1. कृषीपीडिया

परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट; आता...

Rabi Season: या वर्षी परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट निर्माण झाले आहे.

परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट

परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट

Rabi Season: या वर्षी परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांसमोर विजेची मोठी समस्या

शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे ग्रामीण भागात खराब झालेले ट्रान्सफॉर्मर तर दुसरीकडे वीज बिले न भरलेल्या शेतकऱ्यांसमोर विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशा दुहेरी संकटात नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, विजेचा समस्या निर्माण झाल्या आहेत. पेरणी नंतर पाण्याची आवश्यकता असते.

हेही वाचा: ''विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव''

काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारांची चोरी झाली आहे. हे संकट असताना थकबाकीदार शेतकऱ्यांचे विद्युत वितरण कंपनीने चार महिन्यापूर्वी तोडलेले विज कनेक्शन अशा अनेक बाबी रब्बी हंगामासाठी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी विजेचा प्रश्न आणि इतर प्रश्न सोडवण्याची मागणी रब्बी हंगामाच्या पेरण्या अगोदर केली आहे.

हेही वाचा: मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नंदूरबार जिल्ह्यातला शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने भरडला जात आहे. शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

परिसरातील दहा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि 20 ते 22 खांबावरील विजांच्या तारांची चोरी झाली आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा: बेरोजगार मजुरांसाठी सरकार देणार 5000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा: धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित

English Summary: Another big crisis facing the farmers after the return rains and heavy rains Published on: 04 November 2022, 10:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters