श्रीलंका देशाने रातोरात सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून, सेंद्रिय या शब्दाची जग भरात नाचक्की करून सोडली आहे. सेंद्रिय शेतीचा उल्लेख केला की, श्रीलंका देशाचे उदाहरण आपल्या डोळ्या समोर येते. कृत्रिम रसायनांचा वापर न करता सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून करण्यात येणाऱ्या शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे मानले जाते. केंद्र शासनाने या देशात प्रचलित असलेल्या सर्व कृत्रिम रसायन विरहित शेती पद्धती ना याच नावा खाली आणले आहे. कारण त्यांना सेंद्रीय, जैविक, नैसर्गिक या शब्दांची परिभाषा समजावून सांगणारा एकही IAS अधिकारी मिळत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. अगदी आधुनिक कृषी शाष्राचा पंडित देखील यात गफलत करीत आलेला आहे त्यामुळेच सेंद्रिय शेती पद्धती आणि नैसर्गिक शेती पद्धती यातील फरक या बुद्धिहीन अधिकाऱ्यांना समजत नसावे असे मला वाटते.
मित्रानो, मूलतः जर आपण वैद्यानिक दृष्ट्टी कोनातून अभ्यासपूर्ण परीक्षण केले तर सेंद्रिय, नैसर्गिक, जैविक यातील फरक सहज लक्षात येण्या जोगा आहे.
कोणतीच शेती पद्धती ही रसायन मुक्त असू शकत नाही हे देखील तितकेच खरे आहे. मग रसायन मुक्त शेती करावी असा आग्रह का? असा विचार येणे साहजिकच आहे.
रसायन दोन प्रकारची असतात
१) कृत्रिम रसायन. जे आधुनिक कृषी पद्धतीत मोठ्या प्रमाणात वापरले जातात त्या सर्व निविष्ठा म्हणजेच रासायनिक खते, कीटक नाशक इत्यादी.
२) जैव रसायन. हे प्रत्येक सजीवात नैसर्गिक वाढीसाठी आणि सजीवाच्या जीवन क्रियेसाठी निसर्गानेच निर्मित केलेले असते उदा. मानवी शरीरातील सर्व ग्रंथींचे श्राव, वनस्पती मध्ये उपलब्ध असलेले क्लोरोफिल, त्यातील असलेले औषधी गुणधर्म ज्यांना अल्कॉ लाईड असे म्हणतात, या सर्व गोष्टी जैव रसायन म्हणून ओळखल्या जातात. म्हणून या पुढे रसायन मुक्त शेती न म्हणता कृत्रिम रसायन मुक्त शेती म्हणणे अधिक योग्य ठरेल.
मग आता आपण सेंद्रिय शेती , जैविक शेती आणि नैसर्गिक शेती यातील फरक समजावून घेवू.
१) सेंद्रिय शेती:-
मित्रानो जमिनीतील सुपीकता ज्या गोष्टीने मोजली जाते ते म्हणजे "हुमस" हा देखील जैव रासायनिक घटक च आहे. हुमस निर्मिती साठी जो घटक शेतीत आवश्यक आहे तो म्हणजेच "सेंद्रिय कर्ब" ज्याला आपण ऑरगॅनिक कार्बन असे म्हणतो, हा सेंद्रिय कर्ब शेतीत उपलब्ध करण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत ते म्हणजे , पाला पाचोळा, सजीव प्राण्यांचे अवशेष इत्यादी. आपल्याला हे माहीत आहे की या सर्व अवशेषांचा वापर करून सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढविता येतो, परंतु हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा नादात आपण काय चुका करतो हे मात्र शेतकऱ्याला कळत नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी नत्र कर्ब गुणोत्तर जर १:६ असेल तर ते नैसर्गिक पद्धतीने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पोषक ठरते,
यातून निर्माण होणारा हुमस देखील तितकाच शुद्ध आणि जमिनीला पोषक असतो. परंतु ही निर्माण क्रिया सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये अनुशासीत नसल्या कारणाने जमिनीत दुसरीच प्रक्रिया घडवायास सुरुवात होते. ती अशी.
