महाराष्ट्रातील अनेक शेतकरी फूलगोबी व पत्ता गोबी या भाज्यांची लागवड करत असतात. आणि उत्पादनही घेतात परंतु या पिकांवर प्रमुख संकट म्हणजे किडी. याच धर्तीवर फूलगोबी वरील त्यांना नियंत्रित कसे करायचे हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.चौकोनी ठिपक्यांचा पतंग Diamondback moth, Plutella xylostella प्रादुर्भावाची ची लक्षणे - • हि कीड आकाराने लहान असून पुढील पंखाच्या खालच्या टोकाला पांढरा चौकोनी ठिपका असतो.
• ह्या किडीची अळी लहान असली तरी त्या पुष्कळ असू शकतात, पानाचे खालचे बाजूस राहून पानांना छिद्रे पाडून त्यातून हरितद्रव्य खातात. परिणामी पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. • फ्लॉवर मध्ये अळ्या असल्यास उत्पादन पूर्ण पणे नाकारले जाऊ शकते.एकात्मिक व्यवस्थापन - • किडीची व्यवस्थापनासाठी पिक काढणीनंतर शेतात असलेले पिकाचे अवशेष जमा करून जाळून टाकावेत.• सापडा पिक म्हणून मोहरी २५:१ (कोबी:मोहरी) च्या प्रमाणात मुख्य पिकाच्या लागवडी पासून १० दिवस अगोदर लावावे.
• एका एकरात ५ फेरोमेन कामगंध सापडे लावावे. • पिकांचे निरीक्षण करावे, किडींचे प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळी वरील प्रभावी व्यवस्थेत दिसू लागतास इन्डोक्साकार्ब १४. ५ टक्के ई. सी. ५ मि.ली. किंवा स्पिनोसॅड २. ५ टक्के १२ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून पाण्यात फवारणी करावी.कोबीवरील फुलपाखरू Cabbage butterfly, Pieris rapaeप्रादुर्भावाची ची लक्षणे -• अळी पानाचे खालचे बाजूस राहून पाने कुरतडून कुरतडून खाते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अळया पुर्ण पाने खाऊन टाकतात.
• अळी फुलकोबी, पत्ताकोबी आणि ब्रोकोली मधील पानाच्या देठावर व पुलावर गड्डे पोखरतात. • मादी फुलपाखराच्या पुढील पंखाच्या मध्यभागी काळे डाग असतात.एकात्मिक व्यवस्थापन - • या किडीच्या व्यवस्थापनासाठी सुरवातीचे दिवसात अंडी व अळया हाताने जमा करून मारून टाकावेत.• मित्र किडी चे रक्षण करावे. उदा. कॉटेसीए ग्लोमेरॅटा.• क्विनॉलफॉस २५टक्के प्रवाही ४० मी. ली. प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
मावाAphids, Brevicoryne brassicaeप्रादुर्भावाची ची लक्षणे -• हि कीड पानातून तसेच झाडाच्या कोवळ्या भागातून रस शोषन करते. कीड मोठया प्रमाणात आढळल्यास पाने पिवळी होवून वाळतात. • मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात व त्या पदार्थावर बुरशी वाढते त्यामुळे पिकाची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते.• रोपांची वाढ खुंटून उत्पादन घटते.एकात्मिक व्यवस्थापन• पिवडा चिकट सापडा लावावा.
• ३ टक्के नीम तेलाची फवारणी करावी.• डायमेथोएट ३० टक्के ई.सी. १५ मी. ली. प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.स्त्रोत - शेतकरी मासिक ओक्टोबर २०२२, शेती उपयोगी पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विद्यापीठाच्या शिफारशी आहेत.
लेखक: पूनम ऐन. मडावी (आचार्य पदवी विद्यार्थिनी) madavipunam13@gmail.com,
डॉ. ऐ. के. सदावर्ते (सहयोगी प्राध्यापक, किटकशास्त्र विभाग डॉ.पं.दे.कृ.वी, अकोला)
Share your comments