगवणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी साधारणपणे 64 प्रति एकर या प्रमाणे 15 बाय 30 सेंटिमीटर आकाराचे फोम शीट किंवा टीन पत्रा किंवा पॉलिथिन शीट पासून बनविलेले किंवा रेडिमेड मिळणारे पिवळे चिकट सापळे पिकाच्या समकक्ष उंचिवर लावावे.(२) पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी व इतर किडीच्या प्रतिबंधासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून सोयाबीन पिकात साधारणता पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 5 % टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

(C) याव्यतिरिक्त मूळ आणि खोड, कॉलर रोट या जमिनीतून वाढणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडू शकतात. या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्व कृषी विद्यापीठ शिफारशीत बीज प्रक्रिया करून पेरणी करणे व सेंद्रिय पदार्थाचा जास्तीत जास्त जमिनीत वापर करणे गरजेचे असते. धन्यवाद टीप : (१) वर निर्देशित उपायोजना करताना लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा.(२) सोयाबीनची पाने पिवळी पडण्यास संदर्भात नेमके निदान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून आवश्यकतेनुसार योग्य त्या बाबींचा वापर करावा.(३) रसायनी फवारताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी तसेच प्रमाण पाळावे.(४) कोणतीही फवारणी करताना पावसाची उघडीप पाहून किमान चार ते सहा तास पावसाची उघडीप पाहूनच फवारणी करावी.(५) रसायने फवारताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा तसेच सुरक्षा किट चा वापर करावा.

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Know the exact cause of yellowing of soybean leaves and take remedial measures as required Published on: 20 July 2022, 08:07 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters