गहू एक पिष्ठमय एकदल धान्य आहे. याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. ताजा गव्हांकुराचा रस हा पौष्टिक असतो. भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्यप्रदेश या राज्यांत होते. गहू संशोधन केंद्र कर्नेल येथे आहे.ठळक बाबी - देशाच्या सरासरी उत्पादकतेच्या निम्म्याहून कमी उत्पादकता महाराष्ट्र राज्याची आहे. पंजाब व हरियाना या राज्यांची गव्हाची उत्पादकता महाराष्ट्रापेक्षा तिपटीने जास्त आहे.जमीन :पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते.
हवामान :गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते.Wheat grows best in a cool, dry and clean sunny climate. पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते.
अशी करा हरबरा बियाणे (वाण ) निवड आणि बीज प्रक्रिया
दाणे भरण्याच्या वेळी २५ डिग्री सें. तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते._पूर्वमशागत :खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी. शेवटच्या कुळवणी आधी हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले
शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांच धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.पेरणीची वेळ : जिरायत गव्हाची पेरणी जीरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास फुटव्यांची संख्या, ओंबीची लांबी, ओंबीतील दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून अपेक्षित उत्पन्न मिळते. थंडी उशिरा चालू झाल्यास उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास त्याचा फायदा होतो.बागायत गव्हाची पेरणी - बागायती गव्हाच्या वेळेवर
पेरणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली, तरी ऊसतोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. बागायत गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र, काही ठिकाणी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने एकरी १ क्विंटल उत्पादन कमी मिळते.
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी एनआयएडब्लू-३४, एकेएडब्लू-४६२७, फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) या सरबती जातींची निवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रतिएकरी ५० ते ६० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ सें.मी. अंतरावर पेरावे. बियाण्यास पेरणीपूर्वी सुदर्शन या बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅबक्टर अधिक २५० ग्रॅम पीएसबी अधिक
स्टार २५ मिली ह्यांची बीजप्रक्रिया करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.पेरणी पद्धत : गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सें.मी. आणि
बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेंमी. खोल करावी.हेक्टरी बियाणे : १) जिरायत पेरणी :- ७५ ते १०० किलो२)बागायत वेळेवर पेरणी :- १०० किलो३)बागायत उशिरा पेरणी :- १२५ ते १५० किलोबीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाणास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यासाठी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन : 1) जिरायत पेरणी : ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीवेळी द्यावे.२) बागायत वेळेवर पेरणी : ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी व ६० कि. नत्र प्रतिहेक्टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.३) बागायत उशिरा पेरणी : प्रत्येकी ४० किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी व ४० किलो नत्र प्रतिहेक्टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन :गव्हाला द्या संरक्षित पाणीगहू पिकाला एकच पाणी देणे शक्य असल्यास ते लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे. हलक्या जमिनीमध्ये पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर गव्हाचे वाढीच्या संपूर्ण कालावधीत पाण्याची गरज असते. अपेक्षित उत्पादनासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाणी दिल्यास खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.
संकलन : प्रविण सरवदे,कराड
Share your comments