नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या सोबत सर उसासाठी गंधकाचा वापर केला तर उत्पादन क्षमता वाढते. तसेच उसाच्या पानांमध्ये हरितद्रव्य ची असलेल्या प्रमाणात सुधारणा होऊन ऊस उत्पादन वाढीस अधिक चालना मिळते गंधका मुख्य अन्नद्रव्य तितकाच महत्त्वपूर्ण घटक आहे. ऊस तसेच विविध पिकामधील गंधकाचे महत्त्व, त्याच्या कमतरतेची लक्षणे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
गंधकाच्या कमतरतेची पिकांमधील कारणे
पिकांमध्ये गंधकाचे प्रमाण जर कमी असेल तर त्याची बरीचशी कारणे सांगता येतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ठिकाण कडून गंधकाचे भरपूर शोषण होणे, खतांचा पुरवठा करताना तो गंधक विरहित खतांचा करणे, सेंद्रिय खतांचा व अभाव, वापरलेल्या गंधकाचा पाण्याद्वारे होणारा निचरा अशा बर्याच कारणांमुळे जमिनीतील गंधकाची पातळी कमी झाल्याचे आढळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिके गंधकाचे शोषण हे फक्त सल्फेटचे रूपात करतात. गंधक जर स्पटीक स्वरूपात असेल तर पिकांना गंधकाचे शोषण करण्यासाठी बराच कालावधी लागतो व तो पिकांना पाहिजे त्या वेळेस उपलब्ध होत नाही.
उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी गंधक महत्त्वाचे आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादन वाढीसाठी खातो व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे उसाला सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खताही शिफारशीनुसार द्यावी लागते.उसाला लागवडीपासून तर मोठ्या बांधणी पर्यंत खतांची आवश्यकता असते. उसाला मुख्य अन्नद्रव्यांची गरज तर असतेच पण त्यासोबतच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य चा योग्य वेळेतपुरवठा करणे तितकेच महत्वाचे असते.
दाणेदार गंधकाचे फायदे
दाणेदार गंधक खतामध्ये 90 टक्के मूलभूत गंधक व 10 टक्के बेन्टोनाईट असते. जेव्हा जमिनीतील ओलाव्याची याचा संपर्क येतो तेव्हा पेस्टाईल चे जलद विघटन होऊन मूलभूत गंधक पिकांना त्वरित उपलब्ध होतो. तसेच विघटन झालेल्या गंधकाचे ऑक्सिडेशन होऊन त्याचे सल्फेट मध्ये रूपांतर होते. या स्वरूपामध्ये ते पिकांना व त्यांच्या संवेदनशील वाढीच्या काळात उपलब्ध होते.गंधक पिकाला जलद उपलब्ध होऊन उसाची जोमदार वाढ होते
तसेच नत्राची कार्यक्षमता देखील सुधारण्यास मदत होते. तसेच जमिनीचा सामू सुधारणे मध्ये मदत होऊनस्फुरद, लोह आणि जास्त या अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.तसेच ऊसातील रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा देखील वाढतो व उसाची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.
पिकांची वाढ आणि पोषण मधील गंधकाची कार्य
- मुख्य अन्नद्रव्यांच्या जोडीला गंधकाच्या वापरामुळे पीक उत्पादन क्षमता वाढते.
- सुधारित खत वापराचा परिणाम कतेमुळे सूक्ष्म पोषणमूल्यांसह जमिनीतील सर्व उपलब्ध पोषणमूल्य यांचे प्रमाण वाढते.
- जमिनीतील सामूपातळी नियंत्रित करते व क्षारयुक्त जमिनीची गुणवत्ता वाढते.
- पानांमध्ये असलेल्या हरितद्रव्यांमध्ये विशेष सुधारणा होते परिणामी प्रकाश संश्लेषणाची क्रिया अधिक परिणामकारक होते.
- वनस्पतींमध्ये असलेल्या आवश्यक अमिनो आम्लाचे 90 टक्के भाग यामुळे बनतो.
Share your comments