1. कृषीपीडिया

रताळे लागवडीसाठी सुधारित जाती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
रताळे लागवडीसाठी सुधारित जाती

रताळे लागवडीसाठी सुधारित जाती

रताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे पीक आहे. रताळ्याची बाजारपेठेतील वाढती मागणी पाहता सुधारित पद्धतीने लागवड आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची निवड महत्त्वाची आहे रताळे पिकाची लागवड साधारणपणे मे ते जुलै या कालावधीमध्ये केली जाते. जेथे पाण्याची चांगली उपलब्धता आहे तेथे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. लागवडीसाठी कंद किंवा वेल यांचा वापर केला जातो प्राथमिक व दुय्यम रोपवाटिकेमध्ये कंदाचा लागवडीसाठी उपयोग करावा._

 

प्राथमिक रोपवाटिका

लागवडीच्या तीन महिन्याच्यांअगोदर प्राथमिक रोपवाटिकेची तयारी करावी.

एक हेक्‍टरवर लागवडीसाठी १०० वर्गमीटर एवढी जागा लागते.

लागवडीसाठी १०० ते १५० ग्रॅम वजनाचे निरोगी कंद निवडावेत.

लागवड ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.

लागवडीच्यावेळी रोपवाटिकेत १.५ कि.ग्रॅ. युरिया मिसळावा.

गरजेनुसार पाणी द्यावे.

दुय्यम रोपवाटिकेसाठी ४५ दिवसांच्या लागवडीनंतर वेलाचे २० ते ३० सें.मी. तुकडे घ्यावेत लागवडीसाठी फक्त वेलाच्या शेंडाचे तुकडे घ्यावेत.

दुय्यम रोपवाटिका

या रोपवाटिकेमध्ये तुकड्यांची ६०x३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. १५ व ३० दिवसानंतर रोपवाटिकेत ५ किलो युरियाचा मात्रा द्यावी. लागवडीच्या ३० ते ४५ दिवसांनंतर शेंडा व वेलींच्या मधल्या भागातून २०-३० सें.मी. लांब वेल कापावेत. दुय्यम नर्सरीसाठी ५०० मीटर वर्ग इतकी जागा लागते. जर लागवड कंदापासून न करता वेलीतून केली तर प्राथमिक रोपवाटिका वगळून दुय्यम रोपवाटिकेचा वापर करावा.

वेलींची निवड

लागवडीकरिता शेंड्यांचा भाग निवडावा वेल मोठी असल्यास शेंडा व मधल्या भागातून वेल निवडावी. शक्यतो २० ते ३० सें.मी. लांबीचे वेल निवडावेत. लागवडीपूर्वी कापलेल्या वेलांचे बंडल बांधून सावलीच्या ठिकाणी २ दिवसांपर्यंत ठेवता येते.

लागवड

लागवडीपूर्वी जमीन भुसभुशीत करून घ्यावी. त्यामुळे कंदांची चांगली वाढ होते लागवडीचे अंतर ६० बाय ३० सें.मी. सें.मी. ठेवावे लागवड करताना वेल सरळ लावावी साधारणपणे २ ते ३ कोंब जमिनीच्या आत लावून वरून माती टाकावी. शक्यतो वेलीचे २ ते ३ कोंब जमिनीवर असावेत._

खत व्यवस्थापन 

लागवडीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे या पिकाला हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश लागते. लागवडीच्यावेळी अर्धा किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परिक्षणानुसारच द्यावी._

पीक व्यवस्थाप

 पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पहिल्या टप्प्यात तण नियंत्रण करावे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते.

- प्रवीण सरवदे, कराड

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters