1. कृषीपीडिया

फक्त ५० हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षे खोऱ्याने पैसे घ्या

KJ Maharashtra
KJ Maharashtra
drumstics

drumstics

ग्रामीण भागामध्ये राहून जर एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही शेतीमध्ये थोडी सुधारणा करून व्यवसाय चालू करू शकता जसे की तुम्ही जर पारंपरिक पिके घेत असाल त्याचबरोबर तुम्ही आज काल मार्केट मध्ये जी मागणी आहे.ती मागणी त्याप्रकारे शेती मध्ये पिके घेऊन व्यवसाय करू शकता. जे की आरोग्यासाठी जी पिके आहेत ज्याची बाजारात ग्राहकांची मागणी आहे अशी पिके घ्या. या नगदी पिकांपासून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात.

सध्याच्या कलयुगामध्ये पाहायला गेले तर जी शेवग्याची शेंगेची जी शेती आहे ती केली तर तुम्ही खूप फायद्यात राहाल, जसे की आपल्याकडे आठवड्यातून १ ते २ वेळा तरी जेवणामध्ये शेवग्याची शेंग करतात. परंतु तुम्ही या व्यतिरिक पाहायला गेला तर शेवग्याची जी झाडे आहेत त्या झाडाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण पाहायला भेटतात.तुम्हाला जर शेवग्याच्या झाडाची शेती करायची असेल तर त्यास पाहिजे असा जास्त खर्च लागत नाही तसेच यामधून तुम्ही भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकता.

हेही वाचा:खरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जाती व जातीनिहाय माहिती

तुम्ही जर एक एकर मध्ये शेवग्याच्या झाडाची लागवड केली तर तुम्हास लाखो रुपयांचे उत्पादन मिळूशकते.शेवग्याच्या झाडात अनेक औषधी गुणअसल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढली आहे आणि यास मोठ्या प्रमाणात महत्व दिले जात आहे. मागणी वाढल्यामुळे शेवग्याच्या झाडाची शेती  मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यामुळे जगभरातील ग्राहक औषधी वनस्पती म्हणून शेवग्याच्या झाडाकडे पाहत आहेत. शेवग्याला वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा असे आहे. शेवग्याच्या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे तुम्ही शेवग्याच्या झाडांची लागवड करू शकता. शेवग्याचे जेवढे झाड उष्ण प्रमानात वाढते तेवढे हे झाड थंड वातावरणात वाढत नाही.शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून कमीत कमी ३०-३५ शेंगा आपल्याला भेटतात ज्या की प्रत्येक वर्षी आपल्याला त्यापासून वाढीव उत्पादनच बघायला भेटते.

शेवग्याचे जे झाड असते त्याच्या पानांची तसेच त्याला फुले सुद्धा असतात त्याची आपण भाजी करत असतो कारण ते एक औषधी वनस्पती आहे त्यामुळेआपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शहरातील जास्तीत जास्त ग्राहक बाजारामध्ये आरोग्यासाठी  जी चांगली भाजी  आहे जे की  त्यापासून आपल्याला शरीराला औषधी गुण भेटतात अशा भाज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत.त्यामुळे तुम्ही  जर  ग्रामीण भागात जास्त खर्च न करता तसेच जास्त भांडवल न गुंतवता जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून शेवग्याच्या झाडाची शेती करू शकता. बाजार भावात जर तुम्ही शेवग्याच्या शेंगेच्या भाव मिळाला तर अगदी चांगल्या आणि देशी शेंगेला १५ रुपये पावशेर म्हणजे ६० रुपये किलो ने भाव भेटतो त्यामुळे तुम्ही जे शेतामध्ये याची झाडे लावून व्यवसाय केला तर चांगले पैसे भेटतील.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters