वर्षानुवर्षे एकाच जमिनीतून पाण्याच्या उपलब्धतेनुसार दोन किंवा तीन पिके घेतली जातात. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण व संतुलन बिघडत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आहे. सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज मर्यादित क्षेत्रातून
भागवायची आहे. अशा वेळी जमिनीची सुपीकता वाढविणे किंबहुना ती टिकून राहणे भविष्यात अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
कापुस-सोयाबीन भावासाठी विदर्भात जणआंदोलन उभारणार - राजु शेट्टी
Increasing soil fertility, in fact sustaining it, is essential for future food security.आपल्या जमिनीचा सामू दिवसेंदिवस वाढत म्हणजे विम्लयुक्त होत चालला आहे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.०१ ते ५ टक्के असावे. परंतु,
आपल्याकडील भौगोलीक परिस्थिती व वातावरण यामुळे ही मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.०२ पासून ते कमाल ०.०६ पर्यंत आहे. आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ‘ऑक्सिडेशन’ होते. उसाचे पाचट, कडबा, भाताचे तुस जाळणे,
रासायनिक खतांचा अमर्याद वापर आदी कारणांमुळे हा कर्ब कमी होत चालला आहे.सेंद्रिय कर्ब हे मातीतील असंख्य सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. सूक्ष्मजीव जमिनीतील खतांमधील अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात. हे लक्षात घेऊन जमिनीची सुपीकता वाढवण्याकडे लक्ष द्यावे.
Share your comments