1. कृषीपीडिया

ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात असल्यास रोपाची मुळे त्यात बुडवून लागवडी करा आणि फरक पहा

ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात उपलब्ध असल्यास साधारणता 500 मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा पाच लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात असल्यास रोपाची मुळे त्यात बुडवून लागवडी करा आणि फरक पहा

ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात असल्यास रोपाची मुळे त्यात बुडवून लागवडी करा आणि फरक पहा

ट्रायकोडर्मा द्रव स्वरूपात उपलब्ध असल्यास साधारणता 500 मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा पाच लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व या द्रावणात रोपाची मुळे पाच मिनिटे बुडवून नंतर त्याची लागवड करावी.(४) ट्रायकोडर्मा चा प्रभावी वापर करण्यासाठी घ्यावयाची काळजी.(a) ट्रायकोडर्माची कार्यक्षमता वाढण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात टाकावे.(b) ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकिट किंवा बॉटल घरी नेल्यानंतर थंड जागी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी व शक्य तितक्या लवकर तिचा वापर करावा.

(c) रासायनिक निविष्ठा बरोबर एकत्र करून ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू नये. ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम ऍझोटोबॅक्‍टर पीएसबी या जैविक खताची बीज प्रक्रिया करता येते. रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास प्रथम करावी नंतर ट्रायकोडर्मा सारख्या जैविक निविष्ठाची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक बुरशी नाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्मा ची मात्रा दुप्पट करावी.(d) ट्रायकोडर्माचा वापर करताना लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे करावा.

(e) ट्रायकोडर्मा खरेदी करता कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या जैविक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळा ,तसेच इतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या नामांकित कंपन्या व मान्यताप्राप्त उद्योजक यांचेकडून खरेदी करू शकता.(५) ट्रायकोडर्मा संदर्भात उपलब्धता व इतर बाबतीत अधिक माहिती करता श्री भगवान देशमुख जैविक किड व्यवस्थापन प्रयोग शाळा कृषी विज्ञान केंद्र वाशिम यांचे 9011970522 या क्रमांकावर आवश्यकतेनुसार संपर्क करू शकता. 

ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकिट किंवा बॉटल घरी नेल्यानंतर थंड जागी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी व शक्य तितक्या लवकर तिचा वापर करावा.रासायनिक निविष्ठा बरोबर एकत्र करून ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू नय.ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम ऍझोटोबॅक्‍टर पीएसबी या जैविक खताची बीज प्रक्रिया करता येते. रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास प्रथम करावी नंतर ट्रायकोडर्मा सारख्या जैविक निविष्ठाची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक बुरशी नाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्मा ची मात्रा दुप्पट करावी.

 

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: If Trichoderma is in liquid form, plant the roots of the plant by dipping in it and see the difference Published on: 02 July 2022, 07:45 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters