केळी हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील मुख्य व लोकप्रिय फळ असून, व्यापारात आकारमानानुसार 1 पहिले आणि मूल्यानुसार दुसऱ्या स्थानी आहे. जगामध्ये केळी उत्पादनामध्ये भारत, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स, चीन, इक्वेडोर, कोस्टारिका, कोलंबिया हे देश आघाडीवर आहेत. केळी निर्यातीत इक्वेडोर, कोस्टारिका, फिलिपिन्स, कोलंबिया, ग्वाटेमाला हे देश आघाडीवर आहेत. केळीच्या मुख्य आयातदारांमध्ये युरोपीय संघ, अमेरिका, जपान इत्यादी देशांचा वाटा फार मोठा आहे.
निर्यात करताना घ्यावयाची काळजी कृषिमालाची निर्यात करताना "फायटोसॅनिटरी' प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यानुसार कीटकनाशकांचा उर्वरित अंश, वेष्टण, गुणवत्ता, कीड व रोगमुक्तता यांवर विशेष भर दिला जातो.
हे ही वाचा - लम्पी त्वचारोगावरील लसीकरण मोफत
केळी हे नाशवंत फळ असल्याने निर्यातीसाठी प्री-कुलिंग, पॅक हाऊस आणि शीतगृह या सुविधा असणे आवश्यक आहे.Pack house and cold storage facilities are a must. निर्यातीसाठी लागवडीपासून, घडाची निवड करण्यापासून ते प्रत्यक्ष कंटेनरद्वारे वाहतूक होईपर्यंत नियोजन करणे आवश्यक आहे.
निर्यातक्षम केळीच्या गुणवत्तेचे निकष1.घड फक्त सहा ते सात फण्यांचा असावा.2.प्रत्येक फणीचे वजन 1500 ग्रॅमपेक्षा कमी असू नये.3.सर्व फण्या चांगल्या आकाराच्या असाव्यात. 4.प्रत्येक फणीत कमीत कमी 14 केळी असावीत.6.प्त्येक केळ्याची लांबी शक्यतो 15 सें.मी.पेक्षा कमी नसावी व जाडी 2.7 सें.मी. पेक्षा कमी नसावी. 7.केळीच्या घडाची काढणी योग्य पक्वतेला (75 टक्के पक्वता) झालेली असावी.8. घडातील फळांचा रंग हिरवट पोपटी असावा व तो सर्व फळांवर सारखा असावा.
9.फळांवर कोणतेही डाग, खरचटलेल्या खुणा, तडे नसावेत.तसेच रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नसावा.10.फण्या आणि त्यातील केळी उत्तम, तजेलदार व आकर्षक असावीत.निर्यातीसाठी घडाचे व्यवस्थापन 1.घडाची काढणी योग्य पक्वतेस करावी.2.घडांची रवानगी पॅकिंग शेडमध्ये करण्याच्या अगोदर शेतातील उष्णता काढणे.3.घडांची पॅकिंग शेडमध्ये रवानगी करून फण्या वेगळे करणे.निर्यातीच्या दृष्टीने करावयाची तयारी
घडाची निवड कापणी पॅकिंग शेडमध्ये रवानगी घडांचे वजन घडाच्या फण्या वेगळ्या करणे फळांच्या टोकाकडील फुलांचा भाग काढणे फणीस वरच्या बाजूस काप देणे.फळांची वर्गवारी फण्या वाहत्या पाण्यात धुणे फण्या तुरटीच्या द्रावणात धुणे फण्या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडविणे फण्या वाळविणे फण्या खोक्यात भरणे, वजन करणे.स्टॅकिंग करणे खोके रेफर कंटेनरमध्ये ठेवणे.वाहतूक - पूर्वशीतकरणासाठी पाठविणे पूर्वशीतकरण शीतगृहात साठविणे खोके बंद करणे रेफर कंटेनरमधून इच्छितस्थळी पाठविणे.
Share your comments