1. कृषीपीडिया

खरीप हंगामातील भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

खरीप हंगामातील हा काळ भाजीपाला पिके घेण्याचा आहे. भाजीपाला शेती केल्यानं आपल्याला रोजचे चलन मिळत असते. व्यवस्थापन आणि विक्री तंत्र योग्य वापरलं तर आपल्याला भाजीपाला शेतीत जबरदस्त फायदा मिळत असतो. पण या फायद्या आधी आपल्याला भाजीपाला पिकांवरील कीड व्यवस्थापन जाणून घ्यावे लागेल. एकात्मिक कीड व्यवस्थापन कशाप्रकारे केले पाहिजे याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत....

किडीचे प्रमाण नुकसान करणाऱ्या पातळीखाली आणण्यासाठी कीड नियंत्रणाच्या वेगवेगळी पद्धत (नैसर्गिक पद्धत, मशागतीय पद्धत, यांत्रिक पद्धत, जाैविक पद्धत आणि रासायनिक पद्धत) एकत्रितपणे आणि सुसंगतपणे वापर करणे म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन होय.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती

प्रतिकारक जातींचा वापर, आंतरपिके, सापळा पिके, बीज किंवा राेपप्रक्रिया, पिकांची फेरपालट इत्यादी. यांत्रिक पद्धत, जमिनीची खाेल नांगरट, कीडग्रस्त भाग काढून नष्ट करणे इ.
जैविक पद्धत : परजीवी, परभक्षी, जीवाणू आणि विषाणू यांचा वापर करणे तसेच वनस्पतिजन्य कीडनाशकांचा वापर करणे.
रायासनिक पद्धत : रासायनिक कीडनाशकांचा गरजेनुसार वापर
 

भाजीपाला पिकांवर येणाऱ्या किडी

फळे पाेखरणारी अळी (Fruit borer)
 
पिके : टाेमॅटाे, वाटाणा, भेंडी, वाल, घेवडा, काेबीवर्गीय भाजी, बटाटे, मिरची
नुकसानीचा प्रकार : अळी प्रथमत: काेवळी पाने खाते. त्यानंतर अळी फळात प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयाेग हाेत नाही. पर्यायाने बरेच नुकसान हाेते.
 

एकात्मिक कीड व्यवस्थापन

आंतरपिके/सापळा पिके : पुनर्लागवडीच्यावेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी. टाेमॅटाेच्या प्रत्येक 15 ओळीनंतर 2 ओळी झेंडूच्या लावाव्यात. झेंडूची लागवड टाेमॅटाे लागवण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगाेदर करावी म्हणजे झेंडूला कळ्या लवकर लागून कीड झेंडूकडे अगाेदर जाईल. त्याचवेळी झेंडूवर कीडनाशकाची फवारणी करून टाेमॅटाेकडे जाणारी फळे पाेखरणारी अळीचे प्रमाण कमी करता येईल.

 

जाैविक नियंत्रण

लागवडीनंतर 40-45 दिवसांनी शेतात ट्रायकाेग्रामा चिलाेनिस कीटक प्रतिहेक्टरी 1 लाख याप्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा साेडावेत. हे कीटक फळे पाेखरणाऱ्या किडीच्या पतंगाच्या अंड्यात स्वत:ची अंडी घालतात. त्यामुळे फळे पाेखरणाळी कीड अंडीअवस्थेत नष्ट हाेते.

फळे पाेखरणाऱ्या अळीस विषाणूंपासून राेग निर्माण हाेतात. तेव्हा असे विषाणू प्रयाेगशाळेत वाढवून त्यांचे द्रवस्वरूपात उपयाेग करतात. हेलिओथिस ल्यूक्लिअर पाॅलिहेड्राेसीस व्हायरस (एचएएनपीव्ही) या नावाने हे विषाणू ओळखले जातात. एचएएनपीव्ही 200 मि.ली. 200 लिटर पाण्यातून सायंकाळच्यावेळी साध्या हातपंपाने फवारावे. सेंद्रिय घटकांचा वापर करून नियंत्रण : यामध्ये वनस्पतिजन्य कीडनाशकांचा वापर करता येताे. उदा. निंबाेळी अर्क (5%) व्यवस्थापनाच्या इतर बाबी
शेतात एकरी 5 याप्रमाणात कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांचा उपयाेग किडींचे आगमन आणि प्रमाण आजम वण्यासाठी हाेताे.
किडलेली फळे वेळाेवेळी काढावीत आणि खाेल खड्ड्यात गाडून टाकावेत.
 

