1. कृषीपीडिया

Crop Care:पिकांवर 'ही'लक्षणे दिसताच व्हा सावधान,त्यानुसार करा पोषक घटकांचे नियोजन,तरच होईल फायदा

पिकांवर विविध प्रकारचा रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळी पिकावर काही लक्षणे दिसायला लागतात. यावरूनच आपण पिकावर रोगाचा किंवा किटकांचा प्रादुर्भाव झाला की नाही हे ठरवतो. हीच गोष्ट पिकांना लागणाऱ्या पोषक घटकांच्या बाबतीत देखील आहे. पिकांना जमिनीतून मिळणारे कुठल्या पोषक घटकांची कमतरता आहे, आपल्याला पिकावर दिसून येत असलेल्या विविध लक्षणानुसार ठरवता येते व त्यानुसार संबंधित पोषक घटकांची कमतरता भरून काढता येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nutrutional management on crop

nutrutional management on crop

पिकांवर विविध प्रकारचा रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होतो, त्यावेळी पिकावर काही लक्षणे दिसायला लागतात. यावरूनच आपण पिकावर रोगाचा किंवा किटकांचा प्रादुर्भाव झाला की नाही हे ठरवतो. हीच गोष्ट पिकांना लागणाऱ्या पोषक घटकांच्या बाबतीत देखील आहे. पिकांना जमिनीतून मिळणारे कुठल्या पोषक घटकांची कमतरता आहे, आपल्याला पिकावर दिसून येत असलेल्या विविध लक्षणानुसार ठरवता येते व त्यानुसार संबंधित पोषक घटकांची कमतरता भरून काढता येते.

परंतु आपल्याला सगळ्यात आगोदर माहिती हवे की कोणते लक्षण हे कुठल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आहे. हे सर्व आले तर आपल्याला संबंधित पोषक घटकांचे पिकांना देण्यासाठी नियोजन करणे सोपे जाते. या लेखात आपण त्या संबंधी माहिती घेऊ.

 पोषक घटकांची कमतरता त्यांची लक्षणे

1- नत्र- जर पिकामध्ये नत्राची कमतरता असेल तर पिकाच्या अगदी खालची पाने पिवळी पडायला लागतात व पानांच्या कडा करपल्यासारखी दिसतात व पाने सुकतात व झाडाची वाढ मंदावते. एवढेच नाही तर फुल व फळधारणा खूप कमी प्रमाणात होते.

नक्की वाचा:सर्व आजारांवर गुणकारी असलेल्या आवळ्याला आहे खूपच मागणी, लागवड करून मिळवा लाखो..

2- स्फुरद- त्याची कमतरता राहिली तर पिकाच्या पानांवर जांभळट रंगाचे ठिपके दिसून येतात. तसेच पानांच्या शिरा हिरव्या गार होतात व पाठीमागील बाजूने पाने तपकिरी होतात. झाडाची खोडे बारीक राहतात व देठाची वाढ देखील व्यवस्थित होत नाही.

3- पालाश- फळबागांमध्ये पालाशची कमतरता राहिली तर फळांची वाढ सक्षम होत नाही व फळे वेडीवाकडी होतात. पिकाच्या पानांच्या कडा तांबड्या पडून पानांवर पिवळे ठिपके दिसतात. पाने शेंड्याकडून जळत फादीच्या  बाजूकडे येतात.

4- कॅल्शियम-नवीन शेंड्याची वाढ होत नाही तसेच शेंड्याकडील पाने सुकतात.फूल व फळगळ होते व पाने वेडीवाकडी होतात.

नक्की वाचा:Pest Management: शेतकरी मित्रांनो आता पिकांचे नुकसान टळणार; किडीचे करा असे व्यवस्थापन

5- बोरॉन-झाडाच्या वरच्या बाजूची पाने चुरगळल्या सारखी  दिसतात.झाडाची कोवळी पाने पांढरी पडून गळतात. त्यासोबतच हरित द्रव्यांचे प्रमाण देठापासून कमीकमी होत झाडाच्या टोकाकडे जाते. फळबागांमध्ये फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात

6- मॅग्नेशियम- मॅग्नेशिअमची कमतरता राहिली तर पाने पिवळी पडतात व पानासोबत देठ व शिरांचा हिरवा भाग कमी होऊन पाने पातळ बनून सुकतात. तसेच प्रकाश संश्‍लेषण क्रिया देखील मंदावते.

7- लोह- झाडाच्या पानातील शिरा हिरव्या राहतात व पानांमध्ये हिरवेपणा कमी होऊन पाने पिवळी पडतात.

8- मॅग्नीज- प्रथम पानांच्या शिरा हिरव्या व पानाचा भाग पिवळा पडून कालांतराने पाणी जाळीसारखे व पांढरट होऊन गळतात.

नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! पिकांना खते देताना घ्या 'ही' विशेष काळजी, मिळेल भरघोस उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न

English Summary: know dificiency of nutritional ingredients in crom on symptoms Published on: 02 August 2022, 05:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters