शेतात तुरीचे एक सारखे पीक घेणे टाळा व पिकांची फेरपालट करून दर तीन वर्षानंतर किमान एकदा तुरीच्या शेतात दुसरे पीक घ्या. ज्वारीचे पीक किमान तीन वर्षातून एकदा तुरीच्या शेतात घेतल्यास तुरीवरील मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी होत असल्याचे आढळून आले आहे.तूर पीक पेरणी पूर्वी किमान दहा ते पंधरा गाड्या चांगले कुजलेले शेणखत प्रती प्रती एकर व त्यात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक या प्रमाणात मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्या व वखर पाळी देऊन चांगले जमिनीत मिसळून घ्या यामुळे जमिनीत
सूक्ष्मजीवांची व ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची वाढ होते जमिनीचे तापमान सुस्थितीत राखण्यास मदत होते व मर रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो शेतकरी बंधुंनो मारोती हा तुरी चा वान मर व वांझ रोगाला बळी पडत असल्याचे आढळून येत आहे त्यामुळे या वाणाची पेरणी टाळावी. शेतकरी बंधूंनो जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन मर रोगासाठी प्रतिकारक असलेले नवीन शिफारशीत वाण उदाहरणार्थ पीकेव्ही तारा, बीएसएमआर 736, बीडीएन 716, बीएसएमआर 853 यासारख्या वाणाची पेरणी करावी परंतु वाण निवडताना
जमिनीचा प्रकार व वाणाची इतर वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या संदर्भात तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच वाण निवडावे.पेरणीपूर्वी प्रथम Carboxin 37.5 टक्के अधिक Thiram 37.5 टक्के या मिश्र बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी व नंतर 15 ते 30 मिनिटानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून घ्यावी रोगग्रस्त शेतात तसेच पाणी असणाऱ्या जमिनीत तुरीचे पिक घेणे टाळावे आणि रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत. उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी त्यामुळे जमिनीतील शत्रु बुरशी जास्त तापमानामुळे निष्क्रिय होतील तुरीवरील ईरीयो फाईंड कोळी
करिता लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे किंवा तज्ञांचा सल्ला घेऊनच कोळी नाशक वापरावे.शेतकरी बंधूंनो वर निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा किंवा प्रतिबंधात्मक बाबीचा अंगीकार केल्यास तुरीवरील मर जळणे इत्यादी बाबीचा प्रतिबंध मिळू शकतो व नंतर होणारा अविवेकी व अवास्तव फवारणीचा खर्च सुद्धा कमी होतो. कृपया जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगा करिता वर निर्देशित उपाय योजना आहेत आणि नंतर विनाकारण फवारणीचा खर्च टाळा व व आपल्या हातात असलेले वर निर्देशित कमी खर्चाचे उपाय अमलात आणा
राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
Share your comments