सायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे कीड नियंत्रण प्रभावी ठरले आहे. मात्र, बेसुमार वापराने किडीच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, मित्र कीटकांचा नाश, दुय्यम किडींचा उद्रेक, पर्यावरणास हानी आदी दुष्परिणाम दिसू लागले. त्यावर जैविक कीड नियंत्रण, ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे.
परोपजीवी कीटक:
१) ट्रायकोग्रामा : या परोपजीवी किटकाचा उपयोग ऊस, भात, मका, ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंडअळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळींबावरील सुरसा, कोबीतील चौकोनी ठिपक्याचा पतंग इ. किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रसारण मात्रा : एका ट्रायकोग्रामा कार्डवर सुमारे २० हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्ड्सचे २ ते ४ प्रति एकर प्रमाणात तर प्रौढांचे २०,००० प्रौढ/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने ४ ते ५ प्रसारणे करावीत.
२) चीलोनस : या परोपजीवी किटकाचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंडअळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रसारण मात्रा : २४,००० ममीज/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. गरजेनुसार ३ ते ४ प्रसारणे करावीत.
३) एनकार्शिया : हे परोपजीवी कीटक बहुतांश भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, व पॉलीहाउसमधील पिकांवरील रसशोषक किडी (पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा इ.) च्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
प्रसारण मात्रा : नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच या किटकांचे प्रसारण करावे.
२) चीलोनस : या परोपजीवी किटकाचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंडअळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रसारण मात्रा : २४,००० ममीज/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. गरजेनुसार ३ ते ४ प्रसारणे करावीत.
३) एनकार्शिया : हे परोपजीवी कीटक बहुतांश भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, व पॉलीहाउसमधील पिकांवरील रसशोषक किडी (पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा इ.) च्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
प्रसारण मात्रा : नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच या किटकांचे प्रसारण करावे.
४) एपिरिकॅनिया : हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरीला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर उपजीविका करतात. या कीटकांमुळे पायरीलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.
प्रसारण मात्रा : २०,००० अंडी किंवा २,००० कोष/एकर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.
५) अपेंटालीस (कोटेशिया) : भाजीपाला पिकांतील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, बोंडअळी, घाटेअळी इ.च्या नियंत्रणासाठी या किटकाचा उपयोग होतो.
प्रसारण मात्रा : २०,००० प्रौढ/एकर.
६) ब्रेकॉन : कापसावरील बोंडअळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोडकीड, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी या किटकाचा उपयोग होतो.
प्रसारण मात्रा : २०,००० प्रौढ/एकर
७) कोपिडोसोमा : हे परोपजीवी बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
प्रसारण : २,००० अळ्या/एकर
८) एनासियस : हे परोपजीवी कीटक असून मोठ्या प्रमाणावर उपद्रव करणाऱ्या पिठ्या ढेकुण (मिली बग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात मुख्य सहभाग होता.
परभक्षी कीटक :
हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी अनेक किडींचा नायनाट करतो.
१) लेडी बर्ड बीटल (ढाल किडे) : हे परभक्षी कीटक पिकांवरील रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकुण इ. नुकसानकारक किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इ. पिकांवर हे मित्र कीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
प्रसारण : १,०००/एकर.
२) ग्रीन लेस वींग/ क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग) : या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकुण, खवले कीड यांच्या सर्व अवस्था व बोंडअळीची अंडी, प्रथमावस्थ्येतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.
प्रसारण : २,००० अंडी/एकर किंवा ४,००० अळ्या/एकर.
३) प्रेयिंग मँटीड (प्रार्थना कीटक) : हे कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.
४) डीफा अफिडीवोरा (कोनोबाथ्रा) : हे मित्रकीटक जाविक कीड नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या जैविक नियंत्रणासाठी ह्यांचा उपायोग होतो. पूर्ण विकसित अळी ३०० पेक्षा अधिक मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा ३ ते ५ दिवसांत संपवते.
प्रसारण : लोकरी माव्याच्या प्रादुर्भाव दिसून येताच ५० कोष/गुंठा किंवा ४०० अळ्या प्रति एकर सोडाव्यात.
५) परभक्षी कोळी (एम्बलीसियस) : हे मित्रकीटक भाजीपाला, फुलझाडे, फुलझाडे व पॉलीहाउसमधील पिकांवरील नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
तणांवरील परभक्षी किटक :
१) निकोचिटानस सोंड कीडे : प्रौढ कीटक जलपर्णीच्या शेंड्यांमध्ये जाऊन आतील गर खातात व पानांना छिद्रे पाडतात. हे किडे जलपर्णीग्रस्त तलावात प्रादुर्भावानुसार सोडावेत.
२) झायगोग्रामा भुंगेरे : हे भुंगेरे गाजर गवतावर राहून कळ्या, पाने, फुले खातात.
जैविक नियंत्रके वापरताना.
सामान्यतः प्रत्येक जैविक नियंत्रक हे एका विशिष्ट कीड किंवा रोगापुरतेच प्रभावी असते. उदा. ट्रायकोग्राम हा परोपजीवी कीटक त्याच्या यजमान किडीच्या फक्त अंडी अवस्थ्येतच परोपजीवीकरण करतो. किडीच्या अन्य अवस्थांवर तो परिणाम करत नाही.
किडीमध्ये रोग उत्पन्न करणारे विषाणू हे ज्या-त्या किडीच्या अळीसाठीच खास प्रभावी असतो.
किडीच्या वर्गाप्रमाणे खास प्रजातींचा वापर केल्यास जास्त व योग्य परिणाम मिळतात.
परभक्षी कीटकांच्या यजमान किडी (खाद्य/भक्ष) योग्य प्रमाणात असेल तर ते शेतात व्यवस्थित स्थिरावतात व नैसर्गिकरित्या त्यांची संख्या जोमाने वाढते.
जैविक नियंत्रकांना २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान खूप अनुकूल असते.
बुरशीजन्य कीटकनाशकांच्या फवारणीअगोदर व फवारणीनंतर किमान एक आठवड्यापर्यंत अन्य रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणे टाळावे.
जीवाणू, बुरशी, विषाणू किंवा कृमी आधारित जैविक कीटकनाशके कायम थंड व कोरड्या जागेवर साठवल्यास त्यांची गुणवत्ता टिकून राहते.
जैविक नियंत्रकांच्या चांगल्या परिणामांसाठी त्यांची वापरण्याची मुदत संपण्याआधी वापर करावा.
Share your comments