1. कृषीपीडिया

तुमच्या पिकावर किडी-रोग येण्याचे संकेत देणारी (इंडिकेटर) पिके

KJ Maharashtra
KJ Maharashtra
संकेत देणारी (इंडिकेटर) पिके

संकेत देणारी (इंडिकेटर) पिके

अनेक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी व रोग बदलत्या हवामानामुळे येत असतात, त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा शेतकऱ्यांची नुकसान त्याठिकाणी नक्कीच होते.

त्यामुळे आपल्या पिकांवर कोणत्या किडी येणार आहेत व कोणते रोग येणार आहेत याचे संकेत आपल्याला जर मिळाले तर नक्कीच आपण त्या किडींवर व रोगावर लवकर मात करू शकतो.
पहिला मावा मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. त्यावरून ओळखायचे, आपल्या पिकात तो येणार.
शेपूचा शेंडा पांढरा पडला तर बुरशी येण्याचे संकेत.
मेथीवर पांढरे डाग पडले तर बुरशी येण्याचे संकेत.
मक्‍याची सिंगल लाइन करून त्याचे कंपाउंड केले व कांदा शेतातही लावल्यास थ्रिप्स कमी येतो. मक्‍याच्या पोंग्यात मित्रकीटक लवकर तयार होतात. मक्‍यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो. तो कांद्यावर येत नाही.

झेंडूची झाडे शेतात अधिक असली तर लाल कोळी आधी झेंडूला खातो. सूत्रकृमीलाही झेंडू अटकाव करतो.
गोमूत्र व मीठ फवारणीने काळा मावा नियंत्रणात येतो.
करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायची, मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात पाने टाकायची. मावा मरतो.
हिरवी मिरची व लसूण व गरजेएवढे थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची, त्यामुळे अळीचे नियंत्रण होते.
एका एकरात आठ तुळशी लावल्या तर त्याच्या वासाने शत्रुकीटक पिकाजवळ येत नाहीत. रणदिवे यांच्याकडे तुळशीची सुमारे दोनशे झाडे आहेत. त्याच्या आजूबाजूला रोग-किडींचे प्रमाण नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.

लिंबाच्या पाल्याची वा गवरीची जाळून राखुंडी तयार करून ती पिकावर धुरळल्यास नागअळी नियंत्रणात येते.
रसशोषक किडींसाठी चिकट सापळे उपयुक्त ठरतात. फळमाशीसाठी गंध रसायन (ल्यूर) चिकट सापळ्याच्या ठिकाणी ठेवल्यास ती तेथे येऊन सापळ्याला चिकटते

स्रोत - इंटरनेट
प्रतिनिधी गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters