तूर पिकावर सुरुवातीच्या काळात मावा, फुलकिडे व तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भावहोतो. या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास डायमिथोएट( 30 टक्के प्रवाही) 500 मिली अथवा क्विनॉलफॉस( 25 टक्के प्रवाही) 1000 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारावे. तुरीच्या पिकाचे खरे आर्थिक नुकसान पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या काळात ही पिसारी पतंगाचीअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंग माशी अशा तीन प्रकारच्या अळ्यांमुळेतुरीच्या उत्पादनात घट येते.
या लेखात आपण तूर पिकाच्या एकात्मिक कीड आणि जैविक नियंत्रण पद्धती विषयी जाणून घेऊ.
तूर पिकावरील एकात्मिक कीडनियंत्रण पद्धती….
1-बांधावरील तने आणि कीडग्रस्त शेंडा काढून मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. खोल नांगरणी केल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या आळीची सुप्तावस्था पक्षी व सूर्याच्या होता त्यामुळे नष्ट होते.
2- त्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्क आणि 2% साबणाचा चुरा या मिश्रणाच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कराव्यात.
3- क्रायसोपा या भक्षक किडीच्या पन्नास हजार अंडी हेक्टरी किंवा ट्रायकोग्रामा या परोपजीवी किडीचा दीड लाख अंडी हेक्टर सोडावीत.
एचएनपीव्ही 250 आवळ्याचा अर्क आणि टीपॉलयांचे मिश्रण एक आठवड्यांच्या अंतराने फवारावे.
5- शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव तीव्रता समजण्यासाठी हेक्टरी चार वेगवेगळे कामगंध सापळे पिकांच्या एक ते दोन फूट उंचीवर लावावेत. रासायनिक कीटकनाशकांची तुरीला कळ्या लागताच 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून एक ते दोन फवारण्या केल्यास किडीपासून चांगले संरक्षण मिळते.
जैविक नियंत्रण पद्धती
पिकांच्या उपद्रवकारक किडीचे परोपजीवी कीड किंवा विषाणू द्वारे नियंत्रण करावे. या पद्धतीमध्ये परोपजीवी कीटक आता सूक्ष्म जिवाणूंचा वापर करता येतो.शेंगा पोखरणाऱ्या आळीसाठी एचएनपीव्ही हे प्रभावी असे विषाणूयुक्त जैविक कीटकनाशक आहे.
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पाचशे मिली विषाणूग्रस्त यांचा अर्कहेक्टरी या प्रमाणे फुलोऱ्यात अथवा शेंगा लागताना फवारावा. जैविक कीटकनाशकाची फवारणी सकाळी आता संध्याकाळी करावी म्हणजे त्याची तीव्रता कमी होणार नाही. तसेच सूर्यप्रकाशातील अपायकारक किरणांपासून बचाव होण्यासाठी एक ग्रॅम नीळ व विषाणूचा संरक्षण व संवर्धनासाठी एका अंड्याचा पांढरा बलक 10 मिली जैविक कीटकनाशक एचएनपीव्ही दहा लिटर पाण्यातून हेक्टरी फवारावे. हे औषध अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरावर विषाणूंची वाढ होते व त्यामुळे आळ्या पाच ते सात दिवसात मरतात.
(संदर्भ- शेतकरी मासिक)
Share your comments