1. कृषीपीडिया

कांदा पिकावरील काळा करपा व पांढरी सड,लक्षणे आणि उपाय

कांदा पिकाचे उत्पादन महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात घेतली जाते. कांदा हे पीक हवामानाला फारच संवेदनशील असून हवामान झालेला बदल कांद्याला जास्त प्रमाणात मानवत नाही. कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचा रोग होतात. या लेखात आपण काळा करपा आणि पांढरी सड या रोगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कांदा पिकावरील काळा करपा महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचे लक्षणे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion crop

onion crop

 कांदा पिकाचे उत्पादन महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात घेतली जाते. कांदा हे पीक हवामानाला फारच संवेदनशील असून हवामान झालेला बदल कांद्याला जास्त प्रमाणात मानवत नाही. कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचा रोग होतात. या लेखात आपण काळा करपा आणि पांढरी सड या रोगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

कांदा पिकावरील काळा करपा

 महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचे लक्षणे.

  • सुरुवातीला या रोगामध्ये पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्या जवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात.
  • कालांतराने या टक्क्यांचे प्रमाण वाढत जाते व पाने वाळतात.
  • पाने वाळण्याचे प्रमाण वाढल्याने कांद्याची वाढ होत नाही.
  • पाना वरील चट्टे जवळून बघितल्यास काळ्या ठिपक्याच्या मधला भाग पांढऱ्या रंगाचा असून त्या भोवती गोलाकार काळे पट्टे असल्याचे दिसते.
  • हा रोग खरिपात रोपवाटिकेतील रोपांवर देखील येतो. त्यामुळे रोपांची पाने काळी पडून वाळतात नंतर रोप मरते.

या रोगास प्रतिकूल स्थिती

  • खरीप हंगामातील दमट आणि उबदार हवामानात या रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
  • या रोगाची बुरशी पावसाच्या थेंबान मार्फत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरते मुख्य म्हणजे रोपवाटिकेच्या माध्यमातून हा रोगशेतात येतो.
  • जमिनीतून पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण आणि सतत रिमझिम पडणारा पाऊस यामुळे या रोगाचे प्रमाण वाढते. कांद्याच्या माना लांब होतात व कांदा काही प्रमाणात तयार झाल्यानंतर रोगाचे प्रमाण वाढले तर पाने वाळतात व कांदा पोसतनाही.

कांदा पिकावरील पांढरी सड

 या रोगामुळे कांदा पिकाचे जवळजवळ 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते.

 पांढरी सड या रोगाची लक्षणे

  • ही बुरशी पुनर्लागण केलेल्या रोपाच्या मुळावर वाढते.
  • या रोगात रोपाची किंवा झाडाची पाने जमिनीलगत सडतात व पानाचा वरचा भाग पिवळा पडतो.
  • या रोगामध्ये जुनी पाने प्रथम बळी पडतात.
  • रोगाच्या तीव्रतेमुळे पाने जमिनीवर लोळतात.
  • कांद्याची मुळे सडल्यामुळे कांद्याचे झाड सहज उपटून येते.
  • वाढलेल्या कांद्याला मुळे राहत नाहीत.
  • कांद्यावर कापसासारखे पांढरी बुरशी वाढते व त्यावर पांढरे दाणे तयार होतात व कांदा सडतो.
  • पांढऱ्या सडीचा प्रादुर्भाव पुनर्लागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही.

 या रोगास पोषक स्थिती

  • खरीप आणि रब्बी हंगामात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
  • पाण्याचा निचरा चांगल्या न होणाऱ्या शेतात या रोगाची तीव्रता अधिक असते.
  • या रोगाची बुरशी जमिनीत बरेच वर्ष टिकते.

उपाय

  • मररोग होऊ नये म्हणून जे उपाय केले जातात त्यामुळे हा रोग टाळता येतो.
  • एकाच शेतात वर्षांनुवर्षे कांद्याची लागवड करू नये.
  • कांद्याचे तृणधान्य सोबत फेर पालट करावी.
  • खरिपातील लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.
  • उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
  • कांद्याच्या पुनर लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम द्रावणात एक ते दोन मिनिटे बुडवून घ्यावीत त्यासाठी वीस ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे
English Summary: karpa and white rotting disease onionin onion crop Published on: 16 September 2021, 11:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters