1. कृषीपीडिया

महत्त्व प्रकाश संश्लेषणाचे जाणून घ्या सविस्तर

हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणाची कृती वनस्पती आणि अन्य जिवंत प्राण्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची क्रिया आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
महत्त्व प्रकाश संश्लेषणाचे जाणून घ्या सविस्तर

महत्त्व प्रकाश संश्लेषणाचे जाणून घ्या सविस्तर

हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणाची कृती वनस्पती आणि अन्य जिवंत प्राण्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. या क्रियापटात, वनस्पती सूर्यप्रकाशाची प्रकाशीय ऊर्जेला रासायनिक ऊर्जा मध्येरुपांतरीत करतात आणि कार्बन आणि पाणी या सामान्य पदार्थांपासून कार्बोहायड्रेट्स तयार करतात हेच कार्बोहायड्रेट्स मानवांना आणि प्राण्यांना अन्न पुरवतात. अशाप्रकारे, वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या कृतीतून संपूर्ण जगासाठी अन्नाची व्यवस्था करतात. कार्बोहायड्रेट प्रथिने आणि जीवनसत्वे इत्यादी प्राप्त करण्यासाठी विविध पिके घेतली जातात आणि हे सर्व पदार्थ प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार केले जातात. रबर, प्लास्टिक, तेल आणि विविध प्रकारची औषधे प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार होतात. आपल्या शेतातील पिके प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड गोळा करतात आणि ऑक्सिजन काढून टाकतात, त्यामुळे वातावरण स्वच्छ करतात. सर्व प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कृती पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडते. प्रकाशसंश्लेषण हे मासेमारीसाठी देखील अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा प्रकाश संश्लेषणाची कृती मंद होते, तेव्हा पाण्यात वाढणारी कार्बनडायऑक्साइडची संख्या वाढते. 

             प्रकाशसंश्लेषण आणि श्वसन क्रिया एकमेकांच्या पूरक आणि उलट आहेत. प्रकाशसंश्लेषणात, कार्बन डायॉक्साईड आणि पाणी यांच्यातील रासायनिक क्रियामुळे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचे उत्पादन होते. मानव शरीर श्वसना द्वारे ऑक्सिजन आत घेतो व कार्बन डायॉक्साईड बाहेर फेकतो जे पुन्हा प्रकाशसंश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. 

भर दुपारी १२ वाजता मोकळ्या परिसरात या आणि पडीक जमीन किंवा रस्ते किंवा घराच्या भिंतीचा सूर्यप्रकाश पडलेला पृष्ठभाग की ज्याच्यावर वनस्पती/ गवत वाढलेले नाही अशा पृष्ठभागावर आपला हाताचा पंजा/ तळवा ठेवा. गरमागरम लागले का? आणि नंतर जवळच असेलल्या एखाद्या झाड/ गवत यांची हिरवी पाने मुठीमध्ये घट्ट धरा. आता सांगा आपल्याला या दोन्ही स्पर्शामध्ये काय फरक जाणवतो? एकच सूर्य दोन्ही पृष्ठभागावर एकाच वेळी तळपतो आहे, परंतु दोन्ही स्पर्शात मोठ्ठा फरक आहे ना?

उजाड पृष्ठभाग हे उष्णता शोषून घेतात, परावर्तित करतात आणि उत्सर्जित करतात. या उलट हिरवी पाने/ गवत हे उष्णता आत घेत असताना ‘उष्माग्राही प्रतिक्रिया’ (प्रकाश संश्लेषण) अमलात आणतात. याचा परिणाम म्हणून तेवढी जागा थंड होते, परंतु फक्त एवढीच क्रिया घडत नाही, तर तेथे अन्नाची निर्मिती होऊन ऑक्सिजन बाहेर उत्सर्जित केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडं/ गवत वातावरणात निसटलेला सुटा/ वायुरूप कार्बन डाय ऑक्साईड (Co2) खाऊन टाकतात आणि तो पाने, खोड, बिया, मुळे इ. च्या स्वरूपात दीर्घ काळापर्यंत स्थिर करतात. यालाच ‘कर्बाचे स्थिरीकरण’ असे म्हणतात.

