सर्वसाधारण पशुपालक जनावरासमोर कडव्याच्या पंढ्या न सोडता जनावरापुढे टाकतात. अशा वेळी जनावरे पेंढीचा फक्त पाचोळा खातात व घाडे शिल्लक ठेवतात. त्यामुळे ४२ टक्के चारा वाया जातो. पंढ्या जर फक्त सोडून टाकल्या, तर ६ टक्के चान्याची बचत होते.
कुल्हाडीच्या सहाय्याने कढव्याचे हात दीड हात लांबीचे तुकडे निकृष्ट चान्यावर प्रक्रिया करून वापरू शकतो. केल्यास २२ टक्के धान्याची बचत होते. म्हणजेच ४-५ जनावरांत १ जनावर पोसता येते. जर कुऱ्हाडीऐवजी कत्ता वापरला, तर मेहनत व वेळ कमी लागतो आणि वित-दीड वितीचे तुकडे करता येतात. यामुळे चान्याची २५ टक्के बचत होऊन ४ जनावरांचा चारा वाचतो. अडकित्ता किंवा कात्रीचा वापर करून आपण चान्याचे लहान तुकडे करू शकतो. त्यामुळे २८ टक्के चान्याची बचत होते. याहीपेक्षा जास्त चान्याची आपण बचत करू शकतो; परंतु त्यासाठी कडबा कुट्टी यंत्र वापरावे लागते. कडबा कुट्टी यंत्रामुळे यापेक्षाही लहान आकाराचे तुकडे करता येतात त्यामुळे चान्याची ४२ टक्के बचत होते कडबा कुट्टी यंत्र हाताने, ट्रॅक्टरने किंवा विद्युत मोटारीने चालविता येते.
२) जनावरांना चारा देण्याची पद्धत
जनावरांना चारा जमिनीवर टाकून खाऊ घालण्यापेक्षा गव्हाणीत खाऊ घातल्यास ५ टक्के चाऱ्याची बचत होते. जमिनीवर १ फूट खोल गव्हाण बांधल्यास १० टक्के चान्याची बचत होते. आणि गव्हाण जमिनीवर १ फूट उंच, १.५ फूट खोल व २ फूट रुंद बांधल्यास चाऱ्याची १५ टक्के बचत होते.
३) निकृष्ट चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया
निकृष्ट प्रतीचा चान्यामध्ये तण, गव्हाचे काड, धांडे सरमाड उसाचे पाचट चोथा, शेंगांची टरफले, मकची दाणे काढलेली कणसे इ. होय, असा १०० किलो निकृष्ट चारा चांगल्या सारवलेल्या जमिनीवर पसरवावा भांड्यात १०० लिटर पाणी २ किलो युरिया विळून घ्यावा. नंतर १ किलो खडेमीठ विरघळून घ्यावे. त्यानंतर १० किलो उसाची मनी आणि मळी नसेल तर ५ किलो स्वस्त गूळ त्यात विसाळावा
हे मिश्रण झारीने सर्व कुट्टीवर शिंपडावे वादे ज्यामुळे कुट्टीस सारखे मिश्रण लागेल, असे मिश्रण एक मोठे जनावर रोज ८-१० किलो खाते. अशा प्रकारे
४) गव्हाच्या काडाची सकसता वाढवून वापरणे :
महाराष्ट्रात बऱ्याचशा भागामध्ये गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यापासून जवळजवळ ५-६ लाख टन गव्हाचे काड निर्माण होते. परंतु, त्यातील भुकटीच्या अधिक प्रमाणामुळे बेचव, कमी प्रथिने आणि पाणी यांमुळे तसेच लेखीन नावाच्या पिष्टमय पदार्थामुळे सहसा जनावरांच्या आहारात त्याचा वापर होत नाही. वाढत्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी गव्हाच्या काठावर प्रक्रिया करून त्याची सकसता वाढविता येते. जनावरांच्या आहारात याचा वापर करता येतो. सकसता वाढविण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागते
१०० किलो गव्हाचे काड फरशीवर किंवा ताडपत्रीवर पसरवूनत्यावर ४० लिटर पाण्यामध्ये २ किलो युरिया १० किलो उसाची मळी किंवा स्वस्त गूळ आणि २ किलो मीठ याचे द्रावण • सारख्या प्रमाणात शिंपडावे. तसेच त्यावर १ किलो खनिजद्रव्य तसेच १ किलो व्हिटॅमिन अॅ टाकावे असे द्रावण शिंपडलेले गव्हाचे काड चांगले खाली-वर करून २८ दिवस झाकून ठेवावे व त्यानंतर जनावरांना खाऊ घालण्यासाठी वापरावे. अशा प्रकारे चाचा काटकसरीने योग्य वापर करून व निकृष्ट चल्यावर प्रक्रिया करून चाराटंचाईवर मात करून आपले पशुधन पोसता येईल.
टीप - युरीयाची प्रक्रिया केलेला चारा तीन वर्षांतील व गाभण जनावरांना देऊ नये.
Share your comments