1. कृषीपीडिया

टोमॅटोवरील किडींची माहिती आणि किडींचे नियंत्रण

सध्या महाराष्ट्रात नव्हेतर एकंदरीत पूर्ण भारतात भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. विविध भाजीपाला पिके नगदी पीक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कालावधीही कमी असतो व कमी दिवसात येत असल्यामुळे कमी दिवसात चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

KJ Staff
KJ Staff


सध्या महाराष्ट्रात नव्हेतर एकंदरीत पूर्ण भारतात भाजीपाल्याची लागवड वाढली आहे. विविध भाजीपाला पिके नगदी पीक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कालावधीही कमी असतो व कमी दिवसात येत असल्यामुळे कमी दिवसात चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. अन्य भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये टोमॅटो हे भाजीपाला पीक अत्यंत महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्राच्या आणि भागांमध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड होते.  परंतु काही दिवसांपासून टोमॅटोवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होताना दिसतो, त्यामुळे उत्पन्नात नको तेवढी घट येते. त्यामुळे या लेखात आपण टोमॅटोवरील किडी व त्या किडींचे नियंत्रण कसे करावे याबाबत माहिती घेणार आहोत. टोमॅटोवरील किडींची माहिती घेताना फळ पोखरणारी अळीची सर्वप्रथम माहिती घेऊ.

 फळ पोखरणारी अळी

ही कीड टोमॅटो पिकामध्ये अतिशय नुकसान करू शकते. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे कमीत-कमी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. यावेळीचा उद्रेक प्रामुख्याने पाने, फुले, फळे इत्यादी पिकाच्या प्रमुख भागांवर होतो. या अळीचा रंग हिरवट असतो आणि बाजूला तुटक करड्या रंगाच्या असतात रेषा असतात. या किडीची पतंग मादी झाडाच्या पानांवर अंडी घालते, तसेच घातलेल्या अंड्यांचा रंग पिवळसर असतो. जेव्हा हे अंडी उबवतात त्यापूर्वी या अंड्यांचा रंग फिकट लाल होतो. अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये या समुहाने राहतात व टोमॅटोच्या कोवळ्या पानांचा फडशा पाडतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर ही आणि फळे पोखरायला सुरुवात करते.

 नियंत्रण

याचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकास जास्त प्रमाणात दिसल्यास मॅलॅथिऑन ३५ टक्‍के प्रवाही ४०० मिली किंवा सायपरमेथ्रीन ५०  टक्‍के प्रवाही ३५० मिली एकरी फवारणी करावी. मोनोक्रोटोफासने बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येते किंवा एकरी ५ किलो ग्रॅम फोरेट जमिनीत टाकले तरी अळीचे कोश जमिनीत असल्यामुळे त्यांचा नायनाट होऊ शकतो.

 


पाने खाणारी अळी

टोमॅटो पिकातील ही कीड आंतरराष्ट्रीय म्हणून ओळखण्यात येते. ही कीड टोमॅटो व्यतिरिक्त कोबी, वांगे, वेलवर्गीय पिके इत्यादी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव आढळतो. तिच्या सुरुवातीच्या काळात या किडीचा पतंग साधारणतः २२ मीमी लांबीचा असतो. पंखांचा रंग फिकट करडा व त्यावर नागमोडी रेषा असतात. या प्रकारच्या अळीची शरीर रचना पाहिली तर ही फुगरी आणि गुळगुळीत शरीराची दिसते. हिचा रंग हिरवा किंवा पिवळा असतो तसेच अंगावर काळ या प्रकारच्या खुणा असतात. साधारणतः प्रौढ अळीची लांबीही ४० मिमी असते. ही कीड समूहाने संपूर्ण पानांचा फडशा पाडते व संपूर्ण पिकावर हल्ला चढवते. साधारणतः इ किडी टोमॅटोच्या पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याने अंडी घालते. सुरुवातीच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कोवळी रोपे खाऊन नष्ट करतात. तसेच झाडाची वाढ होत असताना या अळ्या एकट्या जमिनीत पालापाचोळा व भेगात लपून राहतात रात्र होताच परत झाडाची पाणी खावयास सुरुवात करतात.

