उसाची रोप लावण होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. उसाला फुटवा येण्यास सुरू झाले होते.त्याच वेळी माझा संपर्क दादांबरोबर झाला. उसाचे छायाचित्रे पाहिल्यास ऊसाची वाढ समाधानकारक होती. आम्ही ७ महिन्यात १८ कांडी ऊस घेत असतो. तो प्रयोग इथे करावा असं मला वाटत होते.
त्याकरीता आम्ही सर्वप्रथम चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्सची फवारणी घेतली. ह्या फवारणीचा मुख्य हेतू रोपांची झपाट्याने वाढ करणे होता. पानांची रुंदीही त्याच वेळी वाढावी अशी अपेक्षा होती. फवारणी झाल्यावर काही दिवसातच त्याचे चांगले परिणाम दिसू लागले.
पानांची रुंदी,फुटव्यांची जाडी वाढण्यास मदद मिळाली. पहिल्या फवारणी नंतर दहा दिवसांनी फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाची फवारणी करण्यात आली. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया हे पानामध्ये राहून सहजीवी पध्दतीने जिब्रेलीक ऍसिड आणि इंडोल ऍसिटीक ऍसिडची निर्मिती करतात. त्यामुळे रासायनिक जी ए व आय ए ए किंवा आय बी ए ची फवारणी करावी लागत नाही. हे जिवाणू पानात राहून नत्र स्थिरीकरण करतात. त्यामुळे उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते व कालांतराने त्याचा वजनामध्ये वाढ होते.
फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचा फवारणी नंतर दहा दिवसाचा अंतराने युरिया,१२:६१ व म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करण्यात आली. त्यामुळे फुटवे आणि जेठाची वाढ चांगली झाली.
त्याच वेळी जमिनीतून जिवाणू खतांचा वापरही सुरू होता. नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंमुळे झाडाची वाढ झपाट्याने होण्यास सुरुवात झाली. रोपांमध्ये इंडोल ऍसिटीक ऍसिड,जिब्रेलीन व सायटोकायनिन ची नैसर्गिक निर्मितीस प्रारंभ झाला.स्फुरद विरघळणारे जिवाणूंमुळे मुळींची लांबी वाढण्यास मदद मिळाली.सायटोकायनीन चा निर्मितीस चालना मिळाली. फुटवे चांगले जोमदार,जाड निघू लागले. पालाश विरघळणाऱ्या जिवाणूंचा जोरावर पानांचा पेशी मध्ये पकवता निर्माण झाली. झाडाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली.
हा ऊस नियोजन करण्यापूर्वी गुढघ्या एवढा होता. ऐका महिन्यात हा ऊस डोक्यावर जाणार असा आत्मविश्वास माझा मनामध्ये होता. ३२ दिवसानंतर हा ऊस डोक्यावर गेला आहे.
शेतकऱ्याचे नाव:आशितोष पाटील
गाव:बोरगाव
तालुका:तासगाव
जिल्हा:सांगली
Share your comments