जिब्रलिक अँसिड चा उपयोग भाजीपाला जोमाने वाढेल व्हावा यासाठी विषेशता केला जातो. ते कसे बनवायचे हे आपण पहानार आहोत.
जिब्रलिक ॲसिड हे आपल्याला घरच्या घरीच बनवता येते व खुप चांगला परिणाम ही पिकांवर दिसुन येतो. त्यामूळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरीच जिब्रलिक ॲसिड एसिड बनवावे त्यासाठी काही साहित्य लागतील.
साहित्य -
शंभर लीटर वेस्ट डिकंपोजर मलटीफ्लाय केलेले द्रावण. गावरान देशी गाई च्या शेण्या कींवा गौरया. दोन तीन कोरपडीची पाने ( आलविराची पाने).
क्रुती -
प्लास्टीक बरल मध्ये शंभर लीटर वेस्ट डिकंपोजर मलटीफ्लाय केलेले घ्या त्यामधे दहा ते बारा शेण्या टाका कोरपडीची पाने चांगली बारीक चिरून घ्या बरल मध्ये टाकुन घ्या शेण्या वर तरंगुनये म्हणुन शेण्या वर वजन ठेवा बरलचे तोंड बारदानाने झाकून ठेवा हे द्रावण आपल्याला ४८तास सावली मध्ये ठेवायचच आहे ४८तास नंतर शेण्या बाहेर काढुन घ्या हे तयार झालेल द्रावण म्हणजे जिब्रलिक अँसिड होय. हे जिब्रलिक अँसिड गाळुन घ्या हे फवारनीसाठी तयार आहे फवारनीसाठी प्रमाण पंपाला दोन लीटर टाका.
यामध्ये कोरपड आसल्यामुळे टाका मध्ये स्टिकर टाकन्याची गरज पडनार नाही कोरपडीमध्ये भरपुर प्रोटीन आसतात त्याचा फायदा भाजीपाल्याला होतो हे द्रावण मेथी कोथंबीर पालक शेपु गवार वांगी टोमटो या पिकांच्या जोमदार वाढीसाठी होतो बाजारातील जीए विकत घेण्यापेक्शा हे जिब्रलिक खूपच स्वस्त आणि फायदेशीर आहे. मित्रांनो या जिब्रलिक अँसिड चा उपयोग करून आपला पिके जोमाने वाढवा आणि वापर करा धन्यवाद मित्रांनो
अशाप्रकारे जिब्रलिक ॲसिड हे आपल्याला घरच्या घरीच बनवता येते व खुप चांगला परिणाम ही पिकांवर दिसुन येतो. त्यामूळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरीच जिब्रलिक ॲसिड एसिड बनवावे.
Share your comments