1. कृषीपीडिया

जाणून घ्या मित्रकिटक गवळण/प्रार्थना कीटक विषयी अधिक महिती

जगभरात प्रार्थना कीटकांच्या 33 वर्गातून 460 जातीमध्ये 2400 इतक्या प्रजाती आढळतात. त्यामधील 162 प्रजाती भारतामध्ये आढळून येतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
मित्रकिटक गवळण/प्रार्थना कीटक

मित्रकिटक गवळण/प्रार्थना कीटक

सामान्य नाव:- प्रेइंग मॅंटिस(Praying Mentis)

शास्त्रीय नाव:-Menos religiosa

या किटकास प्रार्थना कीटक का म्हणतात?

या कीटकांचे समोरील पायांची स्थिती हात जोडल्यासारखी असते. त्यामुळे ते प्रार्थना करीत आहेत असे भासतात, म्हणून या किटकास प्रार्थना कीटक म्हणतात.

 

कसे दिसतात/ खास शिकारीसाठी तयार झालेली शरीरयष्टी:-

हा सुंदर दिसणारा कीटक उत्तम शिकारी असतो. संपूर्ण शरीर हिरवेगार असल्यामुळे पानांमध्ये सहज लपून राहतो. लांबलचक मानेवर त्रिकोणी डोके असते. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले डोके मानेच्या सहाय्याने 180° कोनामध्ये फिरवतो. डोळे सुद्धा टपोरे,हिरवे,डोक्याच्या भागातून थोडेसे पुढे आलेले दिसतात.

हिरव्या रंगासोबत साधारण तपकिरी रंगामध्ये सुद्धा हे आढळतात.लपण्यासाठी आजूबाजूच्या पानांमध्ये छतासारखे छप्पर बनवतात.

समोरील पायांच्या आधाराने भक्ष्यावर हल्ला चढवून पकडतात,भक्ष्याला मजबूत पकडण्यासाठी पायांना छोटे-छोटे हुकासारखे काटे असतात .मजबूत जबड्याच्या सहाय्याने भक्ष्याचा फडशा पडतात.

भक्ष्य:-प्रार्थना कीटक हे अन्य किडींचे पतंग, किरकिट, नाकतोडे, माश्या,भुंगे,रसशोषक किडी असे अनेक कीटक जे पिकास हानिकारक आहेत त्याचा फडशा पडतात.

नाकतोडे आणि प्रार्थना किटकतील फरक:-अनेकांनी ह्या किटकास पाहताच नाकतोडा असे उत्तर दिले.जरी नाकतोडे आणि प्रार्थना हे एकाच वर्गातील असले तरी या दोन्ही किटकामध्ये फरक आहे. 

 

1.नाकतोडे प्रार्थना कीटका पेक्ष्या थोडे लहान असतात.

2.प्रार्थना कीटकांचे समोरील दोन पाय एकमेकास जोडलेले असतात.असे नाकतोड्यामध्ये आढळत नाही.

3.नाकतोडा मान वळवू शकत नाही,तर प्रार्थना आपली मान वळवुन 180 ° अंशात पाहू शकतो.

4.प्रार्थना कीटकांची मान लांब असते. 

5.मुख्य म्हणजे प्रार्थना कीटक नाकतोडे खाऊन टाकतो.

प्रार्थना कीटकांची मादी मेटिंग झाल्यानंतर नरास खाऊन टाकते. एकावेळी साधारण 100 अंडी देऊ शकते.काही दिवसात त्यामधून छोटी पिल्ले बाहेर पडतात, पिल्ले ही वयस्क प्रार्थना.

किटकासारखीच दिसतात.पुढे साधारण एक वर्षापर्यन्त जगतात.या कालावधीत अनेक शत्रूकिडीचा फडशा पाडून मोकळे होतात.

 

संकलन - IPM school

विराज ठाणेकर,कोल्हापूर

अनंत क्षीरसागर,ठाणे

मिलिंद जि गोदे,अचलपूर

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: know about farmer friend pray mantid more information Published on: 02 October 2021, 05:33 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters