आज महाराष्ट्रातील शेतकरी त्यांनांचा नायनाट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. परंतु बऱ्याचशा तन नाशकांची फवारणी करून सुद्धा परिणाम दिसत नाही त्यासाठी आपण आज लव्हाळा या तनाचा नायनाट करण्यासाठी काय केले पाहिजे हे
आपण जाणून घेणार आहोत.१ किलो राजगीर्यास 20 मिली सोईल चार्जेर बीजप्रक्रिया करून नंतर ते बी आणि २० किलो वाळू एकत्र मिसळून
युरोपातील शेतकरी आणि भारतातील शेतकरी खुपच फरक वाचा
१ एकर लव्हाळा बाधीत क्षेत्रावर फेकून त्याला पाणी द्यावे.1 acre of Lavala should be thrown on the flooded area and watered. म्हणजे ८ - १० दिवसात राजगीरा उगवून येतो. ३-४ पाण्याच्या पाळ्या ८ -१०
दिवासांनी द्याव्यात, म्हणजे १।। ते २ महिन्यात हा राजगीरा १।। ते २ फूट साधारण गुडघ्याएवढा झाला म्हणजे त्याचे सोटमूळ हे लव्हाळ्याच्या गाठीवर जाऊन आदळते व त्याला मारून टाकते. एका लव्हाळ्याच्या झाडाच्या मुळावर एकूण ७ गाठी
(Rhizomes) असतात.ह्या सर्व मरतात. मग आपल्याजवळ मार्केट असल्यास तेथे राजगिर्याची भाजी विकता येते. नवरात्रात उपवासासाठी ही भाजी वापरतात. भाजीला दर नसल्यास नांगरटी खाली राजगिर्याची भाजी सेंद्रिय खत म्हणून गाडून
टाकावी. अनेक लोकांनी हा प्रयोग करून त्याचे निष्कर्ष कृषी विज्ञानमध्ये छापले आहेत. आपणही असा प्रयोग करून आपले अनुभव कळवावेत, म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
Share your comments