नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गायीच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात.
यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.It can be used in various ways for soil fertility, crop growth and protection.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य
नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.साहित्य - वेस्ट डि कंपोजर २ किलो गुळ२०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)२०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)
कसे बनवावे - ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी
काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स
द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे. हेच द्रावण विरजन म्हणून 20लिटर एका ड्रम मधे टाकून त्यात 200लिटर पाणी व 2किलो गुळ टाकुन वरील प्रमाणे 5-7दिवसात तयार करा. अशा प्रकारे लाखो लिटर द्रावण तयार करता येते.कसे वापरावे - तयार झालेले २०० लिटर द्रावण १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे
जमीनीत सूक्ष्मजीवाणू व गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परीणामी पिकांची वाढ जोमाने होते.फवारणीसाठी - पिकांवर फवारणीसाठी १ लिटर
पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून दर ८ ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.
बीज प्रक्रियेसाठी - १ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकरक विषाणू व बुरशी पासून बचाव होतो.
Share your comments