सेंद्रिय शेतीत सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो, जसे शेण खत, गांडूळ खत, खाजगी कंपन्यांनी उत्पादित सिटी कंपोस्ट सेंद्रिय खते इत्यादी. ही खते तयार करताना कर्ब नत्र गुणोत्तरप्रमाण कोणीच राखलेले नसते, शिवाय सेंद्रिय खते तयार करताना घटकांची निवड देखील योग्य केलेली नसते त्यामुळे या खतात घटक हेवी मेटल्स जसे शिसे, जस्त , कडमियम यांचे अवशेष पहावयास मिळतात. त्यामुळे यांचं कर्ब नत्र गुणोत्तर नेहमी दोन टक्या पेक्षा जास्त असते. हे गुणोत्तर पिकांसाठी घातक ठरते ,शिवाय यांचा PH हा ६ पेक्षा कमी असल्याने खते ही अम्ल धर्मीय होतात व त्यातून जमिनीत व पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पहावयास मिळतो. शिवाय यांच्या निर्मितीच्या वेळी ग्रीन हाऊस वायूंचे उत्सर्जन होते ते वेगळेच. या खतांच्या वापरामुळे येणाऱ्या कृषी मालात म्हणजेच अन्न धान्य, फळे , भाजीपाला या मध्ये देखील हे हेवी मेटल्स चे अवशेष दिसून येतात. या मुळे किडनी फुफुस हृदय व मेंदू यावर वाईट परिणाम दिसून येतात. म्हणून कृत्रिम रासायनिक शेती इतकीच सेंद्रीय शेती धोक्याची आहे हे शाष्रशुद्ध मत माझे देखील आहे. त्या मुळे सेंद्रिय शेती पद्धत ही देखील जीव, जमीन पाणी आणि पर्यावरण यांच्या साठी उपयोगी नाही. परंतु या शेती पद्धतीचा हट्ट शासन का करते आहे हेच उमगत नाही.
२) जैविक शेती.
या शेती पद्धतीत गाईचे शेण ,गोमूत्र आणि कृत्रिम जिवाणू, मित्र बुरशी यांचा वापर केला जातो शिवाय ही उत्पादने प्रयोग शाळेत तयार करत असल्याने, निर्माण विधी जर सदोष असली तर त्यातून घातक जिवाणू बुरशी चे विपरीत परिणाम आपल्याला पहावयास मिळतात. म्हणून या पद्धतीत देखील काही राम नाही.
३) SPNF शेती.
आ. पाळेकर गुरुजींनी ही शेतीपद्धतीचे अगदी निसर्गाच्या नियमांना अनुसरून आपणास दिली आहे.
ही एकमेव शेती पद्धती आहे की ज्या मध्ये सर्वात कमी खर्चात हुमस निर्मिती सहज शक्य आहे.
कारण फक्त गाईचे शेण, गोमूत्र, विविध औषधी वनस्पती पासून तयार केलेल्या निविष्ठा आणि बिजामृत,जीवामृत, वाफसा, आच्छादन, आणि पिकांचे सहजीवन या पंचसूत्री चां वापर करून १०० टक्के विषमुक्त , नैसर्गिक शेती उत्पादन शक्य आहे.जो शेतकरी देशी किंवा सुधारित बियाणे वापरून आंतरपीक पद्धतीतून खर्चात बचत करून योग्य नियोजन करून SPNF शेती पद्धती अवलंबिल तर तो नीच्छित च शेतीतून परमार्थ साधेल असे मला वाटते. या पद्धतीमुळे देशच नाही तर संपूर्ण जग हे पुन्हा प्रदूषण मुक्त होवून निरोगी जीवन जगू शकेल. फक्त आवशकाता आहे ती निर्णय घेण्याची, श्रद्धा ठेवण्याची आणि SPNF शेती साठी कष्ट घेण्याची.मित्रानो, मी आशा करतो की आपणास या विविध शेती पद्धतीच्या परिभाषा समजल्या असतीलच .
या पुढे ग्रुप वर नैसर्गिक आणि सेंद्रिय यातील फरक सर्वांना लाखात येईल ही अपेक्षा ठेवतो.
डॉ.दीपक पाटील
SPNF शेतकरी . जळगाव.
Share your comments