रासायनिक व्यवस्थापन

किडींचे प्रमाण 10 ट्न्नयांपेक्षा जास्त असल्यास पुढीलप्रमाणे फवारणी करावी. नवीन कीडनाशकामध्ये स्पायनाेसॅड 45 एससी. 60 मिली. किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्क+ ट्रायझाेाॅस 35 टक्के ईसी (संयुक्त कीटकनाशक) 400 मिलि किंवा कार्बाेसल्ान 200 मिलि किंवा ट्रायझाेाॅस 400 मिलि किंवा इन्न्डाेक्झाकार्ब 200 मिलि 200 लिटर पाण्यात साध्या हातपंपाने फवारावे.

रस शोषणाऱ्या किडी : तुडतुडे, मावा, पांढरी माशी, फुलकिडे, लाल कोळी इ.
पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या : वांग्यावरील शेंडे व फळे पोखरणारी अळी, भेंडीवरील फळे पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी, मेलॉन वर्म, नाग अळी, फळमाशी, खोडमाशी, चौकोनी ठिपक्यांचा पतंग व पाने गुंडाळणारी अळी इ.
 

 

रस शोषणाऱ्या किडी  (sucking pests) तुडतुडे (Jassids)

यजमान पिके : वांगी, भेंडी, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे इ.
नुकसानीचा प्रकार : पिले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडावरील बाजूस वळतात.
तसेच पानांच्या कडा करपतात. नंतर पूर्ण पाने वाळतात.
यालाच हॉपर बर्न असे म्हणतात. यामुळे बरेच नुकसान होते. तसेच हे कीटक वांग्याच्या पर्णगुच्छ (लिटल लीफ) या मायकोप्लाझमा रोगाचा प्रसार करतात.
 
मावा (हळवी)

पिके : वांगी, भेंडी, टोमॅटो, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, काोबीवर्गीय भाजी, बटाटे, मिरची इ.
नुकसानीचा प्रकार : पिले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा खालील बाजूस वळतात.
तसेच पाने पिवळी पडतात. यामुळे बरेच नुकसान होते. तसेच हे कीटक त्यांच्या शरीरातून पारदर्शक चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या बुरशीमुळे पानांची कर्बग्रहण क्रिया कमी होते. तसेच हे कीटक वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे या पिकांमध्ये माेझॅक या विषाणूजन्य राेगांचा प्रसार करतात.

हेही वाचा : शेतातील यशासाठी भाजीपाला काढणीदारम्यान व काढणीपश्चात व्यवस्थापन आहे महत्त्वाचे

पांढरी माशी

पिके : वांगी, भेंडी, टाेमॅटाे, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे, मिरची इ.
नुकसानीचा प्रकार : पिले आणि प्राैढ पानांच्या खालील बाजूस राहून पानांतील रस शाेषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा खालील बाजूस वळतात. तसेच पाने पिवळी पडतात. यामुळे बरेच नुकसान हाेते. तसेच हे कीटक त्यांच्या शरीरातून पारदर्शक चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ हाेते. या बुरशीमुळे पानांची कर्बग्रहण क्रिया कमी हाेते. तसेच हे कीटक वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे या पिकांमध्ये लीफ कर्ल (बाेकड्या) या विषाणूजन्य राेगांचा प्रसार करतात.
 
फुलकिडे (Thrips)
 
पिके : कांदा, टाेमॅटाे, वेलवर्गीय, मिरची, लसूण इ.
नुकसानीचा प्रकार : पिले आणि प्रौढ पाने खरवडतात आणि पानांतील रस शाेषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात तसेच पाने पिवळी पडतात. तसेच हे कीटक वेलवर्गीय भाजी, बटाटे, टाेमॅटाे या पिकांत स्पाॅटेड विल्ट या विषाणूजन्य राेगांचा प्रसार करतात. 
 
लाल काेळी (Mites)
 
पिके : वांगी, भेंडी, टाेमॅटाे, वाल, घेवडा, वेलवर्गीय भाजी, बटाटे, मिरची इ.
नुकसानीचा प्रकार : पिले आणि प्राैढ पानांच्या खालील आणि वरील बाजूस राहून पानांतील रस शाेषून घेतात.
त्यामुळे पानांतील हरितद्रव्य कमी हाेते, पाने पिवळी पडतात.
तसेच पानांवर जाळी तयार हाेते. झाडांची वाढ खुंटते. यामुळे बरेच नुकसान हाेते.
 