  नियंत्रण

या अळीच्या प्रादुर्भावाचा सुरुवातीला जर बीटी डेल्फीम जिवाणूची फवारणी केली तर चांगला फायदा होतो. अळ्या गोळा करून त्यांचा नाश करावा. अंड्याची पुंजके असलेले झाडाची पाने तोडावीत व झाडांपासून वेगळी करावी. तसेच फोरेट दहा टक्के एकरी पाच किलो ग्रॅम पेरून ओलिताचे पाणी द्यावे. पीक काढणी झाल्यानंतर लगेच जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे कोश उघडे पडतात व उन्हामुळे मरतात. रासायनिक नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० इसी १० मिली पाण्यातून फवारणी किडीवर प्रभावी नियंत्रण करता येते.

  टोमॅटोवरील मावा

 साधारणतः टोमॅटो पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळत नाही. मावा किडीपासून काही प्रजातीच्या विषाणूंचा प्रसार होतो. मावा किडीचे दोन प्रकार पडतात पहिला म्हणजे पंखाचा मावा आणि दुसरा म्हणजे बिन पंख्यांचा मावा. मावा किडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कीड पचलेले गोड द्रव्य गुद्दारातून  बाहेर टाकते. ते खाण्यासाठी मुंगळे जमा होतात. त्यामुळे मुंगळे मावा किडीच्या ठिकाणी आढळतात. मावा पिल्लांची अवस्था नऊ दिवस असते. एक मादी दररोज २२ पिलांना जन्म देते. पिलांचा रंग हिरवट करडा असतो.

 


मावा किडीवर नियंत्रण

 नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड( ऊलाला,कॉन्फिडोर ) १० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा मिथाईल डिमॅटॉन साडेतीनशे मिलीची एकरी फवारणी करावी.

  पांढरी माशी

 पांढरी महाराष्ट्र ही बहुतांश पिकांमध्ये आणि भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये आढळते. जसे टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी इत्यादी. या किडीचा आकार ०.५ मिमी कमी असतो तसेच तिचा रंग भुरकट पांढरा असतो. तर डोळ्यांचा रंग लाल असतो. या किडीचे पिल्ले प्रौढ शरीरावर केस असतात. हे प्रामुख्याने रसशोषक किडी आहे, त्यामुळेच प्रादुर्भाव आनंतर पानांचा रंग पिवळा होतो. या किडीमुळे फळगळ व फुल गळ होते व मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, पिकाची प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते.

   नियंत्रण

 या किडीच्या नियंत्रणाकरिता मिथाईल पर्येथिओन ०.०४ टक्के, मिथाईल डिमेटोण  ०.१ टक्के, लेथिऑन शून्य पॉईंट १५ टक्के किंवा इमिडाक्लोप्रिड १० मिली १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी. यापैकी एका वेळी एकाच किटकनाशकाची फवारणी करावी.

  टोमॅटोवरील फुलकिडे

 या किडीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाची पाने पिवळी पडतात व वाढ खुंटते. नवीन फुटणारी फूट ही अनियमित होते.  या किडीमुळे बुरशी आणि विषाणूच्या बीजाणूचा प्रसार होतो. विशेष म्हणजे ही कीड वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर प्रसारित होते. टोमॅटो पिकाचा जो कोवळा भाग असतो त्या भागात ही कीड राहते.

नियंत्रण

 या किडीच्या नियंत्रणाकरिता मिथाईल डिमेटोन ०.०२ टक्के वापरावे.  तसेच वरती सांगितल्याप्रमाणे इमिडाक्लोप्रिड ( ऊलाला, कॉन्फिडोर) १० मिली १५ लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. त्यामुळे चांगला फायदा होतो व ही कीड चांगली नियंत्रणात येते.

 

 
तसेच टोमॅटो पिकावर मिलीबग, तुडतुडे, लाल कोळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. चांगल्याप्रकारे रासायनिक आणि जैविक नियंत्रण केले तर नक्कीच परिणाम मिळून उत्पन्न चांगले येते. साधारणतः मावा, तुडतुडे, पांढरी माशी यावर इमिडाक्लोप्रिड वापरणे फायद्याचे असते. इमिडाक्लोप्रिड ने १००% या किडी  नियंत्रणात येतात.

English Summary: Insect control and pest control on tomatoes Published on: 20 September 2020, 06:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters