विश्वाचे महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांना एक वेळ एका व्यक्तीने विचारले महाशय विश्वाचं तिसरं महायुद्ध कसं घडवलं जाईल यावर अल्बर्ट स्टाईन यांनी फार सूचक उत्तर दिले आहे तिसरे महायुद्ध कसं लढला जाईल मी नाही सांगू श कत परंतु चौथ महायुद्ध हे दगड धोंड्यांनी लढला जाईल
या सूचक वक्तव्यावरुन हेच स्पष्ट होत आहे की जीवसृष्टी निसर्गानं निर्मित केलेली आहे या सृष्टी वर मानव जातीने सभ्यता संस्कृती आणि विकास जो या धर्तीवर निर्माण केला आहे तो विज्ञानाच्या अतिवापराने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे
मानव हा विवेकशील प्राणी आहे, भारताचे महान दार्शनिक सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीसुद्धा एक सूचक वक्तव्य केले आहे युद्ध हे मानवी बुद्धीच्या असफलतेची निर्मिती आहे. हे तर झालं युद्धा प्रति परंतु दुसरा एक महा दानव फार मोठ्या झपाट्याने वाढतो आहे,
तो आहे पर्यावरणाचा नाश करणारा प्रदूषणरूपी दानव,सद्य स्थितीत वैज्ञानिक आविष्कार खूप झाले आहेत त्यामधून अनियंत्रित औद्योगीकरण विकासाच्या फलस्वरूप साऱ्या विश्वामध्ये पर्यावरण प्रदूषण रुपी राक्षस थैमान घालत आहे, ओझोन ची परत फाटली आहे धरती च तापमान ग्लोबल वार्मिंग झपाट्यानं वाढत आहे.
तर पर्यावरण सुधारण्यासाठी अविलंब लक्ष न दिल्या,गेल्यास युद्धा शिवाय नैसर्गिक विपत्ती ने किंवा वाढलेल्या अनियंत्रित जनसंख्या वाढी मुळे मानवजातीचे भविष्य अंधकारमय राहणार आहे.
विश्वातील मोठमोठे वैज्ञानिक, विचारक, दार्शनिक, महापुरुष आणि राजनीती तज्ञ ह्या निष्कर्षावर पोहोचले आहेत की महानगरीय जीवन शैली निरस, संवेदनाहीन आणि प्रदूषित झाली आहे. जेव्हा की महानगरांमध्ये त्यांना सर्व प्रकारच्या आधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा प्राप्त आहेत.
एकेकाळी भारतामध्ये विशाल काय सघन वने होती, उत्पन्नाचे अनेक मार्ग होते मानवी शरीर बौद्धिक वाढीसाठी भारतीय देशी अन्नधान्य आणि पौष्टिक देशी गाईंचे दूध,तूप लोणी होते. गंगा, यमुना, सरस्वती किंवा अनेक उपनद्या आमच्या आस्थे च्या प्रतीक होत्या, त्या स्वच्छ सुंदर असायच्या ज्या आज विज्ञानाच्या कसोटीवर भयंकर प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत.
प्रत्येक गावागावांमध्ये हजारोंच्या संख्येने गाई होत्या त्यांना चरण्यासाठी कुरणे होती, जी आज भू माफियांची मक्तेदारी झाली जी जागा आहे त्यात संकरित पालनाची लालच देऊन जाणूनबुजून देशी गाईच्या संगोपनात, त्यांचा वंश वाडीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, झाडे ही प्रदूषणाची शत्रु आहेत, मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड घेऊन मानवजातीला ऑक्सिजन देतात,
सोबत त्यांच्या सहकार्या मुळे अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या वनस्पतीची वाढ होत असते, वृक्ष आणि गाय हे एकमेकांना फार पूरक आहेत ,भारतीय देशी गाइला तर जशी पृथ्वीला माता म्हणतात तसेच पृथ्वी नंतर भारतीय देशी गाई ला माता म्हणल्या गेलेल आहे. कारण पृथ्वी जशी झाडे अनेक वनस्पती यांचा सांभाळ करून मानव जातीचे कल्याण करते, त्यापाठोपाठ मानव जातीचे कल्याण करणार कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय देशी गोवंशातली गाय आहे.
भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये यज्ञाची महिमा सांगितले आहे यज्ञात भवती प्रजन्य म्हणजेच यत्न केल्यामुळे प्राकृतिक नैसर्गिक वातावरण शुद्ध होऊन योग्य प्रमाणात पाऊस पडतो आणि त्या यज्ञासाठी महत्त्वाचा आहे देशी गाईचे गोमुञ दूध तूप आणि काही वाढलेल्या वृक्षांच्या समिधा त्यातून पवित्र असं दूर निघून वातावरण शुद्ध करून निसर्गाला पोषण देत.
Share your comments