राज्यातील विविध भागांमध्ये आज वातावरणाची अगदीच विषम अवस्था पहायला मिळाली. एकीकडे थंडीचं वातावरण तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नागपूरमध्ये तर गारपीट) झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिकमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं द्राक्षं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
नाशिकमधील देवळा भागाला शनिवारी अवकाळी पावसानं चांगलच झोडपलं, पिकांचं मोठं नुकासान झाल्यानं इथला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
त्याचबरोबर मेशी परिसरात दिवसाआड दुसऱ्यांना अवकाळी पावसानं हजेरी लावली. कळवण तालुक्यातही पावसानं हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील हिरापूर, भोयेगावसह अनेक गावांमध्ये तुरळक पाऊस झाला. यावेळी काढणी केलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. उमराणे परिसरात पावसामुळं कांदा रोप आणि रब्बी पीक, काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मालेगाव शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण पाऊस झाला नाही.
त्याचबरोबर वणी, डांगसौदाणे, रेडगाव खडजाम, महालपाटणे, देवपूरपाडे, ब्राह्मणगाव, निवाणे, ठेंगोडा, किकवारी बुद्रुक, अभोणा आणि इगरपुरी या भागातही पावसानं तुरळक हजेरी लावली.
नागपूरला गारपीटीनं झोडपलं : उपराजधानीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीसह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती. विदर्भात आणखी दोन-तीन दिवस वादळी पाऊस व गारपिटीची दाट शक्यता आहे.
उपराजधानीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीसह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली.
वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने खरं तर रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता
Share your comments