 

जमिनी पडीक बनण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. मोठय़ा प्रमाणात शेतकरी शेती व्यवसाय सोडून देत आहेत. वणव्याने काळ्या झालेल्या टेकडय़ा व जंगली इलाके, सगळीकडे तयार होत असलेले रंगीत गृहनिर्माण संकुल, प्रगतीसाठीचे महामार्ग आणि असे बरेच काही विनातक्रार याबाबतच्या अडचणी वाढवत आहेत. हे सर्व समजून घेऊन त्यावर काही योग्य कारवाई होण्यासाठी आपण जेवढा विलंब करू त्याच्या कितीतरी पटीत जास्त वेळ हवामान बदलाच्या दुष्परिणामांना दुरुस्त करायला जाणार आहे. हवेत निसटलेला हा कर्ब मातीत लवकरात लवकर स्थिर करण्याच्या या कामी आता आपण प्रत्येकानेच काहीतरी हातभार लावला पाहिजे.

अशाप्रकारे जेव्हा माती/ जमीन उष्णता शोषून घेते आणि परावर्तित करते तेव्हा ती उष्णता आपल्याबरोबर मातीतील ओलावासुद्धा घेऊन जाते, त्यामुळे आसपासच्या वातावरणात अधिक गुंतागुंत उद्भवते. अलीकडील येणारा अनियमित पाऊस आणि उद्भवणारी वादळे ही त्याची एक प्रमुख कारणे असू शकतात की जी मनुष्य जातीच्या दृश्य व अदृश्य नुकसानीस कारणीभूत ठरतात.

अन्न उत्पादन प्रक्रियेमध्ये (शेती) जमिनीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी सर्वात महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत हिरव्या वनस्पती आणि मातीतील सूक्ष्मजीव अत्यावश्यक आहेत. यामुळे प्रकाश संश्लेषण होऊन हवेतील कर्ब- पेशीजालात साठणे व त्याद्वारे सेंद्रिय माती तयार होणे अशी एक नैसर्गिक जटिल प्रक्रिया घडून हवेचे मातीमध्ये रूपांतर होणे चालू करता येते. खरं तर जमिनीची सुपीकता आणि कर्बाचे स्थिरीकरण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही प्रकारची शेती सक्षमपणे करण्यासाठी, मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण किमान १.० टक्के असावे. २.५ टक्के आणि अधिक असेल तर पिके चांगलीच फोफावतात. हीच टक्केवारी थंड प्रदेशातील अबाधित जंगले आणि गवताळ प्रदेशात ४ टक्केपर्यंत असू शकते. भारतीय कृषीक्षेत्रात मात्र हे प्रमाण ०.५ टक्के एवढे कमी झाले आहे.

शून्य मशागत तंत्र, पीक फेरपालट पद्धत आणि रसायनांचा कमीत कमी वापर या सर्वाचा एकत्रित वापर हे शेती करू इच्छिणा-या सर्वाना उपयुक्त आणि स्वीकारार्ह मॉडेल असू शकेल.

विकसनशील आणि प्रगतशील अशी ही पद्धत या सर्व प्रश्नांवर शाश्वत उपाय ठरू शकते. आपण प्रत्येक जण ज्यांना अन्न आणि स्थिर हवामान आवश्यक वाटते त्या सर्वानी हवेत मोकळा असणारा कार्बन डाय-ऑक्साईड पकडून जमिनीत स्थिर कसा करता येईल याबाबत सतत विचार करणे आणि त्यावर कृती करणे आवश्यक आहे.

अशा या शून्य मशागत लागवड तंत्राच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत त्यापैकी काही :

जमिनीची खोल नांगरणी केली नाही, तर गांडूळांच्या जीवनचक्राला अडथळा येत नाही. शिवाय जमिनीत राहिलेल्या पिकांच्या अवशेषांपासून त्यांना खाद्य मिळते व ते आनंदी होतात. हे जेव्हा भारतासारख्या नैसर्गिकरित्या उबदार देशांमध्ये घडते आणि पावसाळ्यानंतर जेव्हा हवेतील तापमान वाढायला लागते तेव्हा गांडुळे निद्रितावस्थेत जाण्यासाठी जमिनीत खोलवर जातात. हे ४ ते १० फूट खोल असू शकते. अशा खोल नांगरटीसाठी डिझेलची आवश्यकता पडत नाही आणि पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाण्याऐवजी ते पाणी जमिनीत खोलवर मुरते. याउलट नांगरणीमुळे जमिनीच्या १० ते १२ इंच वरच्या थरातली माती मोकळी होते, परंतु त्याखालील जमीन टणक/ कठीण बनते यामुळे पाणी खोलवर न मुरता टणक पृष्ठभागावरून वाहून जाते आणि नकारात्मक परिणामांची साखळी सुरू होते. अगदी असेच फायदे जेव्हा जमिनीच्या वरच्या थरात पिके व वनस्पतींची मुळे मरतात, वाळतात आणि कुजतात व पोकळ्या तयार होतात तेव्हा दिसून येतात. अशी परिस्थिती लाखो एकर जमिनीतील भूजलपातळीत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यास अधिक उपयुक्त ठरेल.

एक एकर जमिनीवर नांगरणी करून दोन पिके घेण्यासाठी १२ ते १५ लिटर डिझेल जाळावे लागते ते न करता पिकांची मुळे (लिग्नीन) जागेवरच कुजवल्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढून माती जास्त मऊ व सुपीक बनते. यामुळे मातीत सकारात्मक प्रभावाची साखळी सुरू होते.

शून्य मशागतीमुळे शेतीमधील मजुरांचे कष्ट (विशेषत: महिला) ५० टक्केने कमी होतात, उत्पादनावरील सुमारे ४० टक्के खर्च कमी होतो आणि ५० टक्के ते १०० टक्के उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकरीवर्गात आत्मविश्वास आणि आनंद त्वरित परत येईल.

शून्य मशागतीमुळे दोन पिकांमधील मशागतीसाठी लागणारा मौल्यवान वेळ कमी होतो. यामुळे दीर्घ कालवधीसाठी जास्त जमिनी हिरव्या पिकांनी झाकून ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल.

सगुणा बाग येथील चमूने शून्य मशागतीसाठी एक साधी-सोपी पद्धत विकसित केलेली आहे. या पद्धतीस सगुणा राईस टेक्निक म्हणतात. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांच्या पीपीपी-आय.ए.डी. कार्यक्रमात या तंत्राचा समावेश केलेला आहे. हे तंत्र स्वीकारण्यास व वापरण्यास शेतकरी सकारात्मक आहेत.

जास्तीत जास्त जमीन हिरव्या पिकांखाली आणि झाडांखाली (फळझाडे) झाकण्यास कितीही कठीण किंवा सोपे वाटले तरी आपल्यातील प्रत्येकाने आता आपले एक पाऊल त्या दिशेने "आत्ताच" टाकायला हवे! जागृती बद्दलचे फलक, त्याबद्दलच्या मोठ मोठय़ा योजना किंवा त्याबद्दलच्या घोषणा किंवा वृक्ष लागवड मोहिमा यामधून आत्तापर्यंत आपण काय साधले ते आपल्या समोर आहेच.

या सर्व गोष्टी कृतीत आणणारी व्यक्ती म्हणजे शेतकरी; जो या कमी सर्वात महत्त्वाचे काम करतो. मोठय़ा प्रमाणात सक्षम तरुण मंडळी याकडे आकृष्ट होण्यासाठी या कामाला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. शक्ती, बुद्धी व चिवटपणा असलेल्या तरुणांना या कामी आत्मविश्वास वाढायला हवा असेल तर समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. आपल्या कुटुंबासाठी कायमस्वरूपी अन्नाचा स्रेत निर्माण करणे (पुढील काळात पैसे फेकून अन्न मिळेल याची खात्री नाही) व पृथ्वीवरील कर्बाचे स्थिरीकरण करण्यासाठी लवकरात लवकर एक शेतकरी मित्र शोधावा.

English Summary: Importance of photosynthesis know about in detail Published on: 07 March 2022, 10:58 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters