1. कृषीपीडिया

जाणून घ्या सविस्तर, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.  

1. पात्रता-  

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.      

2. नुकसान भर्पाइची रक्कम-              

अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख.

ब.अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख                                                       

क- अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.                                             

3. विमा हप्ता भरावा लागत नाही- 

सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु) शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही.    

4. विमा पॉलिसी कालावधी- 

10.12.2019 ते 9.12.2020

5. सदर योजने अंतर्गत लाभास पात्र शेतकर्याने /शेतकर्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजने अंतर्गत लाभास पात्र असणार नाही.

6. आवश्यक कागदपत्रे-

अ) लाभ घेन्याकरिता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे-

i) विहित नमुन्यातील पुर्व सुचनेचा अर्ज (सहपत्र क्र.1) पुर्व सूचने सोबत आवश्यक कागद पत्रे-

a)7/12 उतारा किंवा 8अ.(मुळ प्रत)

b) मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)

c)प्रथम माहिती अहवाल

d)विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल

e)घटनास्थळ पंचनामा (स्वयं साक्षांकीत प्रत)

f) वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)

सदरचा दावा दुर्घटने नंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

ii) खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकीत केलेली)

आ) प्रस्तावा सोबत सादर करावयाची आवश्यक कागद पत्रे-

i) ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतकर्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.6 ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.

ii) शेतकर्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.

iii) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग). (मुळ प्रत.)

iv) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपा नुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागद पत्रे.

1) रस्ता/रेल्वे अपघात- इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.

2) पाण्यामध्ये बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

3) जंतू नाशक अथवा अन्य कारणा मुळे विषबाधा- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).

4) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.

5) खून- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र.

6) उंचावरून पडून झालेला मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.

7) सर्प दंश/ विंचू दंश- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.

8) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.

9) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होवुन मृत्यू- औष धोपचाराची कागदपत्रे.

10) जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल

4. अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्या लयात. 

a)विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.

b)विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

English Summary: Know about in detail gopinath mundhe shetkari accident vima scheme Published on: 04 February 2022, 10:58 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters