निंबोळीमधील सालीमध्ये 'डिएसिटील', 'अॅझाडिरेक्टीनॉल' या महत्त्वाच्या घटक ते पिकावरील भुंगे, खवले, कीटक यांच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करते व तसेच हा घटक पानापेक्षा निंबोळीच्या बियांमध्ये जैविक क्रिया करणारा असल्यामुळे किडीच्या विविध प्रजातीवर परिणाम करून किडीच्या शरीररचनेत व क्रियेत बदल घडवून किडींना अपंगत्व आणते.
३) मेलियानट्रिओल हा घटक सुद्धा निंबोळीमध्ये असतो. हा घटक पिकावर पडणाऱ्या किडींना झाडांची पाने खाऊ देत नाही. त्यामुळे झाडे निरोगी राहून पिकांची उत्तम वाढ होते.
४) निंबोळीमधील निम्बीडीन व निम्बीन या महत्त्वाच्या घटकामध्ये विषाणू विरुद्ध क्रिया करण्याची शक्ती असल्यामुळे पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांवर, तसेच जनावरांच्या विषाणूजन्य रोग नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.
५) किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंधक, कीडवाढरोधक व विविध किडींचे नियंत्रण करणे इत्यादी महत्त्वाचे गुणधर्म कडुनिंबाच्या निंबोळीत आहेत.
६) हा अर्क पिकावरील मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, पाने गुंडाळणारी अळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, घाटे अळी, एरंडीवरील उंट अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मका वरील खोडकिडा, टोमॅटोवरील सुत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, घरमाशी, मिलीबग, पीस, बटाट्यावरील कोलोरॅडो, मुंगी व भुग्यांची प्रजाती, झुरळाच्या प्रजाती, इत्यादी किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी पडतो.
७) पिकावरील धान्यावरील महत्त्वाच्या विविध ४०० ते ५०० कीटकांच्या प्रजातीच्या बहुआयामी व आंतरप्रवाही नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर अत्यंत उपयोगी ठरते.
८) वांगी, नारळ, केळी, नागवेलीची पाने व हरभऱ्यावरील मर रोग, वाटाणे व उडीद यावरील भुरी रोग, बटाटे, साळी यावरील विषाणू रोग, हरभऱ्यावरील मूळकुज, मुगाची रोपे जळणे, मक्यावरील डाऊनी मिल्ड्यू, साळीवरील बॅक्टेरीयल ब्लाईट इत्यादी.
९) पिकावरील विविध किडीच्या मादीस अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करता येते.
१०) अशा प्रकारे निंबोळी अर्क हे बुरशीनाशक, जिवाणूनाशक, विषाणूरोधक म्हणून परिणामकारक काम करते.
स्रोत:- शेतकरी मासिक,ऑगस्ट 2021
संकलन - सुदर्शन जमादार,ता.शहादा,नंदुरबार
अनिल थोरात,नाशिक
रामभाऊ जाधव,उंब्रज
Share your comments