आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये गंधकाची कमतरता आल्यावर कसे ओळखावे.कोबी 1) कमतरतेमुळे नवीन पानाचे काठ पिवळे पडतात.2) नवीन पानांचा आकार चमच्याच्या किंवा कपासारखे होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही. 2) लागवडीपासून एक महिन्याच्या आत पानाच्या
कडात पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात.u The edges become yellowish and taper down. 3) गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते. हरभरा : 1) पानांची टोके पिवळसर हिरव्या रंगाची होतात. कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो.2) नवीन अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात.मिरची : 1) गंधकाच्या कमतरता असल्यामुळे झाडांना फुलधारणा उशिरा होऊन फुलांच्या संख्या
कमी होते व उत्पादनात घट होते. 2) नवीन कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळसर ठिपके दिसून येतात. कापूस : 1) जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने पिवळी पात्याचा रंग लालसर दिसतो.मका : 1) नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व पानांच्या कडा लालसर दिसतात.2) पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या
बाजूने लालसर होताना पिवळी पडतात.कांदा :1) गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानाचा आकार लहान होतो. पाने पिवळी पडतात.2) पानांची शेंडे पिवळसर पडून वाळतात. तांदूळ : 1) पाने पिवळसर होतात. 2) झाडांची वाढ खुंटते व लोंब्यांच्या संख्येत घट होते.ज्वारी : 1) झाडांची जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होतात. जुनी पाने हिरवीच राहतात. 2) झाडांची नवीन पाने लहान होऊन निमुळतात.
Share your comments