कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. कांदा पिकाचे बियाणे अल्पायुषी असते व त्याची उगवण क्षमता ही एक वर्षापुरतीच टिकून राहते त्यामुळे कांदा बियाणाचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते. कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करावीत. नंतर दुस-या वर्षी या मातृकंदापासून बियाणे उत्पादन कार्यक्रम घ्यावा. कांद्याच्या बिजोत्पादानाची पद्धत :
कंदापासून बियाण्याची पद्धत : या पद्धतीमध्ये कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्या रीतीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात.
सेंद्रिय पदार्थ आणि जिवाणू हे जमीन सजीव करण्यासाठी अत्यंत आवश्यक
यामुळे कंदाची योग्य निवड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्नदेखील जास्त प्रमाणत येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळ देखील जास्त लागतो.This method increases the cost and also takes more time. तथापि, बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे. एकवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये मे-जून महिन्यात पेरणी करून रोप लावणी जुलै-ऑगस्टमध्ये करतात. नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात. कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदांची १०-१५
दिवसानंतर पुन्हा दुसऱ्या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एक वर्षात बियाणे तयार झाल्याने यास एकवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीने खरीप कांद्याच्या प्रजातींचे बिजोत्पादन घेतात. द्वीवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे. मेपर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडून चांगल्या कंदांची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार
होण्यासाठी जवळपास दीड वर्ष वेळ लागतो. म्हणून यास द्वीवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीत रब्बी कांद्याच्या वाणांचे बिजोत्पादन करतात. जातींची निवड : महाराष्ट्रात बिजोत्पादानासाठी नाशिक लाल, नाशिक-२४१ (गावरान), पूना फुरसुंगी, फुले समर्थ, प्रशांत, पंचगंगा, गाजनन, ईस्ट वेस्ट, इ. जातींची निवड करतात. पुणे-फुरसुंगी जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेता बीजोत्पादनातून फायदा मिळतो. पुणे-फुरसुंगी जातीमध्ये कांदे काढणीनंतर अधिक काळ टिकण्याची क्षमता असल्याने त्या जातीची निवड करतात. या कांद्याला दर चांगला
मिळत असल्यामुळे बियाण्याचीही किंमतही अधिक असते. रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी नाशिक-२४१ ही जात निवडावी. ही जात रब्बी हंगामात उच्च उत्पादनक्षमतेसाठी तसेच उत्तम साठवणूक क्षमतेसाठी चांगली आहे. कांदा मध्यम चपटगोल आकाराचा असून, डेंगळे येणे, डबल कांदा इत्यादी विकृतीत प्रतिकारक आहे. शेतकरी या वाणांस गरवा, भगवा अथवा गावरान या नावानेही ओळखतात. कृषी विद्यापीठातून या जातीचे मूलभूत बियाणे (ब्रिडर सीड) घ्यावे किंवा माहिती असलेल्या शेतकऱ्यांकडून खात्रीचे गोट वापरून सुधारित बीजोत्पादन घ्यावे. उत्पादन : कांद्याचे बियाण्यासाठी
एकरी ३-५ क्विंटल इतके उत्पादन निघते. साठवणगृहात मध्यम आकाराचे एकसारखे कांदे ठेवावेत. कांदा साठविण्यापूर्वी दोन दिवसआधी कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी. मॅन्कोझेबची (३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. साठवणुकीत दर महिन्याला एकदा अशी फवारणी केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते. पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही. साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळू नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये. कांद्याची पत्ती संरक्षकाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्यक आहे.
Share your comments