1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो पुदिन्याची लागवड करून आपण बनू शकता लखपती! जाणून घ्या पुदिना शेतीविषयी.

खरे पाहता उत्तर प्रदेशातील बदायू, रामपूर, मुरादाबाद, बरेली, पीलीभीत, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, लखनौ इत्यादी जिल्ह्यांमध्ये पुदिन्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून पुदिना या जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याचे प्रमुख पीक म्हणून आपले स्थान निर्माण करत आहे. पुदिनाचे तेल सुगंधासाठी आणि औषध बनवण्यासाठी वापरले जाते. गेल्या दोन हंगामापासून पुदिना तेलाची किंमत सुमारे 1200 ते 1800 रुपये प्रति किलो असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगलेच वाढत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pudina farming

pudina farming

खरे पाहता उत्तर प्रदेशातील बदायू, रामपूर, मुरादाबाद, बरेली, पीलीभीत, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, लखनौ इत्यादी जिल्ह्यांमध्ये पुदिन्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून पुदिना या जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याचे प्रमुख पीक म्हणून आपले स्थान निर्माण करत आहे. पुदिनाचे तेल सुगंधासाठी आणि औषध बनवण्यासाठी वापरले जाते. गेल्या दोन हंगामापासून पुदिना तेलाची किंमत सुमारे 1200 ते 1800 रुपये प्रति किलो असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगलेच वाढत आहे.

 यामुळे शेतकऱ्यांनी पुदिना लागवड सुरू केली आहे. एक एकरात शेतकऱ्यांना पुदिना लागवडीसाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च येतो, तर सुमारे एक लाख रुपयाचे पुदिना तेल तयार होते. अशा प्रकारे एकरी सुमारे 70 हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त, भटक्या प्राण्यांपासून होणारे नुकसान देखील खूप कमी आहे, कारण बहुतेक प्राण्यांना Peppermint (पुदीना) ची चव आवडत नाही, या व्यतिरिक्त, जर आपण उन्हाळ्यात पुदिनाची शेती केली तर त्यातून उत्पन्न दुप्पट मिळते.

 

भारत हा जगातील सर्वात मोठा पुदिनाच्या तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार आहे.  यूपीमध्ये पुदिना तेलाचे सर्वाधिक उत्पादन होते.  देशातील मेंथा तेलाच्या एकूण उत्पादनात यूपीचा वाटा सुमारे 80 टक्के आहे. संभल, रामपूर, चंदौसी हे पश्चिम उत्तर प्रदेश हे पुदिनाचे प्रमुख उत्पादक क्षेत्र आहेत, तर लखनौजवळील बाराबंकी जिल्हा हे पुदिना तेलाचे प्रमुख उत्पादन क्षेत्र आहे.  याशिवाय पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेशच्या काही भागात तराई भागातही पुदिनाची लागवड केली जात आहे. महाराष्ट्रात देखील पुदिनाची लागवड करतात परंतु खुप थोड्या प्रमाणात याची लागवड होते. पुदिना सामान्यपणे औषधे, सौंदर्य उत्पादने, टूथपेस्ट तसेच कन्फेक्शनरी उत्पादनांमध्ये वापरली जाते.

 

 

पुदिना शेतीविषयी काही टिप्स

 

  • पुदिना लागवडीसाठी, रेताड चिकणमाती आणि जमीनचा पीएच 6-7.5 असावा तसेच पुरेसे बायोमास असणारी, चांगले निचरा होणारी जमीन,योग्य आहे.

 

  • शेत चांगले नांगरून, जमीन समतल केली जाते. पुदिनाची लागवड केल्यावर लगेचच शेतात हलके पाणी दिले जाते.

 

  • पुदिना मुळांची रोपवाटिकेत ऑगस्ट महिन्यात लावली जातात. नर्सरी उंच ठिकाणी बनवले पाहिजे, जेणेकरून पाणी साचणार नाही. मुसळधार पाऊस पडल्यावर नर्सरीतून पाणी काढून टाकावे.

 

 

  • साधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केली जाते. परंतु, नवीन जातीच्या विकासामुळे जानेवारीतही लागवड शक्य झाली आहे. याशिवाय अर्ली मिंट तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे.

 

  • या शेती तंत्रामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. सहसा, एक किलो पुदिना तेलाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 500 रुपये खर्च करावे लागतात.

परंतु हे तंत्रज्ञान आल्यामुळे खर्चात सुमारे 200 रुपये प्रति किलोने घट झाली आहे.  यामुळे शेतकरी पुदिना लागवडीकडे वळले आहेत.

English Summary: information of pudina farming Published on: 04 September 2021, 01:21 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters