1. कृषीपीडिया

जाणून घ्या खत निर्मिती बाबत

मोठ्या प्रमाणावर खत निर्मिती व त्यांची विक्री केव्हा सुरू झाली हे अद्यापि निश्चित माहीत झालेले नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या खत निर्मिती बाबत

जाणून घ्या खत निर्मिती बाबत

मोठ्या प्रमाणावर खत निर्मिती व त्यांची विक्री केव्हा सुरू झाली हे अद्यापि निश्चित माहीत झालेले नाही. तथापि २,००० वर्षांपूर्वी चिनी लोक भाजलेली हाडे खत म्हणून वापरत होते असा उल्लेख आढळला आहे. तसेच सुरुवातीचे खत व्यापारी भरखते किंवा सॉल्ट पीटर गोळा करून, वाळवून व बारीक करून विकत असावेत. १७८६ च्या सुमारास इंग्लंडमध्ये हाडे दळण्याच्या गिरण्या होत्या. १८३१ मध्ये कोलर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञांनी हाडे सल्फ्यूरिक अम्लात बुडवून व त्यात इतर पदार्थ मिसळून संस्करित खत तयार करण्यास सुरुवात केली. ह्या पद्धतीत फोन लीबिक या जर्मन शास्त्रज्ञांनी बऱ्याच सुधारणा केल्या. ह्याच सुमारास अमेरिकेतही याच पद्धतींनी खते बनविण्यात येत होती. त्यानंतर हाडांऐवजी फॉस्फेटयुक्त खनिजे वापरून सुपरफॉस्फेट तयार करण्याच्या उद्योगाचा पाया घातला गेला. १८४९ मध्ये अमेरिकेत पहिला मिश्रखताचा कारखाना पी. एस्. चॅपल आणि विल्यम डेव्हिसन यांनी सुरू केला. विसाव्या शतकात हाडे, नैसर्गिक नायट्रोजनाचा पुरवठा व इतर नैसर्गिक कच्चा माल यांचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले व संश्लेषित खतांच्या निर्मितीकडे लक्ष वेधले गेले. खतनिर्मितीसाठी पूर्वी मजूर जास्त लागत त्यामुळे निर्मितीचा वेग कमी होता. पण संतत व अर्धसंतत प्रक्रिया आणि यांत्रिकीकरणामुळे खतनिर्मिती जलद आणि मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.

अमोनियम सल्फेट व अमोनियम नायट्रेट यांचा उपयोग नायट्रोजनयुक्त खतासाठी होऊ लागला. पोटॅशियम लवणांच्या खाणकामाच्या व संस्कारांच्या पद्धतींत सुधारणा झाल्या. १९५०–६५ या काळात ह्या उद्योगात बराच बदल झाला. १९५० मध्ये जे पदार्थ कमी महत्त्वाचे गणले जात होते ते १९६५ मध्ये जास्त पोषक द्रव्ये देणारे ठरले आहेत. नवीन प्रकारची खते तयार होऊ लागली असून खत वापराचे प्रमाण बरेच वाढले आहे. निर्मिती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर व ⇨ खनिज तेल रसायनांचा कच्चा माल म्हणून उपयोग करण्यात येऊ लागला आहे.

खतनिर्मिती हा जगातील एक महत्त्वाचा उद्योगधंदा असून १९६९-७० मध्ये २,००० लक्ष टन एवढे उत्पादन झाले. त्याची कारखान्यातील किंमत ७,००० दशलक्ष डॉलर्स एवढी होती.

भारतीय उद्योग : खाजगी व सरकारी क्षेत्रांत मिळून भारतात एकूण ६० कारखान्यांत खतनिर्मिती होते. ह्यांपैकी बऱ्याच कारखान्यांत खतनिर्मिती उपपदार्थ म्हणूनच करतात. खतनिर्मिती करणाऱ्या खाजगी क्षेत्रांतील ३५ कारखान्यांपैकी ८ कारखाने नायट्रोजनयुक्त व २७ कारखाने फॉस्फरसयुक्त खते बनवितात. द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी क्षेत्रातील कंपनीचे पाच कारखाने नामरूप (आसाम), सिंद्री (बिहार), नानगल (पंजाव), तुर्भे (महाराष्ट्र) व गोरखपूर (उ. प्रदेश) येथे सुरू आहेत. दुर्गापूर (प. बंगाल) व बरौनी (बिहार) येथील कारखाने १९७३ मध्ये, तालचेर (ओरिसा) व रामगुंडम (आंध्र प्रदेश) येथील १९७५

मध्ये व कोर्बा (मध्य प्रदेश) येथील कारखाने १९७४ मध्ये खतनिर्मितीस सुरुवात करतील अशी योजना होती. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. च्या अलवाये (केरळ) येथील कारखान्यात खतनिर्मिती होत असून

