निसर्गतः वावरणारा मानव जेव्हा टोळ्यांनी राहू लागला,तेव्हा अन्नधान्याचा पुरवठा अर्थातच अपुरा पडू लागला.त्यासाठी शेतीची सुरुवात साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते.विविध तृणधान्ये नैसर्गिकरीत्या त्याआधीही उगवत होतीच.पण जंगल साफ करून जमीन मोकळी करून तेथे ही तृणधान्ये पेरायची,लागवड करायची व पीक घ्यायचे म्हणजेच शेती करा करायची, ही त्या काळापासूनची कल्पना.
भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे आपण म्हणतो. देशातील ७० टक्के लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत, 70% of people in the country depend on agriculture.असेही आपण म्हणतो पण एकूण दर एकरी उत्पादनाचे जगातील आकडे पाहिले, तर आपण फारच मागासलेले आहोत, असे लक्षात येते सध्याच्या आपल्या लोकसंख्येला पुरेल, एवढा जेमतेम धान्योत्पादनाचा इष्टांक आपण गेली १० वर्षे गाठत आहोत, हीच आपली करामत आहे. शेती करायला सुरुवात केल्यापासूनचे काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेणे आवश्यक ठरते. जमीन मोकळी करून
हाताने धान्य म्हणजे बी फेकावयाचे, ही सुरुवातीची पद्धत. या प्रकारात उघड्यावरचे बी अनेकदा पाखरे खाऊन जात वा रुजू शकत नसे. १७०१ साली जेथ्रो टूल याने पेरणीसाठी एक सोपी पद्धत वापरणे सुरू केले. खोल गेलेल्या एका अर्धगोलाकार नळीतून थेट जमिनीच्या खाली धान्याचे बी सोडायची ही पद्धत तेव्हापासून सर्वत्र रुजत गेली.नांगरणीसाठी फाळ पूर्वी लाकडी असत. घोड्यांच्या वा बैलांच्या अंगावर पडणारे ओझे त्रासदायक होई. लोखंडी फाळांचा नांगर व त्याचे जू बैलांच्या खांद्यांवर आडवी दांडी ठेवून लावण्याची पद्धत १८३७
सालापासून 'जीन डिअर' या अमेरिकनाने वापरात आणली. आपल्याकडे ही पद्धत वापरात यायला तब्बल शंभर वर्षे जावी लागली. किर्लोस्करांनी लोखंडी फाळाचे नांगर इथे तयार करायला सुरुवात केली व नंतर ते आपल्याकडे वापरात आले. या नांगरांमुळे नांगरणी खूप खोलवर होऊ लागली. जमिनीचा कस वाढू लागला. पिके जोमाने वाढू लागली व शेतीच्या उत्पन्नात खूपच वाढ होऊ लागली.शेती करताना निम्मा भाग वर्षाआड तसाच ओसाड नापीक ठेवायचा व त्या जमिनीचा कस वाढवायचा, हे अनेक वर्षे शेतकऱ्यांना माहीती होते. पण त्याऐवजी
डाळी, कडधान्ये, शेंगदाने, बार्ली यांसारखी पिके गव्हानंतर घेतली, तर जमिनीचा कस वाढू शकतो, हे अठराव्या शतकात प्रयोगाने सिद्ध झाले. या पद्धतीचा वापर करून जनावरांचा चाराही वाढला ती धष्टपुष्ट राहून त्यांच्याकडून शेतीची कामे जास्त करून घेता येऊ लागली.शेतीतील खतांचा वापर व बियाण्यांमधील प्रगती याने खरी हरितक्रांती घडून यायला सुरुवात झाली. १९६० सालानंतर प्रत्येक प्रकारची हायब्रीड बियाणे वापरात येऊ लागली. (हायब्रिड म्हणजे दोन वेगवेगळय़ा जातीची संकर करून मिळवलेली) त्यामुळे दाण्यांचा आकार व कणसातील दाण्यांची संख्या या दोन्ही
गोष्टी वाढत गेल्या.त्याच्या जोडीला विविध किडींसाठी व बुरशीजन्य रोगांसाठी फवारायची औषधे व ती फवारण्यासाठी प्रगत देशांत छोटी विमानेसुद्धा वापरात येऊ लागली.यांत्रिक शेतीसाठी आवश्यक अशी अवजारे तयार करण्यात याच काळात खूप प्रगती होत गेली.एकट्या शेतकऱ्याने आपल्या दोन व तीन कुटुंबीयांसह शंभर शंभर एकरात शेती करणे हे त्यामुळे नाविन्याचे राहिले नाही.शेतातील यंत्रांची ही प्रगती अजून आपल्याला
आत्मसात करणे शक्य झालेले नाही, कारण त्यासाठी प्रचंड आकाराची शेती आपल्याकडे शेतकरी स्वतःकडे ठेवूच शकत नाही. पाच पन्नास एकर शेतीसाठी ट्रॅक्टरपलीकडे यंत्रे विकत घेणे येथे शक्य नाही. हायब्रीड बियाणे, नैसर्गिक व कृत्रिम खतांचा वापर, उपलब्ध पाण्याचा नीट उपयोग केल्यास पूर्वीच्या म्हणीप्रमाणे आजही उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ही गोष्ट खरी ठरू शकेल.
भविष्यकाळात शेतीला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. कारण बी बियाण्यांमधील, जेनेटिक इंजिनिअरिंगमधील झपाट्याने होत चाललेली प्रगती. रोग होऊच नये, अशी बियाणे, नत्र पदार्थाचा वापर नेमक्या जागीच करून खतांच्या प्रमाणात केली जाणारी घट, कमी प्रतीची बियाणे आधीच यांत्रिक परीक्षेने बाजूला काढण्याची यंत्रणा या गोष्टींमुळे शेतीचे स्वरूप आमूलाग्र बदलत जाणार आहे.
प्रसारक : दिपक तरवडे
संकलक : प्रविण सरवदे, कराड
Share your comments