1. कृषीपीडिया

समजून घ्या ट्रायकोडर्मा आणि त्याच्या वापरण्याच्या वापरण्याची पद्धती

ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियेची पद्धत: बीज प्रक्रियेकरिता ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास वापरावे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
समजून घ्या ट्रायकोडर्मा आणि त्याच्या वापरण्याच्या वापरण्याची पद्धती

समजून घ्या ट्रायकोडर्मा आणि त्याच्या वापरण्याच्या वापरण्याची पद्धती

ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियेची पद्धत: बीज प्रक्रियेकरिता ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास वापरावे. बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करून शिंपडावे. नंतर हे संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.

प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. दहा किलोपेक्षा कमी अथवा जास्त बियाण्यांची प्रक्रिया करावयाची असल्यास त्या पटीत द्रावण तयार करून वरीलप्रमाणे प्रक्रिया करण्यात यावी.

ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक खतांसोबत किंवा रासायनिक बुरशीनाशकांसोबत शक्यतो करू नये. ट्रायकोडर्मास सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या, व थंड जागेत साठवावे. माती उपचार: २५ किलो शेणखतामधे (एफवायएम) मध्ये एक किलो ट्रायकोडर्मा पावडर मिसळवा आणि एका आठवड्यासाठी छायेच्या ठिकाणी ठेवा.

•नंतर एक एकर शेतातील मातीमध्ये पसरवा आणि त्यानंतर आपण पेरणी करू शकता. पेरणीच्या ५ दिवस आधी १ घन मीटर मातीमध्ये १५० ग्रॅम पावडर ४ ते ५ सेंटीमीटर खोलवर मिसळवा आणि नंतर पेरणी करा.

•नंतर जर समस्या उद्भवली तर, पावडर झाडांभोवती खड्डा बनवून किंवा निचरा करून ओतला जाऊ शकतो. जेणेकरून ते झाडांच्या मुळापर्यंत पोहोचू शकेल.

•द्रावणाद्वारे झाडाच्या बुंध्यापाशी: १० ते १५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर अधिक १ लिटर पाणी यांचे द्रावण करून झाडाच्या बुंध्यापाशी टाकावे व मातीने झाकून घ्यावे. डाळिंब व इतर फळझाडे या पिकांसाठी याचा वापर करु शकता.

मूळ उपचार: प्रति १० ते २० लिटर पाण्यात २५० ग्रॅम ट्रायकोडर्मा घाला आणि झाडाची मुळे त्यात भिजवून १५ ते ३० मिनिटे ठेवा आणि नंतर शेतात लावा.

ट्रायकोडर्माचा वापर करण्यापूर्वी व केल्यानंतर १५ दिवसांपर्यंत रासायनिक बुरशीनाशकांचा वापर थांबवावा त्यामुळे ट्रायकोडर्माचा परिणाम चांगला मिळतो. पानांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी देखील ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरते आहे; परंतु त्यासाठी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण शेतात उपलब्ध असणे आवश्यक असते.

 

ट्रायकोडर्मा वापरण्याचे फायदे

•हे रोगजनक जीवांच्या वाढीस प्रतिबंध करते किंवा रोगाचा नाश करून रोगमुक्त करते. हे वनस्पतींच्या रासायनिक प्रक्रियेत बदल करून वनस्पतींची प्रतिकारशक्ती क्षमता वाढवते. म्हणूनच या वापरामुळे रासायनिक औषधांवर अवलंबून असणारी विशेषत: बुरशीनाशक कमी होते.

•हे वनस्पतींमध्ये अँटीऑक्सिडेंट क्रियाकलाप वाढवते. टोमॅटोच्या वनस्पतींमध्ये असे आढळून आले की ज्या मातीमधे ट्रायकोडर्माचा वापर केला गेला त्या मातीत पोषकद्रव्ये,खनिजे आणि अँटि ऑक्सिडेंट्सची गुणवत्ता अधिक असल्याचे आढळून आले आहे.

•हे स्फुरद आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांना विद्रव्य बनवते त्यामुळे वनस्पतीची वाढ वाढते. याच्या वापरासह, अनेक वनस्पतींमध्ये खोलवर मुळांच्या संख्येत वाढ नोंदविली गेली आहे, ज्यामुळे त्यांना दुष्काळातही वाढण्याची क्षमता मिळते.

•यामध्ये ऑर्गेनोक्लोरिन,ऑर्गनोफॉस्फेट आणि कार्बोनेट कीटकनाशकांसारख्या विस्तृत कीटकनाशकांचा नाश करण्याची सुद्धा क्षमता असते.

•यामुळे रोपांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीत वाढ होऊन पिकांची वाढ जोमदार होते. तसेच ही रोपांच्या मुळ्यांवर पातळ थर निर्माण करतात त्यामुळे रोगकारक बुरशीचा प्रवेश मुळापर्यंत होऊ शकत नाही.

•ट्रायकोडर्मामुळे काणी, करपा, रोप कुजणे, मुळकूज, कंठिका कूज, कोळशी कूज, चिकटय़ा काणी, बोट्रायटिस, ब्लॅक सर्फ या रोगांपासून संरक्षण मिळते.

•पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.

•किफायतशीतर असल्याने खर्च कमी होतो. 

सावधगिरी

•ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर ४ ते ५ दिवसांपर्यंत जमिनीत रासायनिक बुरशीनाशक वापरू नका.

•कोरड्या जमिनीत ट्रायकोडर्मा वापरू नका.

•ट्रायकोडर्माच्या विकासासाठी आणि टिकण्यासाठी योग्य आर्द्रता आवश्यक आहे.

•ट्रायकोडर्माद्वारे उपचारित बियाणे थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका.

•ट्रायकोडर्माद्वारे प्रक्रिया केलेले शेणखत बराच काळ ठेवला जाऊ नये.

English Summary: Know about tricodarma and this using making system Published on: 15 February 2022, 06:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters