सध्या पाऊसकाळ जवळ आला आहे. यामुळे खरीप हंगामावर कृषी विभाग आणि प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकऱ्यांना वेळेत खत आणि बियाणे पुरवठा तसेच वाढीव उत्पादनाच्या अनुशंगाने मार्गदर्शन आदी कार्यक्रम राबिवणे गरजेचे आहे. सध्या जिल्हानिहाय खरीप हंगाम आढावा बैठका पार पडत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काय गरजेचे आहे, याबाबत माहिती घेतली जात आहे.
बियाणे, खते ठरवले जाते. त्यानुसार पुरवठा करुन शेतकऱ्यांची सोय केली जाते. त्याच अनुशंगाने सोमवारी 5 जिल्ह्यातील आढावा बैठक पार पडणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करुन तुम्ही कामाला लागा शेतकऱ्यांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही ही राज्य सरकारची जाबाबदारी असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना मिटलेली आहे.
उत्पादन वाढीसाठी त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. गतवर्षी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा पाऊसकाळ चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रत्यक्षात असे झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच पाणी हे सगळ्यांचेच आहे. त्याचा योग्य़ वापर झाला तरच उद्देशही साध्य होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सध्या शेतकऱ्याची शेतातील कामे सुरु आहेत. पावसाच्या तोंडावर शेतकरी शेतात व्यस्त आहेत. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनो सर्वतोपरी प्रयत्न करा कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली जाणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या;
'सर्वांना घरे' ही राज्य सरकारची योजना माहिती आहे का? वाचा सविस्तर, सर्वांना मिळणार हक्काचे घर
मोठी बातमी! गव्हाच्या निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय, कारण आले समोर..
किसन वीर कारखान्यासाठी अजितदादांना साकडे, वाचा सविस्तर...
Share your comments