एकात्मिक कीड व्यवस्थापन

 

बीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया केलेले बियाणे वापरणे.
रोपवाटिका · राेपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी गादीवाा तयार करावा (3 x 1) त्यात खालीलप्रमाणे खते आणि औषधे वापरावीत (वांगी, टाेमॅटाे, मिरची, कांदा, काेबी इत्यादीसाठी).

शेणखत 1-2 पाट्या

निंबाेळी पेंड 2-3 किलाे

काॅपर ऑक्झीक्लाेराइड 20-30 ग्रॅम किंवा ट्रायकाेडर्मा पावडर 25 ग्रॅम या बुरशीनाशकांची ड्रेचिंग करावी व गरज पडल्यास डायमेथाेएट 30 ईसी 10 मिली. 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी.

हेही वाचा : सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
 

लागवडीचे वेळी
 
आंतरपिके : पुनर्लागवडीचेवेळी मुख्य पिकांच्या कडेने मका आणि चवळी लावावी.
राेपप्रक्रिया : पुनर्लागवडीचेवेळी इमिडाक्लाेप्रिड 10 मिली किंवा कार्बाेसल्ान 10 मिली.10 लिटर पाणी या द्रावणात राेपांची मुळे 1 तास बुडवून नंतर लावावीत. पुनर्लागवडीचेवेळी शेतात निंबाेळी पेंड हेक्टरी 1000-15000 किलाे टाकावी.
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी कार्बाेफ्युरान 65 किलाे किंवा फोरट 20 किलाे प्रतिहेक्टरी या प्रमाणात प्रत्येक राेपाभाेवती राेप लावल्यानंतर रिंग पद्धतीने टाकून मातीने बुजवावे.
 
लागवडीनंतर
 
डायमेथाेएट 10 मिलि किंवा इमिडाक्लाेप्रिड 5 मिलि किंवा कार्बाेसल्ान 10 मिलि किंवा ट्रायझाेाॅस 20 मिलि किंवा थायमेथाेक्झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आठवड्याच्या अंतराने गरजेनुसार फवारण्या कराव्यात.
जाैविक कीडनाशकांमध्ये व्हर्टिसिलीयम लेकॅनी 50 ग्रॅम किंवा मेटाऱ्हायझम अ‍ॅनीसाेपली 50 ग्रॅम, 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
अधूनमधून 5 टक्के निंबाेळी अर्काची फवारणी करावी.

लाल काेळी या किडीसाठी पुढीलपैकी एका कीडनाशकाची फवारणी गरजेनुसार करावी. पाण्यात मिसळणारी गंधक पावडर 30 ग्रॅम किंवा डायमेथाेएट 10 मिली+पाण्यात मि सळणारी गंधक पावडर 20 ग्रॅम किंवा व्हर्टिसिलीयम 40 ग्रॅम किंवा फेनपायराॅक्झिमेट 10 मिली किंवा प्राेपरगाइट 20 मिलि. किंवा फेनाक्झाक्विन 20 मिलि किंवा इथियाॅन 10 मिलि प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साध्या हातपंपाने फवारणी करावी.

शेंडे आणि फळे पाेखरणारी अळी (Shoot and fruit borer)
 

यजमान पिके : वांगी
· नुकसानीचा प्रकार : अळी प्रथमत: काेवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. त्यानंतर अळी फळात प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयाेग हाेत नाही. पर्यायाने बरेच नुकसान हाेते.
 

एकात्मिक कीड व्यवस्थापन
 

पुनर्लागवड करताना : वांग्याची राेपे इमिडाक्लाेप्रिड 10 मिली प्रति 10 लिटर पाण्याच्या द्रावणात 2 ते 3 तास बुडवून नंतर लागवड करावी. शेताच्या कडेने मका+चवळी यांची लागवड करावी. लागवडीनंतर 40-45 दिवसांनी शेतात ट्रायकाेग्रामा कीटक प्रतिहेक्टरी 1 लाख या प्रमाणात 7 दिवसाचे अंतराने 2-3 वेळा साेडावेत. किडलेले शेंडे वेळाेवेळी खुडून काढावेत आणि खाेल खड्ड्यात गाडून टाकावेत. शेतात एकरी 40 या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत. किडीचे प्रमाण 10 ट्न्नयांपेक्षा जास्त असेल तर खालीलप्रमाणे फवारणी करावी. निंबाेळी अर्क 5 टक्के, बीटी जिवाणू 10 ग्रॅम 10 लिटर पाणी कार्बाेसल्ान 10 मिलि किंवा ट्रायझाेाॅस 20 मिलि 10 लिटर पाण्यातून. नवीन कीडनाशकांमध्ये स्पायनाेसॅड 45 एससी. 5 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्के ईसी + ट्रायझाेाॅस 35 टक्के ईसी (संयुक्त किटकनाशक) 20 मिलि किंवा क्लाेरॅनट्रॅनीलीप्राेल 17.8 एसएल 3 मिलि 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.
 
