ओळख:- प्रौढांची लांबी सुमारे 2.0-2.5 सेमी असते आणि पाठीवर लाल किंवा लालसर नारिंगी आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात.
जीवनचक्र:- प्रत्येक मादी त्यांनी खाल्लेल्या अन्नाच्या गुणवत्तेनुसार सुमारे 100-2000 अंडी घालते. अंडी सहसा जमिनीत घातली जातात अपवादात्मक वेळी मधमाशांच्या पोळ्या जवळ घातली जातात. अंड्यातून बाहेर पडल्यावर, अळी अवस्था मातीमध्ये राहणाऱ्या लहान मोठ्या कीटकांना खाऊन जगतात.तेव्हा अळी अवस्था पिकाचे कोणतेही नुकसान करीत नाही. अळी अनेक इंस्टार्स(कात टाकून) मधून मोठी होते, ज्यात अळ्याचे दोन किंवा अधिक प्रकार असतात.अळीच्या पहिल्या अवस्थेस ट्रायंगुलिन म्हणून ओळखले जाते.
नाकतोड्याची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते. आणि म्हणूनच हे कीटक मित्र व शत्रू अशी मिश्र भूमिका बजावतात. जर ही कीड यजमान पिकांवर आली असेल तर शत्रूकीड व इतर पिकामध्ये वावर असेल तर मित्रकीटक. अळी मोठी हॊईल तशी ती कमी सक्रिय होते. पूर्ण वाढ झालेली अळी नंतर कोषावस्थेमध्ये जाते. त्या कोशामधून प्रौढ कीटक बाहेर पडतो. जो पिकाची फुले व पाने खातो.
नुकसान:-
प्रौढ ही विध्वंसक अवस्था आहे. जसं कीटक झाडांच्या पुनरुत्पादक भागावर म्हणजेच फुलांवर उपजीविका करतात त्यामुळे उत्पादनाचे लक्षणीय नुकसान होऊ शकते.
फायदा:- हे ब्लिस्टर बिटल अनेक वेळा नाकतोड्याची अंडी खाऊन टाकतात. त्यामुळे
व्यवस्थापन:-
निसर्गाचा एक अलिखित नियम असा की प्राणी जितका उजळ,आकर्षक असेल तितका सहसा तो अधिक विषारी असेल.या बीटलमध्ये मानवी त्वचेच्या संपर्कात आल्या नंतर फोड निर्माण करण्याची क्षमता असते, ह्या ब्लिस्टर बिटल मध्ये कॅन्थारिडिन नावाचा फोड निर्माण करणारा , गंधरहित, रंगहीन पदार्थ असतो.
त्यामुळे या किटकास स्पर्ष करणे टाळावे. (हातमोजे घाला किंवा कीटकांचे जाळे वापरा)
थिओडीकार्ब 0.09% टक्के याची फवारणी केल्यास किडीचे नियंत्रण होते.
संकलन - IPM school
Share your comments