अलीकडच्या काळात शेततळ्यातील मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित होत आहे. शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते. शेततळ्यात कार्प जातीच्या माशांचे संवर्धनरोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) माशांचे संवर्धन करता येते.शेततळ्यात कोळंबीसह कार्प जातीच्या माशांचे संवर्धन
1) प्लॅस्टिक अस्तर नसलेल्या शेततळ्यांत कार्प माशांबरोबर गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी (मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी) चे संवर्धन करता येते.Freshwater jumbo shrimp (Macrobrachium rosenbergii) can be cultured with fish. 2) प्लॅस्टिक अस्तर असलेल्या शेततळ्यातील कोळंबी संवर्धनाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
वांग्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वापरा प्रकाशसापळे, वाचा आणि विचार करा
कोळंबी तळाला रहाते, म्हणून शक्यतो कोळंबी आणि कार्प माशांचे एकत्र संवर्धन करताना कोळंबीला जागा आणि खाद्यासाठी स्पर्धा करणारे मृगळ/कॉमन कार्प या माशांची साठवणूक करू नये. साधारणपणे 8 ते 10 फूट खोल असलेल्या शेततळ्यात कोळंबी संवर्धन करणे अधिक फायदेशीर ठरेल.
मत्स्यजिऱ्यांचे बोटुकली बीजापर्यंत संवर्धन1) शेततळ्यात बोटुकली आकाराच्या बीजाची (50 ते 150 मिमी आकाराचे) साठवणूक केल्यास मत्स्यबीज बेडूक, वाम, इ. भक्षक प्राण्यांची शिकार होणार नाही. तसेच बोटुकली आकाराच्या माशांमध्ये रोगप्रतिकारक व ताण सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने माशांच्या जगवणुकीचे प्रमाण अधिक राहते. पर्यायाने शेतकऱ्याला अधिक उत्पादन मिळते.2) सर्वसाधारणपणे कार्प माशांची पावसाळ्यात पैदास (बीज-निर्मिती) होते. मात्र पावसाळ्यात भौगोलिक परिस्थितीनुसार सगळीकडेच पाऊस पडतोच असे नाही, त्यामुळे शेततळ्यात पाणी
असेलच असे नाही. जसजसा पाऊस पडतो त्याप्रमाणे शेततळी भरतात. पुढे मत्स्यबीजाची मागणी वाढत जाते. मात्र, त्या वेळी मत्स्यबीज पैदास केंद्रात बीज उपलब्ध असेलच असे नाही. 3) शेततळ्यातील मत्स्य नर्सरी शेततळ्यांचा आकार लक्षात घेता प्रति शेतकऱ्याला 2,000 ते 4,000 नग मत्स्य बोटुकली बीजाची आवश्यकता असते, मात्र मत्स्य बोटुकलीच्या खरेदीसाठी लांबवर जावे लागते. त्यासाठी खर्चही जास्त येतो. शिवाय बीज- वाहतूक करताना मरतूक होण्याचीही शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात
घेता, एका विशिष्ट भागामधील, उदा. गाव, तालुका इ., शेततळी असणाऱ्या शेतकऱ्यांनी (एक अथवा समूहाने) पावसाळ्यात मत्स्यबीज केंद्रातून मत्स्यजिरे (4-5 मि.मी. आकाराचे) आणून 45-60 दिवस संगोपन केल्यास बोटुकली आकाराचे (50 ते 150 मिमी आकाराचे) मत्स्यबीज तयार होते. म्हणजेच शेततळ्याचा नर्सरी म्हणून उपयोग करावा. अशा बोटुकली आकाराच्या बीजाला मागणीही खूप असते शिवाय दरही चांगला मिळतो.4) मत्स्यजिऱ्यांचा खरेदी दर 7,000 ते 10,000 रुपये
प्रतिलक्ष आहे. तर मत्स्यबोटुकलींचा विक्री दर किमान दोन रुपये प्रति नग एवढा मिळू शकतो. साधारणपणे 10,00,000 प्रति हेक्टर या दराने 10 गुंठे शेततळ्यात 1,00,000 नग मत्स्यजिऱ्यांची साठवणूक करून 25 टक्के जगवणुकीचे प्रमाण गृहित धरल्यास किमान 25 हजार मत्स्यबोटुकली दोन महिन्यांच्या संवर्धनातून मत्स्यबीज म्हणून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. याद्वारे शेतकऱ्याला (अथवा समूहाला) किमान 40 ते 50 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. जगवणुकीचे प्रमाण अधिक मिळविल्यास उत्पन्नात त्याप्रमाणे वाढ होऊ शकते.
विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)संपर्क - 022-26516816 (लेखक तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई येथे कार्यरत आहेत)
Share your comments