आज शेती व जिवाणू घ्या संदर्भात लेख तयार केला आहे. काही बाबी आपल्या लक्षात येईल.विषय हा आपल्या शेतीमधील जिवाणू चां आहे.विज्ञान म्हणत की एक इंच मातीमध्ये कोटी जीवाणू असतात.मग काही तज्ञ पेरणीपूर्वी बियाण्यास जिवाणू कल्चर ची शिफारस का करतात? यांचा अर्थ असा होतो की जमीनीमधे जिवाणू नाहीच मग आपल्याला पुन्हा सांगतात की ते जीवाणू सुप्तावस्थेत राहतात.पुन्हा शेतकरी यांची फसवणूक ते सांगातात आपन करतोच. मला सर्वांना हेच सांगायचे आहे की शेती हा एकमेव विषय आहे की त्या मधे लिहिण्यात व शेतावर जाऊन मेहनत करण्यात खुप फरक आहे.
शेती मध्ये जीवाणू ची वाढ नाहीतर त्यांचे अन्न वाढवावे लागेल.उदा०आपल्या कडे जनावरे भरपूर आहे पण आपल्या कडे चाराच उपलब्ध नाही तर जनावरे चांगले राहील का कुपोषित राहील हे शेती च्या बाबतीत घडतंय.जीवाणु तर भरपुर आहे ते आज उपाशी आहे.
आपल्याला माहीत असेल जिवाणू तेव्हाच तयार होतात व वाढतात तेव्हा त्यांना अन्न असते आणि अन्न आहे ऑरगॅनिक कार्बन किंवा ह्युमस. आता हेच पहा ना तुम्हाला मुंग्या एका जागेवर गोळा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल? त्यांना शोधत बसाल की साखर किंवा गुळ टाकाल अगदी त्याप्रमाणे जिवाणूंचे अन्न वाढवा जमिनीत ते आपोआप येतील. जसे गांडूळ जमिनीत वाढले तर जिवाणू ही वेगाने वाढतात. अर्थात आपण जर जमिनीचे सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन सुधारले तर जिवाणूंची वृद्धी आपोआप होते व त्यामुळे जिवाणू ला लागणारी अन्नसाखळी तयार होते. मित्रहो जिवाणू घ्या अन्नसाखळी बद्दल आत्मविश्वासाने बोलणारे शेतकरी अजून नाही भेटले.शेतजमिनीच्या जिवाणू संवर्धनात सेंद्रिय पदार्थ आणि जमिनीचे आरोग्य याला महत्त्वाचे स्थान आहे.
जमिनीच्या मुख्य पाच घटकांपैकी सेंद्रिय पदार्थ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकांची मुळे, पाला-पाचोळा, भरखते, वगैरे कुजून त्यापासून जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते. सजीव प्राण्यांच्या अवशेषांपासूनसुद्धा सेंद्रिय पदार्थ जमिनीस मिळतात म्हणजे जिवाणू चे अन्न निर्माण करणारी यंत्रणा तयार होत असते.आपल्या शेतजमिनीतील जिवाणूंना सेंद्रिय पदार्थांमधून अन्नाचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थ हळूहळू कुजत असतो. त्यामुळे जिवाणू ला पोषन मिळत जाते. सेंद्रिय पदार्थांमुळेच पोषणद्रव्ये विद्राव्य स्थितीत उपलब्ध होतात. उदा०हवेतील नत्र वनस्पतींना घेऊ शकत नाहीत. वनस्पतींच्या मुळांवरील गाठींतील जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीमध्ये सोडून देतात आणि मग वनस्पतीची मुळे ते शोषून घेतात व पिकांची वाढ होते.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्याची क्रिया ही मुख्यतः जिवाणू वर आधारित असते.मला हेच सांगायचे आहे जीवाणू हा कर्बा चे कारखाना आहे.जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, इ एम ,जीवामृत स्लरी ,ऍझो, रायझो, पीएसबी,ट्रायकोईन,सायडेरो, अलरायझा हि जैविक खतेच आहेत, स्वस्त आणि कमी खर्चात ती देता येतात. या जैविक खतामुळेच किंवा जीवणूमुळेच आपल्याला उत्पन्न मिळते आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न कमीच मिळते.
याचे एक उदाहरण देतो ज्या जमिनीची लेव्हल केलेली असते त्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळतच नाही, कारण जसे दूध तापवून थंड झाल्यावर त्याला साय येते, म्हणजे साय हा दुधाचा पौष्टीक पदार्थ असतो, तसे जमिनीत वरचा 1 विथचा जो थर असतो तो म्हणजे जमिनीचा पौस्टिक पदार्थ असतो, त्यातच सर्व प्रकाचे जिवाणू असतात आणि हाच 1 विथ जमिनीचा थर लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो व जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो .
Share your comments