नमस्कार मंडळी आज आपन सेंद्रिय शेती मध्ये महत्त्वाचे काही घटक आहे.सेंद्रीय शेती म्हटले की नवनविन प्रयोग आलेच समजा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहे. जितके सेंद्रिय शेतकरी तेवढेच प्रयोग मला याच पद्धती ची माहिती आज तुम्हाला दयायची आहे शेती ही पद्धती च्या आधारावर केल्या जाते.
सेंद्रिय खताचे प्रकार कीती आहे व कार्य थोडक्यात समजून घेऊ ते म्हणजे जमिनीची स्थिती व पोत सुधारण्या साठी खताची आवश्यकता असते. खतांमुळे पिकांना आवश्यक अशी अन्न हे जमिनीतून मिळते. पिकांना उपयुक्त अशा महत्त्वाच्या हजारो जिवाणूंची वाढ व संगोपन होते.
जमिनीचीपोकळी वाढून त्यांची पाणी व हवा भरून ताकद वाढते. मुख्य म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, हाडांचे खत, मासळीचे खत, पेंढीचे खत, गोबर गॅस,शेण मातीचे रबडीचे खत इत्यादी विविध खतांचा या मध्ये समावेश होतो.अश्या खताद्वारे पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य घटकांचे प्रमाण वेगवेगळे आहे. या खताद्वारे होणाऱ्या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो यामुळे जमिनीची सुपिकता वाढून तिची जैविक स्थिती सुधारली जाते त्याच बरोबर पिकांचे चांगले पोषण करण्यास मदत करते. परिणाम आपल्या पीकाची उत्पादनात वाढ होते.
सेंद्रिय पदार्थ या पदार्थामध्ये प्रामुख्याने शेणखत,कंपोस्ट खत तसेच विष्ठेपासून तयार होणारे सोनखत, हिरवळीचे खत, गांडूळखत, साखर कारखान्यातील मळी, कंपोस्ट खत आणि त्यापासून इतर सेंद्रिय घटक द्रव्ये पुरविणाऱ्या पदार्थाचा समावेश होतो.
सेंद्रिय खत यामध्ये विशेष करून हाडे, पेंडीपासूनचे खत, शिंगापासून व जनावरांच्या खतापासून तयार झालेले खत यांचा समावेश करता येईल.
आता हेच बघा किरकोळ सेंद्रिय कचरा पिकांच्या विविध घटकांपासून तयार होणारे निरनिराळे पदार्थ उदा. शेतातील काडीकचरा, पाचट, भुसा, मुळे, जनावरांचे अर्धे कुजलेलेअवयव आणि मलमुत्र यांचा समावेश यात होतो.
आता माहिती सेंद्रिय खतांची काही नवं नविन प्रकार आहेत. शेणखत विशेषत जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेषही असतात.सोनखता मध्ये मानवाने उत्सर्जित केलेली घाण विष्ट व मूत्र यांचा समावेश असतो.
नक्की वाचा:नव्याने फळबाग लागवड केली आहे का? तर अशा पद्धतीने करा व्यवस्थापन आणि जोपासना
लेंडीखत शेळ्या मेंढ्यांच्या घाण विष्ट व मूत्र यांचा समावेश असतो
कोंबडी खत या मधे कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव व घन स्वरूपातील विष्ठा एकत्र साठवलेली असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे.
विविध पेंडीचे खतअखाद्य व तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडीचा वापर बहुतेक करून सेंद्रिय खत किंवा किटकनाशक म्हणून केला जातो.
कत्तलखाना मधे जनावरांच्या रक्ता पासुन
त्याच प्रमाणे कत्तलखान्यामधून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थातील जनावरांच्या रक्ताचे रूपांतर सेंद्रिय खतात केलेले असते . त्याच बरोबर हाडांचे खत (बोन मील) जनावरांच्या हाडांपासून खत बनविण्यासाठी ताजी अथवा वाकलेली हाडे वापरतात शिंगाचे खतहॉर्न मील : जनावरांच्या इतर अवशेषांपासून म्हणजे शिंगे व खुर यांपासून बनविलेले हे एक उपयुक्त सेंद्रिय खत आहे मासळीचे खत फिश मील अखाद्य मासे व मत्स्य खाद्यप्रक्रिया कारखान्यातून बाहेर टाकण्यात येणाऱ्या अवशेषांपासून हे खत बनविले जाते.हिरवळीची खते वनस्पतींच्या हिरव्या अवशेषापासून तयार केलेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हणतात.
टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा प्रक्रियेद्वारे पुनर्वापर शेतात प्रचंड प्रमाणात पिकांचे अवशेष आढळते आम्ही शेती व शेतकरी यांच्या साठी ही संकल्पना लक्षात घेवून त्या बाबत प्रत्येक शेतकरी यांना समजेल अश्या सोप्या शब्दात समजावून सांगण्याचे काम करणार आहे..... धन्यवाद मित्रांनो
*Save the soil all together*
*मिलिंद जि गोदे*
*ध्यास सेंद्रिय शेती चा*
*शेती बलवान तर शेतकरी धनवान*
Share your comments