कडुनिम्बाची पेंड, करंजीपेंड, महुआपेंड, एरंडपेंड अशा एखाद्य पेंडीचा पोषण द्रव्याचा स्रोत म्हणून चांगला उपयोग होतो.सरकी,तीळ, भुईमुग, खोबरे अशा खाद्य तेलाच्या पेंडी सुद्धा पोषण द्रव्याने समृद्ध असतात.नत्र,स्फुरद,पालाश याबरोबरच इतरही वेगवेगळे सेंद्रिय पदार्थ पेंडी मध्ये असतात. त्याचा उसाच्या वाढीसाठी उपयोग होतो.पेंडी मध्ये सुक्ष्म अन्न द्रव्ये सुद्धा असतात.जमिनिमध्ये सेंद्रिय कर्ब व नत्र यांचे संतुलन योग्य
ठेवण्यासाठी पेंडी उपयुक्त असतात.अखाध्य पेंडी Plantains are useful for keeping inedible plantains उदा. निम्बोळी, करंज, एरंडी इत्यादि वाजवी दरामध्ये मिळु शकतात.
मागील दहा वर्षात जैविक तंत्रज्ञानावर बरेच संशोधन झाले. त्याबद्दल माहीती सोप्या भाषेत
निम्बोळी, करंज, एरंडी यांच्या पेण्डिमध्ये किड नियंत्रनाचे गुणधर्म आहेत. निम्बोली पेण्डिमुळे खोड्किडिचा प्रादुर्भाव कमी होतो.एरंडिचा भराडा उन्हाळ्यामध्ये शेतातल्या झाडाझुडपाजवळ ठेवला तर हुमणिच्या पतंगाचे नर त्याकडे आकृष्ट होतात. ते वेचून मारता येतात. पण
एरंडी भरडा / पेंड खुप विषारी असते. जनावारांच्या किंवा कोणत्याही खाध्यात येणार नाही ही द्क्षता घावी.हमणिचे भुन्गेरे आकृष्ट होण्यासाठी हां चांगला सापळा आहे. फ़क्त हे फार विषारी आहे हे सतत लक्षात असू द्या.पेण्डिच्या वापराने जमीनीचे भौतिक, रासायनिक व् जैविक घटक सुधारतात. जलधारण शक्ति वाढते.एरंडी पेण्डितिल नत्राचे नायट्रेट मध्ये जलद रुपान्तर होते.महुवाच्या पेण्डितिल नत्राचे खनिजिकरण सावकाश होते. भुइमुगाच्या पेण्डितिल प्रोटीन्स मुळे सुक्ष्म द्रव्ये
जलद उपलब्ध होण्याची क्रिया वाढते.पेंडी या बारीक पावडरी ऎवजि भरड स्वरूपात वापरावे.पेंडी या सेंद्रिय खत प्रकारात येयात पण त्यांचा परिणाम रासायनिक खतासारखे जलद असतो.यूरिया बरोबर एक पंचमांश भाग निम्बोली पेंड दिल्यास युरियाची कार्य क्षमता वाढते. त्यातला नत्र ऱ्हास न होता सावकाश उपलब्द होतो.सासाठी प्रति एकरी 250 ते 300 किलो कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पेण्डिखत दिल्यास लाभदायक होते.पेडिचे नाव सेंद्रिय सेंद्रिय सेंद्रिय
कृषिभूषण संजीव माने आष्टा 9404367518
Share your comments