हल्ली प्रत्येक माणसामागे काहीना काही टेन्शन चा भाग असतोच नोकरी-व्यवसाय नातेसंबंध अशा अनेक गोष्टींमधून माणसाला मानसिक त्रास होत आहे त्यामुळे त्यावर मात करणे ही आज काळाची गरज बनली आहे.
कोरोना काळात अनेकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास झाला होता. अनेक जणांना मानसिक आरोग्याशी संबंधित आजार झाले होते. त्याचा परिणाम हा स्मरणशक्तीवर झाला असून त्यांना रात्री झोपेच्या समस्या उध्दभवू लागल्या होत्या.
तुम्ही आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करून तुमचा मेंदू सक्रिय बनवू शकता. तर विध्यार्थ्यांना देखील याचा फायदा होईल.
आपण आज स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कसा आहार असावा हे जाणून घेणार आहोत.
हिरव्या भाज्या
हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मेंदूला पोषण मिळते.
पालक, ब्रोकोली आणि केल यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन यांसारखे पोषक घटक असतात.
मेंदूसह शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करावा.
संत्री
एका संत्रात जवळपास तुम्हाला संपूर्ण दिवसभरात आवश्यक असणारे सर्व व्हिटॅमिन सी मिळतात.
हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण यामध्ये मानसिक घट रोखण्यासाठी व्हिटॅमिन सी हा एक महत्वाचा घटक आहे.
अक्रोड
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज अक्रोड खाणे चांगले असते.
अक्रोड मेंदूला तीक्ष्ण बनवतो तसेच निरोगी ठेवतो.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, मॅंगनीज आणि अँटिऑक्सिडंट असतात.
भोपळाच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते.
भोपळ्याच्या बिया मेंदूला ऊर्जा देतात.
यात अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॉपर आणि आयर्नही मुबलक प्रमाणात असतात.
मेंदूला निरोगी आणि सक्रिय बनविण्यासाठी भोपळ्याच्या बियाही फायदेशीर असतात.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटचे सेवन मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे.
कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात.
याच्या सेवनाने चिंता, तणाव आणि नैराश्य दूर होते.
हळद
चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.
हळदीमध्ये अँटी एंग्झायटीचे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते.
यातील अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.
टीप : कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Share your comments