अंबलमेडू (कोचीन) येथील कारखान्यात १९७२ पासून उत्पादनास सुरुवात करण्याची योजना होती. मद्रास फर्टिलायझर्स लि. च्या मद्रास येथील कारखान्यात खतनिर्मिती चालू आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्हच्या कलोड (गुजरात) येथील कारखान्यात १९७४ पासून नायट्रोजनयुक्त व कांडला येथील कारखान्यात मिश्रखते तयार करण्याची योजना होती. यांशिवाय नेव्हेली लिग्नाइट कॉर्पोरेशन, नेव्हेली (तमिळनाडू) आणि हिंदुस्थान स्टील लि. च्या भिलाई (मध्य प्रदेश), रूरकेला (ओरिसा), दुर्गापूर (प. बंगाल) व हिंदुस्थान झिंक लि. च्या देबारी (राजस्थान) येथे उप-उत्पादन म्हणून खतनिर्मिती केली जाते. राज्यसरकारी क्षेत्रात फक्त बिहार स्टेट सुपरफॉस्फेट फॅक्टरी ही धनबाद येथे खतनिर्मिती करते. नॅप्थ्यापासून खते तयार करणारे कारखाने तुर्भे, गोरखपूर, कोटा, मद्रास, गोवा, कोचीन आणि दुर्गापूर येथे असून तुतिकोरीन, मंगलोर आणि बरौनी येथे उभारण्यात येणारे कारखानेही नॅप्थ्यापासून खते तयार करणार आहेत.

उत्पादन व क्षमता यांबाबतीत या धंद्याची प्रगती जलद होत आहे. एकूण मागणीपैकी ५३% पुरवठा देशातील कारखान्यांकडून होतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेत फक्ता अमोनियम सल्फेट खते तयार केली गेली. दुसऱ्या योजनेत अमोनियम सल्फेट–नायट्रेट, यूरिया, कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट ही खते तयार करण्यात आली पण अमोनियम सल्फेटाची निर्मिती जास्त होती. तिसऱ्या योजनेत आणि नंतरच्या एकवार्षिक योजनांत यूरिया व कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट यांची निर्मिती जास्त होती.

१९६० पर्यंत नायट्रोजनयुक्त खतांची निर्मिती सरकारी क्षेत्रातच होत होती, पण १९६०-६१ मध्ये खाजगी क्षेत्रातही अशा खतांची निर्मिती होऊ लागली. त्यावेळच्या ९ कारखान्यांपैकी ६ सरकारी (क्षमता ८९,००० टन) व ३ खाजगी होते. १९६५-६६ मध्ये १३ व १९६९-७० मध्ये १९ कारखाने निर्मिती करू लागले. १९६९-७० मध्ये सरकारी कारखाने ११ होते व त्यांत एकूण उत्पादनापैकी ५८% उत्पादन होते. निर्मितीवरील नियंत्रणे उठविल्यावर खाजगी कारखाने निर्मिती करू लागले. सर्व कारखान्यांची प्रगती कोष्टक क्र. ५ मध्ये दिली आहे. नायट्रोजनयुक्त खतनिर्मिती करणाऱ्या कराखान्यांची क्षमता १९७० अखेर १३·४४ लक्ष टन इतकी होती. यापैकी ५१% क्षमता सरकारी कारखान्यांची होती.

फॉस्फेटयुक्त खतनिर्मिती खाजगी कारखाने जास्त प्रमाणात करतात. हे उत्पादन एकेरी सुपरफॉस्फेटाच्या स्वरूपात होते. कोष्टक क्र. ६ मध्ये फॉस्फेटयुक्त खत निर्मितीची आकडेवारी दिली आहे. सरकारी क्षेत्रातील फॉस्फेटयुक्त खताचे उत्पादन १९६०-६१ पेक्षा १९६८-६९ मध्ये वाढले, पण १९७०-७१ मध्ये कमी झाले. या कारखान्यांची क्षमता ४,२१,००० टन आहे.

पोटॅशियम सल्फेट आयात करावे लागते. त्याऐवजी पोटॅशियम क्लोराइड व पोटॅशियम शोएनाइट यांच्या मिश्र लवणांपासून खत निर्माण करण्याची पद्धत भावनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने शोधून काढली आहे. या संस्थेने कांडला येथे १,००० टन पोटॅशियम क्लोराइड व २,००० टन एप्सम लवण तयार करण्याचा भारतातील पहिला कारखाना काढला आहे.

खतनिर्मिती वाढविण्यासाठी सरकारी क्षेत्रात हल्डिया (प. बंगाल) व परादीप (ओरिसा) येथे नवीन कारखाने काढण्याचे व गोरखपूर, नानगल व कोचीन येथील कारखान्यांची वाढ करण्याचे ठरविले आहे. तर खाजगी क्षेत्रात कामठी (महाराष्ट्र), तुतिकोरिन (तमिळनाडू) मीठापूर (गुजरात), पानिपत (हरियाणा) व मंगलोर (कर्नाटक) येथे नवीन कारखाने निघणार आहेत. कोटा येथील कारखान्याची वाढ करण्यात येणार आहे.

भरखते : सोनखताची योजना तमिळनाडू, राजस्थान, पंजाब, ओरिसा व कर्नाटक ह्या राज्यांत अमलात आली आहे. या योजनेखालील ५०० हून अधिक पंचायतींना केंद्र सरकारकडून प्रत्येकी रुपये २,००० एवढे अनुदान मिळते. १९६९-७० मध्ये हिरव्या खताखाली ८५ लक्ष हेक्टर जमीन होती, तर १९७०-७१ मध्ये १०४ लक्ष हेक्टर जमीन होती.

 

शेतकरी मित्र

विजय हि.भुतेकर सवणा

9689331988

English Summary: Know about fertilizer production Published on: 15 January 2022, 03:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters