लोणार सरोवर - कमळजा देवीचे मंदिर, बारवेचा सुरेख दगडीकामात कोरलेला संपूर्ण परिसर
सिंदखेडराजा - मातृतीर्थ जिजाऊंचे जन्म ठिकाण, म्हणजेच माहेर घर. प्राचीन वाडा, प्राचीन शिल्प, प्राचीन काळातील दैनंदिन वापरतील वस्तू इथे पाहायला मिळतात. मोती तलाव,लखुजी जाधवांची समाधी व काही प्राचीन मंदिरे.
हिवरा आश्रम - येथील स्वामी विवेकानंद आश्रम मनाला शांती देणारं सुरेख ठिकाण. तिथूनच जवळ ओलांडेश्वेर ठिकाण, इथं नदीतील अप्रतिम असं महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल.
मेहकर - प्रसिद्ध अस बालाजी मंदिर, नरसिंह मंदिर, कंजनी महल, दुर्ग बोरी, सप्त ऋषीचं ठिकाण
पावसाळ्यात खडकपुर्णा धरण, तेथूनच जवळ देऊळगावराजाला बालाजी मंदिर, जुनी प्राचीन बारव आणि इथंच आता नवे झालेले विविध बियाण्यांचे हब तुम्ही पाहु शकता, जोगेश्वरी महादेव मंदिर पिंप्री आंधळे या गावात.
बुलडाणा पासून 20 km चिखली - साकीगाव, सातगाव-भुसारी येथील डोळयांची पारणं फेडणारी हेमाडपंथी प्राचीन मंदिरे
बुलडाणा पासून 50 km मेहकर रोड वर शेंदुर्जन - चक्रधर स्वामींचा मठ आहे. पुढे गेलात की एक मोठी गढी, प्राचीन राममंदिर आहे
बुलडाणा पासून 40 km अमडापूर - प्रसिद्ध असं बल्लाळ देवीचं मंदिर आहे. नवरात्रीत तुम्ही जाऊ शकता. अनेक प्राचीन खुणा तिथे आजही आहे. सोबतच तेथे प्राचीन असा हजरत मुसावली बाबाचा दर्गासुध्दा आहे.
बुलडाणा पासून 16 km डोंगरशवली - इथं शिवमंदिर आहे अगदी प्राचीन. इथून येताना बुलढाणा जिल्ह्यातील आनंदवन म्हणुन ओळखलं जाणारं ‘सेवा संकल्प’ प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता. येतांना भादोल्यातील काही मंदिर देखील पाहू शकता.
बुलडाणा पासून 13 km बोथा घाटात तुम्ही जंगली सफारीला जाऊ शकता. या जगंलात एकच नदी तुम्हाला सात ठिकणी भेटते. जैविक संपत्तीने समृध्द असा बोथा घाट आहे.व खूप सुंदर असे वन्य जीव व विविध पक्षीअभयारण्य आहे तिथे ओपन जिप्सी चा आनंद घेऊ शकता.
त्याच प्रमाणे बोरखेड,तारापुर येथे विश्वगंगा नदीच्या काठावर1021 शिवलिंग व महादेवाचे मंदिर आहे व परिसर खुप सुंदर आहे
शेगाव - गजानन महाराज संस्थानाला तुम्ही भेट देऊ शकता. गेल्यानंतर फक्त आमच्या शेगावच्या संस्थानाच्या आत मधील स्वच्छता आणि शिस्त यांचा मेळ नक्की बघसाल आणि येतांना आठवणीने शेगाव कचोरी खाऊन या. अजून एक आता तर आनंद सागर बघण्याचा स्टे पण उठवला आहे, तुम्ही तिथे देखील जाऊ शकता. तिथून पुढे नागझरीला देखील जाऊ शकता. येतांना औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या खामगावला देखील भेट द्या. तिथली खादी आणि चांदी एकेकाळी फार जगप्रसिद्ध होती.
बुलडाणा पासून 45 km नांदुरा गेला तर तिथं भव्य-दिव्य हनुमानाची प्रतिमा तुम्हाला पाहायला भेटेल.
सातपुडा पर्वत रांगाची पर्वणी आम्हाला लाभलेली आहे. त्यात सलाईबन नावाचं एक सुरेख, अद्भुत गाव मंजितसिंग सरांनी उभं केलय, तिथं नक्की भेट दया. सलाईबनला तुम्हाला आदिवासी लोकांची संस्कृती जवळून पाहायला मिळेल.
बुलडाण्यावरुन हाकेच्या अंतरावर फक्त 3 km जर जायचं असेल तर हिवाळ्यात पावसाळ्यात राजुर घाट विविधतेने नटलेला असतो. तेथे सनसेट पॉईंट व सनराईज व व्ह्यू पॉइंट आहे व प्रतिकृती तिरुपती बालाजी मंदिर आहे, घाट ओलांडून पुढे गेला कि थोडं आत एक शिवमंदिर आहे. तिथून छान झुळझुळ एक छोटी नदी वाहते. जुनी मोठमोठी वडांची झाड आहेत. परत येतांना मोठं असं धम्मगिरी लागतं. तिथली तेजदार बुद्धाची मुर्ती पाहून मनाला समाधान मिळतं.
बुलडाण्यापासून 14 km अजिंठा रोड वर जवळच गिरडा नावाचं गाव आहे. तेथे तुम्ही जाऊ शकता. स्वयंप्रकाश बाबांच्या समाधीस्थळाजवळ भव्यदिव्य बांधकाम चालू आहे. चहुबाजूने निसर्ग सौन्दर्य ने नटलेला असतो व काळी भिंत पाहण्या सारखी आहे खुप शांत अशी रमणीय जागा आहे
बुलडाण्यातून 50 km तुम्ही अजिंठ्याच्या लेणी पाहायलासुध्दा जाऊ शकता. त्याचं वर्णन तर शब्दात करणं अशक्य आहे.
बुलडाणा पासून 19 km अजिंठा रोड वर जाळीचा देव जिथं निसर्गाच्या कुशीत नटलेले ठिकाण मराठीचा पहिला आदय ग्रंथ लिहला गेला.श्री चक्रधरांनी काही काळ मुक्काम केला एक मुखी दत्त मंदिर असं ते ठिकाण. तिथून पुढे गेलात कि एक कालिंका देवीचं डोंगराच्या आत कोरलेल मंदिर आहे. पाण्यासाठी प्राचीन काळात दगडात तयार केलेले 52 कुंड आहे. निसर्गाचा हा अविष्कार अनुभवायला तुम्ही नक्की जा.
बुलडाणा पासून 18 km- अजिंठा रोड वर गिरडयापासून जवळच असलेल्या बुधनेश्वरला देखील तुम्ही जाऊ शकता. नदीचा उगमस्थान तिथे आहे. अन प्राचीन शिवमंदिर तिथे तोंड फुटलेला मोठा नंदी आहे.
बुलडाणा पासून अजिंठा रोड वर 40 km शिवना गावाचा किल्ला पाहून तुम्ही पुढे आमसरीला जाऊ शकता. भारी ठिकाण आहे. छान धबधबा पडतो डोंगरावरुन. समोर संपूर्ण डोंगररांग. त्यात वसलेले छोटे छोटे गाव. मस्त नजराना असतो हिवाळ्यात.
बुलडाणा पासून 10 km देऊळघाटला प्राचीन किल्ला आहे. पण अगदी बोटावर मोजण्याइतके अवशेष तिथं शिल्लक आहेत. त्या किल्लाबाबात असं सांगतात की, घाटाखालच्या रोहिणखेडला देखील असाच एक किल्ला आहे. पुर्वीच्या काळी काही संदेश दयायचे असले तर देऊळघाटच्या किल्ल्यावर ठराविक प्रकारचे गवत जाळले जात. तर त्याचा धुर रोहिणखेडच्या किल्ल्यावर दिसायचा. धुराच्या रंगावरुन संदेश नेमका सुखाचा आहे की दु:खाचा आहे हे कळायचे
बुलडाणा पासून 25 km मोताळा येथून जवळच जयपूर गाव आहे. तेथे आजही श्री गजानन महाराज यांच्या पादुका व मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री आणि पायविहीर आहे.
खामगाव मधील लासुरा खुर्द, खामगाव गोंधणपूरचा किल्ला, बाळापुरचा किल्ला, गढयांचं गाव म्हणून ओळख असलेलं चिंचपूरही तुम्ही पाहायलाच हवं.
जळगांव जा. तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथील 450 वर्षा पूर्वीचे हेमाड पंथी श्री सुपो महाराज मंदिर येथील वर्षातून तीन वेळा खेळला जातो एक आगळा वेगळा कुत्रोत्सव येथील वैशिष्ट्य आहे.
बुलडाणा पासून 35 km अंतरावर मंदिरांचं गाव म्हणून चांडोळची एके काळी ओळख होती. चांडोळ गावात अनेक प्राचीन शैलीत बांधलेले दगडी मंदिरं आहे.
संग्रामपूरला जटाशंकर नावाचा धबधबा आहे. पावसाळ्यात तुम्ही तिथे जाऊ शकता.
बुलडाणा पासून 35 km चिखलीजवळच तपोवण इथं देवीचं मंदिर आहे. रेखीव अशी आखणी करुन हे बांधकाम केले आहे.
बुलढाणा पासून 21 km सैलानी बाबा दर्गा – चिखलीजवळील हे ठिकाण हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे.
संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्य. सातपुड्याच्या कुशीत मस्त लपून बसलेले हे अभयारण्य आहे.
मेहुणा राजा ..संत चोखामेळा यांचे जन्मस्थान.
अशी असंख्य लहान-मोठी ठिकाणे आपल्या बुलडाणा जिल्ह्यात आहेत. तुम्ही ती नक्की पाहायला हवी
बुलडाणा पासून 17 km वर रोहिनखेड आहे येथील प्राचीन मशिद व हेमांडपंथी शिवमंदिर
31 बुलडाणा पासुन 18 km मर्दडी.. मातेचे हेमाडपंथी व 365 दिवस गो मुखातुन पाणी वहाते असे रामकुंड आहे व देवी चे मंदिर आहे
धावडा या गावाजवळील वडाळी येथील सीडी घाट कालिंका माता मंदिर.
बुलडाणा पासून 20 km तारापुर, येथे राजा हरीशचंद्र तारामती काळातील जागृत देवस्थान आहे.व तिथे पडलग धरणावर बोटिंगची सफारी आहे
मोताळा तालुक्यातील कोथळी येथें जागृत हेमाडपंथी महादेव मंदिर असून पाहण्या सारखे आहे
बुलडाणा पासून 30 km मोताळा जवळ टाकरखेड शनिदेव येथें जागृत शनिमंदिर स्वयंभु शनिशीळ आहे.
पैनगंगा नदी चे उगमस्थान बुलडाणा जवळ 15 km अजिंठा पर्वत बुदनेश्वर ला आहे
Share your comments