 
मेलाॅन वर्म : पाने आणि फळे खाणारी अळी (Melon worm)
 
· यजमान पिके : वेलवर्गीय भाजी (कलिंगड, कारले, खरबूज, काकडी इ.) · नुकसानीचा प्रकार: अळी पाने खात असल्याने वेलीवर पाने शिल्लक राहत नाहीत. त्याचबराेबर ती फळांत प्रवेश करून फळांचे नुकसान करते. त्यामुळे अशा फळांचा खाण्यासाठी उपयाेग हाेत नाही. पर्यायाने 50-60 टक्के नुकसान हाेऊ शकते.
· हवामानानुसार प्रादुर्भाव : या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ परंतु पाऊस नसलेल्या काेरड्या हवामानात जास्त हाेताे. तसेच उन्हाळ्यातही 30-35 डिग्री तापमानात प्रादुर्भाव दिसून येताे. परंतु तापमानात वाढ झाल्यास किडीचे प्रमाण घटते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन · किडलेली फळे अळीसह काढून नष्ट करावेत किंवा खाेल खड्ड्यात गाडून टाकावेत.
· पानांखाली असलेले काेष काढून नष्ट करावेत.
· किडीचे प्रमाण 5 ट्न्नयांपेक्षा जास्त असेल तर पुढील रासायनिक कीडनाशकांची गरजेप्रमाणे फवारणी करावी.
कार्बाेसल्ान 200 मिलि. किंवा ट्रायझाेाॅस 400 मिलि किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्का+ट्रायझाेाॅस 35 टक्के (संयुक्त कीटकनाशक) 400 मिलि किंवा क्लाेराेपायरीाॅस 400 मि लि एकरी 200 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.
 
नागअळी (Leaf miner)
 
· यजमान पिके : वेलवर्गीय भाजी (कलिंगड, कारले, खरबूज, काकडी इ.) वाल, घेवडा, टाेमॅटाे, वाटाणा, भेंडी, बटाटे.
· नुकसानीचा प्रकार : अळी पानांत राहून आतील भाग पाेखरते. त्यामुळे पानांवर नागमाेडी रेषा दिसतात आणि पानांतील हरितद्रव्य कमी हाेते. पर्यायाने बरेच नुकसान हाेते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
 

किडलेली पाने अळीसह काढून नष्ट करावीत.
माशींची संख्या कमी करावयाची असल्यास पिवळया प्लॅस्टिकच्या पताकांना चिकट द्रव्य (ग्रीस) लावून शेतात लावाव्यात.
किडींचे प्रमाण 10 ट्न्नयां पेक्षा जास्त असल्यास पुढीलप्रम ाणे फवारणी करावी.
सेंद्रिय पदार्थांचा वापर : निंबाेळी अर्क 4 टक्के

रासायनिक व्यवस्थापन : कार्बाेसल्ान 200 मिलि किंवा ट्रायझाेाॅस 400 मिलि किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझाेाॅस 35 टक्के (संयुक्त कीटकनाशक) 400 मिलि. क्लाेराेपायरीाॅस 400 मिलि. किंवा इथिऑन 40 टक्के + सायपरमेथ्रीन 5 ईसी (संयुक्त कीटकनाशक) 400 मिली. एकरी 200 लिटर पाण्यातून गरजेप्रमाणे 10 ते 15 दिवसांचे अंतराने साध्या हातपंपाने फवारावे.
 
फळमाशी (Fruit fly)
 
·पिके : वेलवर्गीय भाजी (कलिंगड, कारले, खरबूज, काकडी इ.) · नुकसानीचा प्रकार : अळी फळांत राहून आतील भाग पाेखरते. त्यामुळे फळे वाकडी हाेतात तसेच फळे सडतात आणि पक्व हाेतात. पर्यायाने बरेच नुकसान हाेते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन · किडलेली फळे अळीसह काढून नष्ट करावीत किंवा खाेल खड्ड्यात गाडून टाकावीत.
 फळ माशीचे प्राैढ आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. त्यासाठी रक्षक सापळे वापरावेत.
 किडींचे प्रमाण 10 ट्न्नयांपेक्षा जास्त असेल तर निंबाेळी अर्क 5 टक्के किंवा मेलॅथिऑन 400 मिलि. अधिक 2 किलाे गूळ एकत्र घेऊन 200 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने सायंकाळच्या वेळेस फवारावे.
 
खाेड माशी (Stem fly)
 
यजमान पिके : घेवडा, वाटाणा आणि साेयाबीन
नुकसानीचा प्रकार : अळी खाेडाच्यावर असलेल्या सालीच्या आत राहून आतील भाग खाते. त्यामुळे खाेडाच्या वरील साल तडकते. त्यामुळे राेपे मरतात. पर्यायाने नुकसान हाेते.
 
एकात्मिक कीड व्यवस्थापन
 
पीक उगवल्याबराेबर निंबाेळी अर्क 5 टक्के किंवा सायपरमेथ्रीन 10 ईसी 10 मिलि. 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
किडलेली झाडे अळीसह काढून नष्ट करावीत.

चाैकाेनी ठिपक्यांचा पतंग (Diamond back moth)
 
पिके : पानकाेबी, ुलकाेबी, नवलकाेल, माेहरी इ.
नुकसानीचा प्रकार : ही काेबीवर्गीय पिकांमध्ये सर्वात म हत्त्वाची कीड आहे. या किडीमुळे 50-60 टक्के नुकसान हाेऊ शकते. अळ्या लहान हिरव्या असून त्यांना स्पर्श केल्यास त्या जलद हालचाल करतात.
त्या पानांवरच काेषावस्थेत जातात. प्रथमत: अळ्या पानांचा वरचा पापुद्रा खातात. नंतर पाने कुरतडून खातात. त्याम ुळे पानांची चाळण हाेते. गड्डे खराब हाेतात. तसेच अळ्या फुलकाेबीच्या गड्ड्यात राहून नुकसान करतात. अशा गड्ड्यांना चांगला भाव मिळत नाही. किडींचा प्रादुर्भाव फेब्रुवारी या महिन्यात अधिक असताे.
 
पाने गुंडाळणारी अळी (Leaf roller)
 
यजमान पिके : पानकाेबी, फुलकाेबी, नवलकाेल, माेहरी इ.
नुकसानीचा प्रकार : अळी हिरवी असून चाैकाेनी ठिपक्यांच्या पतंगाच्या अळीपेक्षा माेठी असते. तिच्या शरीरावर काळे पट्टे 
असतात. ती पाने खाते तसेच पाने गुंडाळून त्यात राहते. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांची चाळण हाेते. त्यामुळे गड्डे पाेसत नाहीत. पर्यायाने फार नुकसान साेसावे लागते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
 

लागवडीच्या वेळी : काेबी किंवा फुलकाेबी लावण्यापूर्वी मुख्य पिकाच्या 25 ओळींनंतर दाेन ओळींत माेहरी पेरावी.
राेपप्रक्रिया : पुनर्लागवडीचेवेळी राेपे ट्रायकाेडर्मा 50 ग्रॅम अधिक कार्बाेसल्ान 10 मिलि 10 लिटर पाणी या द्रावणात 2 तास बुडवून नंतर लावावीत.

पुनर्लागवडीचेवेळी शेतात निंबाेळी पेंड हेक्टरी 1000- 1500 किलाे टाकावी.
 
लागवडीनंतर
 
शेतात पक्ष्यांच्या थांब्यासाठी काठीचे अ‍ॅन्टीने (मचाण) लावावेत. तसेच हेक्टरी 10 फेराेमाेन सापळे लावावेत.
 माेहरीवर अळ्या दिसू लागताच डायक्लाेरव्हाॅस 10 मिली किंवा क्लाेराेपायरीाॅस 20 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे.
 काेबीचे गड्डे धरण्यापूर्वी 1 ली फवारणी बीटी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून.
 2 री फवारणी (पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी निंबाेळी अर्क 5 टक्के)
3 री फवारणी (पुनर्लागवडीनंतर 60 दिवसांनी बीटी जिवाणू 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून
 4थी फवारणी (पुनर्लागवडीनंतर 75 दिवसांनी) प्राेेनाेाॅस 20 मिलि किंवा कार्बाेसल्ान 10 मिलि किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझाेाॅस 35 टक्के (संयुक्त कीटकनाशक) 20 मिलि प्रति 10 लिटर पाणी
त्यानंतर गरज पडल्यास नवीन कीडनाशकामध्ये प्रयाेगातून परिणामकारक दिसून आलेले स्पिनाेसॅड 2.5 एससी 10 मिलि 10 लिटर पाण्यातून किंवा क्लाेरॅनट्रॅनीलीप्राेल 17.8 एसएल 2 मिलि किंवा इंडाेक्झाकार्ब 10 मिलि 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters