राज्यात अनेक ठिकाणी अनेक ऊसतोडणी कामगारांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले होते.
यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची या तोडणी कामगार व मुकादमांनी संगनमताने सुमारे ३३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
यामुळे आता फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करणार आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली. यामुळे ज्याचे पैसे बुडाले आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ब्रेकिंग! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत दिला महत्त्वाचा निकाल
तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर गेल्या दोन वर्षांत सुमारे ४४६ कोटी रुपयांची फसवणूक ऊस वाहतूकदारांची झाली आहे. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. राज्यभरात अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल आहेत. मात्र याची दखल घेतली जात नव्हती.
भारतातील सर्वात कमी किमतीचा आणि सर्वात जास्त ताकदवान ट्रॅक्टर, जाणून घ्या..
याबाबत राज्यभरात अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल आहेत. असे असले तरी याबाबत निकाल लागत नाही. यामुळे अनेकांनी हा धंदाच बंद केला आहे. यामुळे अनेकजण हतबल होऊन कर्जबाजारी झाले आहेत.
आता मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळणार, असा घ्या लाभ..
खतांच्या किमती यंदा वाढणार का? जाणून घ्या, यावर्षीचे खताचे अर्थकारण..
बैलगाडा प्रेमींसाठी खासदार अमोल कोल्हेंकडून खास गिफ्ट, निकाल लागताच केली मोठी घोषणा
Share your comments