1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा: चक्रवर्ती महासम्राट बळीराजा, इडा पिडा टळो । बळीचे राज्य येवो !!

सुमारे चार हजार वर्षापूर्वी भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात प्रगत नागरी व कृषी संस्कृती बहरली होती.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा: चक्रवर्ती महासम्राट बळीराजा, इडा पिडा टळो । बळीचे राज्य येवो !!

शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा: चक्रवर्ती महासम्राट बळीराजा, इडा पिडा टळो । बळीचे राज्य येवो !!

सुमारे चार हजार वर्षापूर्वी भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात प्रगत नागरी व कृषी संस्कृती बहरली होती. मोहंजोदडो व हडप्पा येथे उत्खननात सापडलेली पक्क्या विटांची घरे, रूंद रस्ते, भव्य स्नानगृहे, आकर्षक शिल्पे, धान्याची कोठारे याची साक्ष देतात. या प्रदेशात न्यायी व पराक्रमी असुर वंशीय राजांचे राज्य होते. येथे महान तत्वदर्शी व जैन मताचा प्रवर्तक असुरसम्राट विरोचन याचा पुत्र बळीराजा राज्य करित होता. बळीराजा प्रजाहितदक्ष, न्यायी, बुध्दीमान, समतावादी व अत्यंत पराक्रमी होता.

त्याच्या काळात कृषी, व्यापार, कला इत्यादी क्षेत्रात समाजाने प्रचंड प्रगती केली होती.During his time, the society had made great progress in the fields of agriculture, trade, arts etc. कारण बळीराजा होता

पंजाबराव डख यांनी सांगितला पुढील हवामान अंदाज आणि हरभरा गहु पेरणीसाठी पोषख वातावरण

 तत्वदर्शी; प्रजेतील प्रत्येकाला त्याचा हिस्सा विभागून देणारा संविभागी, सर्वाशी समतेने वागणारा समतावादी, क्रियाशील समाजरचना घडविणारा समाज शिल्पकार, निर्मळ, निरागस, उदात्त मनाचा महामानव, सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा असा जिवलग. त्याच्या राज्यात कृषी संस्कृती बहरली होती, व्यापार फुलला होता, श्रमाला प्रतिष्ठा होती.

सर्व जण सुखी समाधानी असतांना परकीय आर्य आक्रमकांनी वामन नावाच्या बटु ब्राम्हण सेनापतीच्या नेतृत्वाखाली बळीराजाच्या राज्यावर आक्रमण केले. प्रचंड रक्तरंजीत संघर्ष झाला. हा संघर्ष होता न्याय विरूध्द अन्यायाचा; कारण बळीराजा न्यायी होता तर वामन अन्यायी, बळीराजा नीतीमान तर वामन कपटी व कारस्थानी, बळीराजा कृषी संस्कृतीचा सर्जनशील नायक तर वामन भटकंती करणाऱ्या लूटारू टोळ्यांचा नायक व शोषक यज्ञसंस्कृतीचा पुरस्कर्ता.

बळीराजा प्रजाहितदक्ष, संविभागी, आदर्श व मानवजातीच्या कल्याणार्थ सदैव कार्यरत नायक तर वामन अन्याय, शोषण यांचा पुरस्कर्ता अमानवी खलनायक. वामनाने कपटाने दान व धर्माच्या नावाखाली समतावादी व न्यायी बळीराजाची निर्घृण हत्या केली (अर्थात त्याला कपटाने पाताळात गाडले). वामनाचे सैन्य बळीच्या राज्यात शिरून त्यांनी प्रचंड लुटपाट केली. आया बहीणींच्या इज्जतीवर घाला घातला.

'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो||'चला तर मग आपला गौरवशाली इतिहास समजुन घेवून आपल्या पराक्रमी पूर्वजाचे; चक्रवर्ती सम्राट बळीराजाचे स्मरण करुयात व 'बळीराजा गौरव दिन' साजरा करुयात. आपण सर्वजण एकत्र येवू आणि मानवतेचा, समतेचा, कृषी संस्कृतीचा आणि श्रम संस्कृतीचा जागर करूया| जय बळीराजा | बलीप्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या आपणा सर्वांना सदिच्छा!

 

लेखक ःअनभिज्ञ

English Summary: King of Farmers, Toilers: Chakravarti Mahasamrat Baliraja, Ida Pida Talo. Let the kingdom of Bali come!! Published on: 26 October 2022, 08:18 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters