1. कृषीपीडिया

भारताचे सोनं म्हणजे करडी तेल

आज जगावर युद्धाची छाया आहे.रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या जीवावर उठले आहेत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
भारताचे सोनं म्हणजे करडी तेल

भारताचे सोनं म्हणजे करडी तेल

आज जगावर युद्धाची छाया आहे.रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या जीवावर उठले आहेत याचे साधे कारण त्यांचे अर्थकारण आणि खनिज तेलावर हुकमत मिळवणे हे आहे.

आखाती देशात अमेरीकेने जे जे काही केलं याच्या मुळाशी पेट्रोल हेच होते.हे दोन्ही ही देश तेल साठ्यां साठी काही ही करायला तयार आहेत.

आता प्रश्न आमचा आपल्या कडे तेलाचे साठे नाहीत.त्या मुळे आम्हीं केवळ जागतिक भिकारी झालो आहोत दुसरे काही नाही.

१३० कोटी लोकांची हक्काची बाजार पेठ असताना आम्हीं नुसत्या आयातीचा धडाका लावलेला आहे.

जो थोडाफार जी.डी.पी दर टिकून आहे तो केवळ कृषी क्षेत्रा मुळे आहे.

अर्थातच यात शेतकरी बांधवांचे योगदान मोठे आहे.

असे असताना दरवर्षी अत्यंत विषारी असणारे पाम तेल आयात करून येथील कृषी पूरक तेल व्यवसाय आणि त्यावरती अवलंबून पडणारे लघुउद्योग आम्हीं रसातळाला घातले आहेत.

करडईचे दोन प्रकार आहेत, ज्यापासून करडई तेल बनते.एका प्रकारचे तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स(ओलेईक ॲसिड) हे जास्त प्रमाणात असते तर दुसऱ्या प्रकारात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड(लिनोलेईक ॲसिड) असते.सध्या बाजारात पहिल्या प्रकारातील खाद्यतेल असते . यातील सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण ऑलिव्ह ऑईल पेक्षा कमी असते. दुसऱ्या प्रकाराचा वापर हा लिन्सिड ऑईल ऐवजी पेंटिंगमध्ये करण्यात येतो.पांढऱ्या पेंटमध्ये याचा वापर जास्त करतात कारण याला लिन्सिड ऑईल वापरल्यामुळे येणारी पिवळी झाक येत नाही.

दरवर्षी 95 हजार कोटीच्या आसपास आम्हीं हे अत्यंत विषारी पाम तेल आयात करत आहोत.

दरवर्षी फक्त तेलाचा विचार करू या!एव्हडा पैसा जरी आपल्या शेतकरी बांधवांच्या अर्थव्यस्थेत मुरला तरी त्यात केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर देशाच्या समृद्धीचे गणित सामावलेले आहे.

केवळ स्वस्त मिळते म्हणून आम्हीं हे विष आयात करण्याचा मूर्ख पणा का करतो आहोत याचा ही विचार केला पाहिजे.

सर्वात महत्वाचे म्हणजे तेल निर्मिती साठी आपणांस कोरडवाहू क्षेत्र लागते आजही आपल्या महाराष्ट्रात 83% जमीन कोरडवाहू आहे.

बागायती जमीन धारक साखर कारखाने चालवतील ते त्यांचे पाहून घेतील.साखर कारखानदारी तरी काय साखर नावाचे पांढरे जहरच निर्माण करीत आहे.साखरेचा तुटवडा निर्माण झाला तर लोकं काही तडफडून मारणार नाहीत.तरीही कोट्यावधी रुपयांचा चुराडा साखर कारखान्यांवर केला जात आहे.

इथे ही कोरडवाहू क्षेत्रावर अन्यायच होत आहे.कोरड वाहू क्षेत्राला तेल उद्योग हे वरदान ठरू शकतो नव्हे तर ती आपल्या देशाची मोठी ताकत होती.

पण आम्हीं त्याचा कधीच विचार केला नाही आणि आज ही करत नाही.

नुसती करडईच नव्हे तर,तीळ,मोहरी,भुईमूग, या आरोग्यवर्धक तेलाचे उत्पादन जरी आम्हीं देशात वाढवले या पाम तेलाची आयात बंद केली तर एक जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताची किमान वाटचाल तरी सुरू होऊ शकते.

GREEN OIL POWER म्हणून भारत जगाच्या क्षितिजावर येऊ शकतो. यात महत्वाचे म्हणजे याला आपल्याच देशाची बाजारपेठ उपलब्ध आहे.कुणाच्या दारात जाऊन विक्रीसाठी हात पसरण्याची गरज नाही.

आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आपला पारंपरिक तेल उद्योग परत उभा राहिला पाहिजे.

कोरडवाहू शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीचा आधार घेत हजारो एकर वर करडई चे उत्पादन घेऊन आपल्याच मालावर प्रक्रिया करणारे तेल कारखाने उभारण्याची खूप गरज आहे.

गावो गावी परत तेल घाणे जिवंत झाले पाहिजेत.

तेल ही आज ही आपली फार मोठी ताकत आहे.

सरकारने या पाम तेलाच्या माध्यमातून भेसळीला सरळ सरळ परवानगी दिली आहे.

तुम्हीं चार पैसे जास्त देऊन जरी करडई,अथवा,शेंगदाना तेल विकत घेतले तरी त्यात पामतेल मिक्स केले जात आहे.

हा सरकारने लोकांच्या आरोग्याशी खेळणारा किळसवाणा प्रकार ही ताबडतोप बंद केला पाहिजे...

आपला भारत देखील GREEN OIL POWAR बनू शकतो.

फक्त येणाऱ्या तरुण पिढीने आपल्या डोळ्यावरची झापडं उघडली पाहिजेत.

 

संकलन - विजय भुतेकर

English Summary: India's gold means kardi oil Published on: 10 March 2022, 02:06 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters